सर्शा रोनान
सर्शा उना रोनान (जन्म १२ एप्रिल १९९४ ) ह्या एक आयरिश अभिनेत्री आहेत.[१] त्या त्यांच्या लहान वयात केलेल्या नाटकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.[२] त्यापैकी काही आहेत गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि अकॅडमी पुरस्कार. त्यांना अकॅडमी पुरस्कारासाठी चार वेळा नामांकने मिळाली आणि पाच ब्रिटीश अकादमी फिल्म अवार्ड्स मिळाली.
बालपण[संपादन]
सर्शा उना रोनान ह्यांचा जन्म १२ एप्रिल १९९४ साली द ब्रोन्क्स, न्यू यॉर्क सिटी, अमेरिका येथे झाला. त्यांचे आई-वडील मोनिका आणि पॉल रोनन दोघेही डब्लिनचे आहेत. त्यांचे वडील अभिनेता म्हणून न्यू यॉर्क मध्ये प्रशिक्षण घेण्याआधी बांधकाम क्षेत्रात काम करत होते आणि आईने लहानपणी अभिनय क्षेत्रात काम केले होते.[३] रोनन ह्यांच्या तिसऱ्या वर्षी त्यांचा परिवार पुन्हा डब्लिनला परत आला. [४] रोनान काही काळासाठी अर्डाट्टीन काउंटी येथे राहिल्या. तिथे असताना त्या अर्डाट्टीन नॅशनल स्कूलमध्ये शिकल्या.[५]
कारकीर्द[संपादन]
रोनन ह्यांनी २००३ साली आयरिश नाटक ‘द क्लिनिक’मधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यांनी ‘आय कूड नेव्हर बी युअर वूमन’ ह्या एका विनोदी चित्रपटातून पदार्पण केले(२००७). त्या 'अॅटोनमेन्ट' ह्या चित्रपटातील भूमिकेनंतर प्रसिद्ध झाल्या. ह्या चित्रपटाकरता त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून अकादमी अवार्डसाठी नामांकन मिळाले. रोनन ह्यांनी त्यानंतर खून झालेल्या मुलीची भूमिका ‘द लव्हली बोनस’(२००९) मध्ये केले आणि त्यानंतर त्या ‘हॅना(२०११)’ मध्ये एका किशोरवयीन मारेकऱ्याच्या भूमिकेत दिसल्या. ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल(२०१४)’ ह्या चित्रपटात त्यांनी थोडा भाग साकारला. त्यांनी ‘ब्रुकलीन(२०१५)’ ह्या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक झाले. ग्रेटा जर्वीग ह्यांच्या ‘लेडी बर्ड'(२०१७)मधील उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलीच्या भूमिकेसाठी आणि जर्वीग ह्यांच्याच लिटील वूमन(२०१९) मधील ‘जो मार्च’ या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अकादमी अवार्डसाठी नामांकन मिळाले. त्यांना त्यांच्या लेडी बर्ड मधील भूमिकेसाठी गोल्डन ग्लोबचा उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Sheesh! Quaid sorry for mangling Saoirse Ronan's name" (इंग्रजी भाषेत). 2017-05-03. Cite journal requires
|journal=
(सहाय्य) - ^ Wolfe, Alexandra (2018-12-07). "Saoirse Ronan Would Rather Be Knitting". Wall Street Journal (इंग्रजी भाषेत). ISSN 0099-9660. 2020-03-19 रोजी पाहिले.
- ^ Gilbey, Ryan (2013-05-27). "Saoirse Ronan: 200 years young". The Guardian (इंग्रजी भाषेत). ISSN 0261-3077. 2020-03-19 रोजी पाहिले.
- ^ Fragoso, Samuel. "saoirse ronan on growing up and moving to new york". i-D (इंग्रजी भाषेत). 2020-03-19 रोजी पाहिले.
- ^ "'Everyone talks about her accent but her mam and dad are as Dublin as can be' - friends of Saoirse Ronan". independent (इंग्रजी भाषेत). 2020-03-19 रोजी पाहिले.