सदस्य चर्चा:Sidmarathe
![]() |
Sidmarathe, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Sidmarathe, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६९,८९२ लेख आहे व २९७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १६:२०, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)
लेखन सहाय्य[संपादन]
श्री./श्रीमती. पहारा आणि गस्त, सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. मी केलेल्या लेखनात माझा कुठलाही हितसंघर्ष (conflict of interest) नाही. माझ्या कडून असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मला सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.
मला मदत हवी आहे!
मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
केदार कृष्णाजी लेले (डिसेंबर २०, १९७३ - ) हे मराठी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबईतील उपनगर डोंबिवली येथे एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल कृष्णाजी नरहर लेले हे व्यवसायाने इंजिनियर (क्रेन इन्स्पेक्टर) होते.
त्यांनी डोंबिवलीतील साऊथ इंडियन असोसिएशन इंग्रजी माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उल्हासनगरच्या चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळवली. त्यानंतर सन १९९५-१९९७ मध्ये पुण्यातील वाडिया आणि डी.एस. आर.एफ मधून कॉम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे तरी त्यांच्या लेखांत इंग्लिश शब्द नगण्य असतात.
'ऐतिहासिक लॉर्डसची द्विशताब्दी', 'स्वित्झर्लंडमधील गोथार्ड बेस रेल्वे बोगदा’, ‘मुंबईशी बॉलीवूडचे अतूट नाते कायम’, ‘गुजारीश आणि जागतिक चित्रपट’ तसेच स्मिता पाटील वर लिहिलेला ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...’ हे त्यांचे काही गाजलेले लेख. तसेच ‘आकाशभरारी’ आणि ‘विम्बल्डनच्या हिरवळीवरून ...!’ हे त्यांचे गाजलेले स्तंभलेख.
क्रीडा निपुण समीक्षक ह्या नात्याने टेनिसच्या पंढरीवर म्हणजेच विम्बल्डनवर त्यांनी लिहिलेल्या “विम्बल्डनच्या हिरवळीवरून ...!” या लेखमालेचे पुस्तकामध्ये रूपांतरण म्हणजे क्रीडा साहित्यात मोलाचे योगदान.