सर्व्हायकल स्पाँडिलोसिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सर्व्हायकल स्पॉँडीलोसिस म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ, मानेच्या मणक्यांमधील गादीचे (यांना मणक्यांमधील चकत्या म्हणतात) खराब होणे, बाहेर येणे आणि त्याच्यावर कॅल्शियम साठून राहणे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो. यात मणक्यांतील अंतर कमी होणे, गादी झिजणे, मणका जागेवरून सरकणे (स्पाँडिलिस्थेसिस). नस दबली जाणे (नर्व्ह क्रॉम्प्रेशन) असे आजार यात होऊ शकतात.सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. 

सर्व्हायकल स्पाँडिलिसिसची लक्षणे

 • मान दुखणे, भोवळ येणे.
 • पूर्णपणे मान वळवता न येणे.
 • एक किंवा दोन्ही हातात मुंग्या येणे.
 • हात बधीर होणे, क्वचित डोकेदुखी.
 • हाताने वस्तू उचलता न येणे.

सर्व्हायकल स्पाँडिलिसिसची कारणे

 • सततचा वाहनांवरून प्रवास.
 • कॉम्प्युटर/ मशीनवर काम करणे.
 • व्यायामाचा अभाव,
 • ओझे उचलणे.
 • मानेवर आघात
 • कॅल्शियमची कमतरता

सर्व्हायकल स्पाँडिलिसिसची उपचार

 • औषधोपचार-वेदनाशामक औषधांनी तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर पुन्हा त्रास सुरू होतो.
 • कॉलर बेल्ट
 • व्यायाम
 •  मसाज 
 • आयुर्वेदिक औषधे
 • पंचकर्म-नस्यकर्म-नाकात विशिष्ट पद्धतीने औषधी द्रव्य सोडण्याची पद्धत.,मन्याबस्ती-मानेवर औषधीद्रव्यांचे पाळे तयार करून त्यात औषधीयुक्त तेल सोडतात.

सर्व्हायकल स्पाँडिलिसिसमध्ये काय काळजी घ्याल

 • डोक्याखाली जाड उशी घेऊ नये,
 • अधिक प्रवास,
 • ओझे उचलणे टाळावे.
 • योगा किंवा व्यायामास सुरुवात करावी .
 • कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी ठरावीक वेळेनंतर मानेच्या हालचाली कराव्यात.
 • आहारात कॅल्शियम व फॉलकि अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
 • मान जास्तवेळ पुढच्या किंवा एका विशिष्ट कोनात झुकवून कामे करणे टाळावे.

व्यायाम प्रकार 

 • हलासन,धनुर्वासन,चक्रासन,मत्स्यासन,भुजंगासन,नौकासन,उत्तरासन,उशत्रासान इ.