इन्फ्लुएन्झा
इन्फ्लुएन्झा | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० | J10, J11 |
आय.सी.डी.-९ | 487 |
मेडलाइनप्ल्स | 000080 |
इ-मेडिसिन | med/1170 |
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज | D007251 |
इन्फ्लुएंझा हा एक पक्षी,पशु व मानवामध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे.
इन्फ्लुएंझालाच संक्षिप्त रूपात " कॉमन फ्लू / फ्लू" हा प्रचलित शब्द आहे.
या लेखात काही ठिकाणी विषाणूच्या जागी वायरस हा शब्द वापरला आहे.
इन्फ्लुएंझाचा इतिहास
[संपादन]'इन्फ्लुएंझा' हा शब्द इटालियन भाषेतील इन्फ्लुएन्स या शब्दावरून आला आहे; ज्याचा अर्थ रोगाचे कारण असा होतो. याचमुळे इन्फ्लुएंझा हा स्वतः एक गंभीर आजार नसून अनेक आजारांचे कारण किंवा मूळ आहे असे म्हणता येईल.
लक्षणे
[संपादन]इन्फ्लुएंझाची लक्षणे जंतूंचे संक्रमण झाल्यापासून लगेचच दोन ते तीन दिवसात दिसतात.थंडी वाजणे, खाज सुटणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत. ह्यावेळी शरीराचे तापमान १०० ते १०३ फॅरेनहाइट पर्यंत असू शकते. काही अतिशय आजारी लोक दिवसातले निम्म्याधिक तास पडून किंवा झोपून असतात. त्यांचे पाठ व पाय खूप दुखतात.इतर काही महत्त्वाची लक्षणे म्हणजे:
- थंडी
- ताप
- हातपायदुखी, स्नायुंचे दुखणे,
- घश्यात दुखणे
- खोकला
- डोकेदुखी
- डोळ्यातुन पाणी येणे
आजाराच्या सुरुवातीला साधा ताप व फ्लू ह्यांमधील फरक कळणे अवघड असते. पण फ्लू शरीराचे जास्त तापमान व टोकाची क्षीणता ह्यांमुळे ओळखला जाऊ शकतो. अतिसार व अपचन हे वृद्ध माणसांच्या फ्लूची लक्षणे आहेत. तरीसुद्धा मुलांमध्ये सुद्धा ही लक्षणे आढळून येतात. प्रतिविषाणू औषधे आजाराच्या सुरुवातीला दिल्यास खूप उपयोगी ठरतात. वर दिलेल्या लक्षणांपैकी तापाबरोबर खोकला, कोरडा घसा व श्वास घेण्यातील त्रास हे निदानातील अचूकता वाढवण्यास मदत करतात.सध्याच्या उपलब्ध असलेल्या तपासण्या व उपचार ह्यांमध्ये बऱ्याच सुधारणा होत आहेत.अमेरिकेच्या रोग नियंत्रण व शमन संस्थेकडे सर्व अद्ययावत सुविधा व उपचार उपलब्ध आहेत.हे उपचार फ्लूच्या साथीच्या वेळी खूप उपयोगी असतील.
इथे फोटो पहा - http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9e/Symptoms_of_influenza.svg/300px-Symptoms_of_influenza.svg.png
आजाराची कारणे
[संपादन]इन्फ्लुएंझा हा आजार मुख्यतः इन्फ्लुएंझा विषाणू अ, इन्फ्लुएंझा विषाणू ब, इन्फ्लुएंझा विषाणू क यांच्यामुळे होतो. हे तिन्ही विषाणू ऑर्थोमिक्झोव्हायरीडे ह्या विषाणू कुटुंबात मोडतात.
आजाराचा प्रसार
हे विषाणू मुख्यत्वे तीन प्रकारांनी एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत जातो.
- थेट संक्रमण म्हणजे शिंकण्यातून उडलेले कण श्वासाद्वारे अथवा तोंडाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात जाणे
- हवेद्वारे संक्रमण म्हणजेच रोग्याच्या शिंकेतील, खोकल्यातील अथवा थुंकीतील अतिशय छोट्या कणांचा श्वासाद्वारे संसर्ग होणे
- दूषित पृष्ठभागांद्वारे हाताच्या हाताशी , नाकाशी वा तोंडाशी होणाऱ्या स्पर्शाद्वारे संसर्ग होणे.
