सय्यद शाहनवाझ हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सय्यद शहानवाझ हुसेन

सय्यद शहानवाझ हुसेन (डिसेंबर १२, इ.स. १९६८- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील किशनगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये नागरी विमानवाहतूकमंत्री आणि वस्त्रोद्योगमंत्री म्हणून काम बघितले. त्यांचा इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला. पण ते इ.स. २००६ मध्ये बिहार राज्यातील भागलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला.