सदस्य चर्चा:Nilima Bhagwatkar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Nilima Bhagwatkar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Nilima Bhagwatkar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१६० लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :



मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २३:०२, १७ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

ईशा सिंग (जन्म १जानेवारी २००५) ही भारताची एक हौशी नेमबाज आहे. २०१९ साली जर्मनीमधील सूल येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले.[संपादन]

ईशा सिंग
ईशा सिंग (जन्म १जानेवारी २००५) ही भारताची एक हौशी नेमबाज आहे. २०१९ साली जर्मनीमधील सूल येथे झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले. त्याशिवाय आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल (AP60W) आणि मिश्र गटात १० मीटर एयर पिस्टल (APMIX) अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली. [1]

त्याशिवाय २०१९ साली तायवान येथे झालेल्या आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक पटकावले. [2]

२०१८ साली अवघ्या १३ वर्षांची असताना ती १० मीटर एयर पिस्टल प्रकारात ईशा राष्ट्रीय चॅम्पियन झाली. १० मीटर एयर पिस्टल व्यतिरिक्त ईशा २५ मीटर स्टँडर्ड पिस्टल आणि २५ मीटर पिस्टल या प्रकारामध्येही खेळते. [3][1]

टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताच्या मुख्य नेमबाजी संघात तिची निवड झाली आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे १ जानेवारी २००५ ला ईशा सिंगचा जन्म झाला. मोटरस्पोर्ट्समधील रॅली ड्रायव्हर असलेले सचिन सिंह आणि श्रीलता सिंग यांची ती एकुलती एक मुलगी आहे. लहानपणापासूनच ईशा बॅडमिंटन, गो कार्टिंग, टेनिस, स्केटिंगसारखे खेळ खेळत असे. पण नऊ वर्षांची असताना तिने नेमबाजीमध्ये अधिक रस घेण्यास सुरुवात केली. हैदराबाद येथील गाचीबावली स्टेडियममधील नेमबाजी प्रशिक्षण केंद्राला भेट दिल्यानंतर तर तिने नेमबाजी करण्याचाच निर्धार केला आणि तिने एयर पिस्टल या प्रकाराची निवड केली.

घराजवळ कुठलेही प्रशिक्षण केंद्र नसल्याने ईशा घरापासून किमान तासभर अंतरावर असलेल्या स्टेडीयममध्ये प्रारंभिक प्रशिक्षणासाठी जात असे. घरच्या घरी सरावासाठी तिच्या वडिलांनी कागदापासून एक लक्ष्य (टार्गेट) तयार करून एक लहान रेंज बनविले. कालांतराने तिने माजी ऑलिम्पिक पदक विजेते गगन नारंग यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्या महाराष्ट्रातील पुणे येथील गन फॉर ग्लोरी अकादमीत प्रवेश घेतला.[3]

ईशा सांगते तिला या खेळावरप्रतिच्या प्रेमामुळे बालपणीच्या अनेक गमतीजमतींना मुकावे लागले, पण नेमबाजीवर असलेल्या तिच्या प्रेमामुळे ती नेमबाजीवर तिचे संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकली. आपल्या यशाचे श्रेय ईशा तिच्या पालकांकडून मिळणाऱ्या प्रेरणेला देते. ईशाच्या प्रशिक्षणादरम्यान सोबत राहता यावे, म्हणून तिच्या वडिलांनी मोटरस्पोर्ट्समधून निवृत्ती घेतली.[9] जेव्हा बापलेकी कुठल्या स्पर्धेसाठी बाहेर असायचे, तेव्हा तिची आई श्रीलताने या त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे क्रीडा साहित्याचे दुकान सांभाळले.[3]

ईशाने कोव्हिड-19 आरोग्य संकटाशी लढण्यासाठी उभारलेल्या ‘पीएम-केअर्स’ कोषामध्ये 30 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्धार केला आहे. [5]

   ईशा सांगते की प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (18 वर्षाखालील व्यक्तींसाठी असलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार) स्वीकारणे हा तिच्यासाठी सर्वोच्च सन्मानाचा क्षण होता.[9]