हे विषाणू आपल्या शरीराच्या बाहेरही नीट राहू शकत असल्यामुळे आपल्या रोजच्या वापराच्या गोष्टी जसे नाणीनोटा, दरवाज्याच्या कड्या, विजेच्या उपकरणांची बटणे इ. द्वारेही पसरू शकतात ; त्यामुळे रोग्याला सर्व गोष्टी अतिशय काळजीपूर्वकरित्या हाताळल्या पाहिजेत. हे विषाणू प्लास्टिक अथवा धातुसारख्या टणक व अछिद्र पृष्ठभागांवर एक ते दोन दिवस ; कागदासारख्या वस्तुंवर १५ - २० मिनिटे तर मानवी त्वचेवर फक्त ५ मिनिटे टिकू शकतात. परंतु कफासारखे पदार्थ या विषाणूला तब्बल १७ दिवसांपर्यंत जगवू शकतात.
तपासणी
[संपादन]इन्फ्लुएंझाची चाचणी जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षीच्या हिवाळ्यात जगभरात काही कोटी लोकांना फ्लू होतो. फ्लूचे निदान करण्यासाठी रक्तचाचणी करावी लागते. या चाचणीला अधिकृतरित्या इन्फ्लुएंझा रॅपिड अ ॅंण्टिजेन टेस्ट असे म्हणतात. परंतु सामान्यतः ह्याला फ्लू टेस्ट असे म्हणतात.
विशेष माहिती
[संपादन]५० वर्षांच्या वरची माणसे तसेच तान्ही मुले व इतर वयोगटातील माणसे ज्यांना काही दीर्घकालीन आजार आहेत अश्या लोकांना इन्फ्लुएंझाच्या माध्यमातून ब्रॉङ्कायटिस व सायनस् इ. त्रास ओढावू शकतात.
यापूर्वी काही इन्फ्लुएंझा विषाणूंनी निर्माण केलेल्या साथी
[संपादन]- एच १ एन १ (H1N1) : ह्या विषाणूमुळे १९१८ साली स्पॅनिश फ्लू (बळींची संख्या - नक्की माहित नाही. अंदाज २ कोटी ते १० कोटी पर्यंत आहेत) व २००९ साली बहुचर्चित अश्या स्वाइन फ्लू (बळींची संख्या - १८०००) ह्या आजारांची साथ आली होती.
- एच २ एन २ (H2N2) : ह्या विषाणूमुळे १९५७ साली एशियन फ्लूची साथ आली होती. (बळींची संख्या - १० लाख ते १५ लाख अंदाजे)
- एच ३ एन २ (H3N2) : ह्या विषाणूमुळे १९६८ साली हॉंगकॉंग फ्लूची साथ आली होती. (बळींची संख्या - ७ लाख ते १० लाख)
- एच ५ एन १ (H5N1) : या विषाणूमुळे २००४ साली खूप गाजावाजा झालेल्या बर्ड फ्लूची साथ आली होती.
टीप : हे सर्व विषाणू इन्फ्लुएंझा विषाणूंच्या अ गटातील आहेत.
उपचार
[संपादन]अशा वेळी रुग्णाला पूर्ण आरामाची, खूप द्रव पदार्थांची गरज असते(दारू व तंबाखू सारखे पदार्थ सोडून). फ्लू मुळे होणाऱ्या ताप ,स्नायू दुखी यांचे प्रमाण कमी करण्यासाठी paracetamol या औषधाचा उपयोग करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेव्हा फ्लूची लक्षणे लहान मुलांपासून ते २० वर्षाच्या मुलांपर्यंत सापडतात तेव्हा aspirin हे औषध देणं टाळावं खास करून जेव्हा "इन्फ्लुएंझा प्रकार ब"चे संक्रमण होते. ह्या औषधामुळे Reye's syndrome हा प्राणघातक यकृताचा रोग होऊ शकतो. हा रोग विषाणूंमुळे होतो ,त्यामुळे ह्या वर प्रतिजैविक औषधांचा काहीही परिणाम होत नाही.तरी पण ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानीच घ्यावीत. ह्या औषधांमुळे दुय्यम संसर्गाचा (जीवाणूंपासून होणारा न्युमोनियाचा) धोका टळतो.
