सरंगा
Appearance
सरंगा हा एक प्रकारचा मासा आहे पुष्कळ बाबतीत या माशांचे रुपेरी पाँफ्रेटशी साम्य आहे, परंतु रंग मात्र त्याच्यापेक्षा निराळे असतात. हा मासा गडद करड्या रंगापासून तो फिक्कट तपकिरी करड्या रंगापर्यंत कोणत्याही रंगछटेचा असू शकतो. खालच्या बाजूचा रंग रुपेरी असून त्यात धातूच्या चमकेप्रमाणे छटा असतात. सर्व शरीरावर तपकिरी ठिपके असतात. पिल्लांचे पर काळे असतात. नैर्ऋत्य मॉन्सूनच्या काळात मलबार किनाऱ्यावर हे मासे विपुल असतात. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागातही ते मोठ्या प्रमाणावर सापडतात.]