Jump to content

सदस्य:Vidhin Kamble

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ते तुझे सरकार तू त्याचा लाभार्थी ------- भाग -२

लेखक ; प्रा. डॉ विधिन कांबळे.

कथेतील पात्र परिचय

वृक्षराज             –     वड

लिम्बाराम           –    लिंबाचे झाड

घुम्या              –    घुबड

गोल पायाचे छोटे राक्षस      –     छोटी वहाने

गोल पायाचे मोठे राक्षस -    ट्रक

यांत्रिक हात         -     जेसीबी

साप               -    डांबरी सडक  

हळूहळू अंधार दाटू लागला. सर्वत्र विचित्र अशी शांतता होती. एवढ्यात झाडाच्या फांदीवर काहीतरी फडफड झाली आणि एक भला मोठ्या डोळ्याचा पक्षी टोकावरच्या फांदीवर येऊन बसला. तो पक्षी लिंबाच्या फांदीवर बसताच ती कटकन मोडली. पुन्हा फडफड झाली. आणि तो पक्षी पुन्हा सावरत दुसऱ्या फांदीवर बसला. ते मोठ्या डोळ्यांचे भले मोठे घुबड होते. एवढ्यात लिंब बोलू लागला.

लिंब- कशाला आला आहेस माझ्याकडे? तुला सांगितले होतेना. माझ्याकडे येऊ नको म्हणून.  का आलास मला त्रास द्यायला. चल बरं चालतो हो तुझ्या नेहमीचा वडाच्या झाडावर.

घुबड - माझं थोडंस ऐकून घेशील का? (घुबड विनवणीच्या सुरात बोलू लागले.)

लिंब - मला तुझं काही एक ऐकायचे नाही. तू आपला जा बरं तुझ्या नेहमीच्या जागेवर. आज मला एकांत

हवा आहे. (झाड रागाने म्हणाले.)

घुबड – (केविलवाण्या आवाजात) लिम्बाराम ! कुठं जाऊ मी. तू मला जिथं जायला सांगतो आहेस. ते

झाड आता तिथं नाही. ते झाड माणूस नावाच्या राक्षसाने केव्हाच जमीनदोस्त केलय. आता मला फक्त तुझाच आधार आहे. कारण फक्त तूच एकटा या भयाण नागमोडी काळ्या सापाच्या कडेला उभा आहेस. आता तू आणि मी दोघेच उरलो आहोत. (घुबडाचा गळा भरून आला होता. त्याचे डोळे पाण्याने गच्च भरले होते.)

(झाड आधीच मनातून भेदरले होते. त्याला काय बोलावे सुचत नव्हते. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्याचा ही कंठ दाटून आला होता. ते डोळे मिटून स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करीत होते. पुन्हा घुबडाने झाडाला आवाज दिला.)

घुबड-  लिम्बाराम, बोलत का नाहीस. अजून तुझा माझ्यावरचा राग गेला नाही का? त्या वडाच्या

झाडाची स्तुती करायचो म्हणून तू माझा राग करायचास. त्या झाडणे अनेक वादळाशी सामना केला होता. माझ्या कित्येक पिढ्यांना त्याने आधार आणि आसरा दिला होता. त्याच झाडाच्या ढोलीत मी लहानाचा मोठा झालो होतो. त्या झाडाचे माझ्यावर उपकार होते. म्हणून मला वडाच्या झाडाची आपुलकी वाटत होती. म्हणून मी त्याचे गुणगान करायचो. ताचे उपकार होते माझ्यावर.

अरे लिम्बाराम, मी माणूस नाही; केलेले उपकार विसरायला. जरी तू माझा राग-राग करायचा तरीही मी अधून मधून तुझ्याकडे यायचो. तुला चिडवायला. मग तू चिडला की मलाही खूप मजा वाटायची. लिम्बाराम तू बोलत का नाहीस. खरंच माझा त्रास वाटतो तुला. ठीक आहे. जातो बाबा. वाट फुटेल तिकडे आणि नशीब नेईल तिकडे. पुन्हा नाही येणार त्रास द्यायला. (घुबड उडण्याच्या तयारीत असतानचा झाडाणे आवंढा गिळला व झाड म्हणाले)

झाड-  थांब घुम्या, जाऊ नकोस. आधीच मी एकटा पडलोय. तू गेलास तर मग मी कुणाशी बोलू. तू

आलास; खूप बरं केलं. घुम्या मित्रा, खरं सांगायचं तर मला तुझा कधीच राग येत नव्हता. मी मुद्दामच तुझ्यावर रागवायचे नाटक करायचो. या सापाच्या पाठीवरून छोटी-मोठी गोल पायाचे राक्षस येत-जाता कर्कश आवाज करायची. या यंत्राचे डोळे आग ओखायचे. पण त्याचे चटके बसत नसले तरी निवांत झोप लागत नसायची. तुझा आवाज आला की; मी समजायचो,  आता बहुतेक शांतता सुरु झाली आहे. मग कुठे डोळा लागायचा. तुझा आवाज कानावर पडल्याशिवाय झोपच लागत नसायची.