- विषाणूप्रतिबंधक औषधे
आपण इन्फ्लुएंझावर २ प्रकारची विषाणूप्रतिबंधक औषधे वापरू शकतो. १. neuraminidase inhibitors (oseltamivir = tamiflu आणि zanamivir = Relenza) २. M2 protein inhibitors (adamantane derivatives).
फ्लूवर आत्ता तरी 'Neuraminidase inhibitors' हे औषध वापरला जातं (कारण ते कमी विषमय आणि जास्त परिणामकारक असतात).२००९ मध्ये WHOनी असं सांगितलं कि फ्लूची लक्षणे दिसू लागल्यास, अत्यधिकधोका असलेल्या व्यक्ती म्हणजेच गरोदर स्त्रिया,२ वर्षा खालील मुले व श्वसनविकार असलेली माणसे यांनी वरील विषाणूप्रतिबंधक औषधे घेणे लगेच सुरू करावे.
neuraminidase inhibitors ओसेल्तामिवीर (oseltamivir) आणि झानामिवीर (zanamivir) ही दोन्ही औषधे इन्फ्लुएंझा प्रकार 'अ' आणि 'ब' वर परिणामकारक ठरतं.
M2 protein inhibitors अमंटाडाईन(amantadine) आणि रीमंटाडाईन(rimantadine) ही औषधे viral ion channel मध्ये अडथळा होतात आणि आपल्या पेशीना संक्रमित होण्यापासून वाचवतात.ही औषधे फक्त इन्फ्लुएंझा प्रकार 'अ'ची लक्षणे दिसताच रुग्णाला दिली गेली तरच उपयोगी पडतात पण हीच औषधे इन्फ्लुएंझा प्रकार 'ब' वर परिणाम दाखवत नाहीत कारण प्रकार 'ब' विषाणूंमध्ये M२ रेणू नसतात.
चायना आणि रशिया या देशांमध्ये इन्फ्लुएंझाचा प्रसार होण्यासाठी, मुबलक प्रमाणात Amantadine असणं कारणीभूत ठरलं. यामुळे इन्फ्लुएंझा विषाणूंची प्रतिकारक शक्ती वाढली.
प्रतिबंध
[संपादन]इन्फ्लुएंझाची लस
विश्व आरोग्य संघटन म्हणजेच World Health Organisation व अमेरिकेच्या रोग नियंत्रण व शमन संस्था ह्यांने वृद्धांना, बालकांना, हृदयविकार असलेल्यांना, मधुमेह असलेल्यांना व अस्थमाच्या त्रासाने पिडीत असलेल्या लोकांना इन्फ्लुएंझा लस वापरण्याचा सल्ला दिला आहे. ही लस शरीरातील विषाणूंची संख्या कमी करण्यास मदत करते.ह्या लसीने दोन वर्षावरील मुलांवर सुद्धा परिणाम दाखविला होता.पण हे अजूनही सिद्ध झालेले नाही कि ह्यामुळे अस्थमा वर उपचार करता येतात. जे लोक एड्स ने पिडीत आहेत, त्यांमध्ये एक कमी अंशतेचा फ्लू असल्याचेही सिद्ध झाले आहे. आरोग्य देखभाल कार्यकर्त्यांना स्वास्थ्य विज्ञानाचे शिक्षण देऊन त्यांची राहणी सुधारल्यावर रुग्णांची परिस्थिती सुधारण्यास मदत होते हे आर्धावत सिद्ध झाले आहे. विशेषतः जे कार्यकर्ते वृद्ध लोकांसाठी काम करतात. वायरसच्या उच्च उत्परिवर्तन दरामुळे ही लस फक्त काही वर्षच काम करते. दर वर्षी, आधीच्या वर्षाचे आकडे बघून जागतिक आरोग्य संघटना असे वायरस शोधते जे येत्या दिवसात सक्रिय राहू शकतात. ज्यामुळे औषधे तयार करणारे कारखाने त्यासाठी पाऊले उचलू शकतात. ती लस त्या काळात चालू असलेल्या काही फ्लूस साठी पुन्हा तयार केली जाते; सर्व फ्लूस साठी नाही. उत्पादकांना काही कोटी डोस तयार करायला ६ ते ७ महिने लागतात. त्यामुळे त्या काळात नवीन उदयाला आलेला फ्लू बलशाली होतो. लसीकरणाच्या काही दिवस आधी रोग झाल्यावर लसीचा परिणाम होण्यासाठी कमीत कमी दोन आठवडे लागतात. लसीकरणामुळे शरीर रोग झालेले नसतानाही रोग झाल्यासारखे प्रतिक्रिया देते.Allergy ही सर्वात धोकादायक प्रतिक्रिया असू शकते. पण ह्या खूप दुर्मिळ प्रतिक्रिया असतात.
