Jump to content

सदस्य चर्चा:Vidhin Kamble

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्राम्हणी मैना. (Brahminy मैना किंवा Black headed मैना) शास्त्रीय नाव: Sturnus pogodarum

ब्राम्हणी मैनेला पोपई मैना, भांगपाडी मैना, म्हणूनही संबोधले जाते. आशियाई देशात आढळणारा हा पक्षी असून भारत, पाकिस्तान, अफगाणिस्थान, नेपाळ, श्रीलंका आदि देशात हा पक्षी प्रामुख्याने आढळतो. ब्र्हामनी मैना हा पक्षी आकाराने साळुंकी या पक्ष्यापेक्ष्या थोडा छोटा असतो. डोक्यावर शेंडीसारखा मागे वळलेला पिसांचा तुरा असतो. नर-मादी दिसायला एकसारखे असतात. अंगावरची पिसे तांबूस खाकी रंगाची असतात. चोचीच्या शेवटी निळसर रंग असतो. साळुंकी सारखे विविध आवाज करण्यात हा पक्षी पटाईत असतो. निवांतक्षणी झाडावर बसून मंजुळ व सुरेल आवाज करत बडबड करीत असतो. आवाजामध्ये विविध पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करतो. ब्राम्हणी मैना हा पक्षी पानगळी जंगले, शेतीप्रदेश व मनुष्यवस्तीच्या आसपास वावरणारा पक्षी असून मिश्राहारी आहे. नेहमी किडे खून गुजराण करणारा हा पक्षी वड, पिंपळ, बोर, चेरी आदी झाडांची फळांवर तव मारताना दिसतो. पोपई मैनाची घरटी मानवीवस्तीचा आसपास केलेली आढळतात. भिंतीना असणाऱ्या छिद्रात, घरांच्या वळचणी किंवा छप्पर इत्यादी ठिकाणी सुद्धा केलेली आढळतात. अलीकडे गवत काड्यांची छपरांची जागा सिमेंटचे पत्रे व स्ल्याबनी घेतल्यामुळे पर्याय म्हणून छतावरचे पाणी वाहून जाण्यासाठी लावलेल्या नळीमध्ये अनेकवेळा आपली घरटी करतात. त्याचबरोबर कृत्रिम घरट्यांचाही वापर चांगल्या पद्धतीने करत असल्याचे दिसून येते. कृत्रिम घरटी हा आता एक चांगला पर्याय आहे. काही पक्षिमित्र आपल्या घरांना छोटी मडकी किंवा लाकडी घरटी टांगून मैनेसाठी जागा करून देत आहेत. त्यामुळे या मैनाची संख्या वाढताना दिसून येत आहे. पोपई मैनेचा विणीचा हंगाम मार्च ते सप्टेंबर आहे. चिमण्यांचासुद्धा विणीचा हंगाम याच काळात असल्याने घरटी बांधताना चिमणी आणि ब्राम्हणी मैना यांच्यात घरट्यांसाठी जागा मिळवताना बरीच स्पर्धा चालू असते हे मी अनुभवले आहे. . या काळात नर मादी झाडावर बसून गाणी म्हणत असतात. नर-मादी दोघेही घरटे बनवण्याच्या कामात व्यस्त असतात. गवताच्या काड्या, झाडांची पाने, पिसे व कापूस इत्यादी गोष्टींचा वापर घरटे बनवण्यासाठी केला जातो. मादी फिक्कट निळसर रंगाची ३ ते ४ अंडी घालते. १२ ते १४ दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर येतात.

धाविक Indian Courser (Cursorius coromandelicus)[संपादन]

धाविक इंग्रजी नाव: Indian Courser शास्त्रीय नाव : (Cursorius coromandelicus) धाविक हा दिसायला टिटवीसारखा असून आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारा हा पक्षी जमिनीवर नुसता धावत असतो. का कोणास ठाऊक पण हा सतत पळत असतो. म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले असावे. धाविक पक्ष्याला गेडराही म्हणतात इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. धाविक हा पक्षी समूहाने रहाणारा असून १० ते २० पक्ष्यांच्या गटागटाने ते गवतात फिरताना आढळतात. ते प्रामुख्याने गवतावरील किड्यांवर ताव मारतात. तसेच वाळवी सुधा मोठ्या प्रमाणावर टिपत असतात. भागात गवताळ माळरानवर अशा ठिकाणी वावरतो कि ज्या ठिकाणी गवत त्याच्या उंची पेक्षा जास्त नाही. त्याचबरोबर अर्धवाळवंटी प्रदेश हे त्यांचे अधिवास असून धाविकाचा रंग अधिवसाला साजेसा असतो. मातकट तपकिरी रंग, खालच्या बाजूला तांबूस व काळा रंग असतो सफेद व लांब पाय, डोकेगडद तांबूस असून,डोळ्यांवर काळी-पांढरी पट्टी असते. यामुळे ते सहजपणे आसपासच्या परिसराशी बेमालूम मिसळून जातात. धाविकाचा विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट असून हे पक्षी उघड्यावरच घरटे बनवतात. मादी २ ते ३ गोलाकार अंडी घालते. अंड्याचा रंग परिसराशी मिळताजुळता असतो. त्यामुळे ती सहज दृष्टीस पडत नाहीत. अंड्यातून पिले बाहेर पडल्यावर नर-मादी मिळून त्यांचे संगोपन करतात. पिलांचा रंग ही भोवतालच्या परिसराशी एकरूप होण्यासारखा असतो. काही धोका असल्यास पिल्ले कसलाही आवाज न करता गप्प बसून राहतात. पिल्ले एका आठवड्यामध्ये आईवडिलांशिवाय राहण्यास सक्षम होतात. मानवी हस्तक्षेपामुळे सध्या धाविक पक्षांची संख्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. इमारतींचे बांधकाम, रस्त्यांची निर्मिती, औध्योगीकरण इ. मुळे त्यांच्या अधिवासास मोठी हानी पोहचत आहे. दुर्दैवाने माळरान निरुपयोगी समजले जाते. त्याचबरोबर वाढत्या शहरी करणामुळे माळरानावर आढळणाऱ्या पक्ष्यामध्ये मोठया प्रमाणावर घट होत आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वार्षिक नोंदीमध्ये भारतातील १८० प्रजातींच्या पक्ष्यांवर अस्तित्वाचे संकट उभे राहिले असून गेल्यावर्षीपेक्षा आठ प्रजातींची त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या अधिवसाला धक्का पोहचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांच्या अस्तित्वशिवाय माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही.


Dr. Vidhin Kamble sangola Solapur Maharashtra