नियंत्रण
फ्लू वायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी काही सोप्या गोष्टी:
- आपल्या नाकाला तोंडाला डोळ्याला हात लावू नका
- सतत आपले हात साबण लावून स्वच्छ धुणे
- आजारी असलेल्या लोकांपासून दूर राहणे
- आपण आजारी असाल तरी घरीच थांबणे
- शिंकताना व खोकताना नाक व तोंड झाकणे
- सार्वजनिक जागेत थुंकू नका
- बाहेर जाताना तोंडावर मास्क लावा
- सिगरेट ओढणा-यांबरोबरच त्याचा वास घेणा-यांनाही त्रास होतो म्हणूनच सार्वजनिक जागेत सिगरेट ओढू नये
- घरातल्या घरात जंतू पसरण्यापासून रोखण्यासाठी घर साफ ठेवा
इतर प्राण्यांमधील इन्फ्लुएंझा
[संपादन]माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्येसुद्धा फ्लू असू शकतो व तो माणसांप्रमाणेच एकमेकांकडे पसरतो.सर्वात जास्ती हा पक्ष्यामध्येच सापडतो. मागील काही वर्षात स्वाइन फ्लूची साथ आली होती.
पक्ष्यांमधील फ्लू
पक्ष्यांमधील फ्लूची लक्षणे वेगवेगळी व अविशिष्ट असतात. काही लक्षणे म्हणजे अंड्यांच्या उत्पत्ती मध्ये घट, झालरदार पंखांची पिसे, व उडताना कमी वेग किंवा जास्ती न उडणे(दम लागल्यामुळे). ह्यामुळे तपासणी करायला अडथळे येऊ शकतात. अशियन H९N२ हा पोल्ट्री साठी सर्वात घातक असा वायरस आहे ह्यामुळे शेतकऱ्यांना व पोल्ट्री फार्मर्सला भरपूर आर्थिक नुकसान होऊ शकते. H5N1 फ्लू म्हणजेच अवैवन फ्लू किंवा बर्ड फ्लू हा आता जगभर पसरत आहे. त्यामुळे ह्याचा धोका सर्वच पक्ष्यांना आहे. पण अजून तरी माणसांमध्ये हा वायरस प्रसारित होण्यासाठीचे गुण नसल्यामुळे माणसाला हा फ्लू होण्याचा धोका नाही.
स्वाइन फ्लू
स्वाइन फ्लू हा H1N1 या वायरस मुळे होतो. हा वायरस डुक्कर ते माणूस व माणूस ते माणूस असा वाहू शकतो . अमेरिकेतील मेक्सिको या शहरात ह्या वायरसचे संक्रमण झालेल्या एका डुकराला माणसाने मांसाहारासाठी वापरले म्हणून त्याला स्वाइन फ्लू झाला व त्यामुळे तेथील अनेक लोकांना झाला. २००९ साली आलेल्या स्वाइन फ्लूच्या लाटेचे हेच कारण होते असेही लोक म्हणतात.हा फ्लू झाल्याची माणसांतील लक्षणे म्हणजे:
- सुस्ती येणे
- ताप, सर्दी, खोकला
- श्वास घेण्यास त्रास
- कमी भूक
- वजन कमी होणे
डुकरांना फ्लू झाल्यास त्यांचे वजन ३ ते ४ आठवड्यात १५ ते २० किलोने कमी होते. ह्यामुळे गर्भपात सुद्धा होतो.