व्यावसायिक कारकीर्द

वर्ष 2014मध्ये ईशाने नेमबाजीला सुरुवात केली आणि वर्षभरातच तिने तेलंगणाच्या राज्यस्तरीय विजेतेपदाला गवसणी घातली. पण ती २०१८ मध्ये राष्ट्रीय प्रकाशझोतात आली . केरळच्या तिरुवनंतपुरम येथे झालेल्या ६२व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने कॉमनवेल्थ गेम्स व युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती मनु भाकर आणि आजवर अनेक पदकांची मानकरी असलेल्या हिना सिद्धू सिंधु यांनाही मागे टाकत, १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. यामुळे ती १३ वर्षाच्या वयात वरिष्ठ गटातील सर्वात तरुण विजेती ठरली. या स्पर्धेतील एकूण ५ सुवर्ण पदकांपैकी तिने युवा आणि कनिष्ठ श्रेणीतील दोन पदके पटकावली. आणि यातूनच भारतासाठी जागतिक स्पर्धांमध्ये पदके मिळविण्यासाठीचा तिचा आत्मविश्वास बळावला. [3][6][7][9]

राष्ट्रीय स्पर्धेतील या कामगिरीने मिळवलेला आत्मविश्वास तिला २०१९मधील स्पर्धांसाठी कामी आला. जानेवारी २०१९मधील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तिने १७वर्षांखालील गटाचे १० मीटर एयर पिस्टल या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. [8]

मार्च-एप्रिल २०१९ मध्ये तायवानमधील ताओयॉन येथे झालेल्या आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्ये तिने कनिष्ठ गटातील १० मीटर एयर पिस्टल प्रकारातले सुवर्णपदक मिळविले. [8]

जुलै २०१९ मध्ये जर्मनीतील सूल येथे पार पडलेल्या आयएसएसएफ कनिष्ठ विश्वकप स्पर्धेत तिने १० मीटर एअर पिस्टलच्या महिला गटात रौप्य पदक जिंकले आणि मिश्र गटात कांस्यपदक. मात्र २५ मीटर स्टॅंडर्ड पिस्टल व २५ मीटर पिस्टल स्पर्धांमधील तिलाअनुक्रमे २२व्या व ४१व्या स्थानापर्यंतच मजल मारता आली. [1]

नोव्हेंबर २०१९मध्ये कतार मधील दोहा येथे झालेल्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने १० मीटर एयर पिस्टलच्या कनिष्ठ श्रेणीतील एकेरी आणि मिश्र अशा दोन्ही स्पर्धांमधील सुवर्णपदक यांनी आपल्या नावे केले. [1]

टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारताच्या कोर संघात तिची निवड झाली आहे. फेब्रुवारी २०२० मधील पात्रता फेरीत तिला अंतिम दोनमध्ये स्थान मिळवता आले नाही, मात्र दर चार वर्षांनी होणारी ही जागतिक स्पर्धा कोव्हिड-19मुळे पुढे ढकलली गेल्यामुळे ईशा सिंगला आणखी एक संधी मिळवून दिली आहे. [4]

सध्या तिचे लक्ष्य युथ ओलंपिक २०२२, कॉमनवेल्थ गेम्स २०२२, आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ आणि ऑलम्पिक गेम्स २०२४ या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे. [9]

संदर्भ

https://www.issf-sports.org/athletes/athlete.ashx?personissfid=SHINDW0101200501[1] https://scroll.in/field/918393/asian-airgun-championships-sarabjot-singh-esha-singh-win-gold-in-junior-air-pistol#:~:text=Junior%20pistol%20shooters%20Sarabjot%20Singh,Championships%202019%20in%20Taoyuan%2C%20Taipei. [2] https://indianexpress.com/article/sports/sport-others/esha-singh-shooting-commonwealth-games-youth-olympics-champion-5471787/ [3] https://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/shooting/esha-singh-makes-nrai-core-training-group/articleshow/76656263.cms [4] https://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/shooting/15-year-old-pistol-shooter-esha-singh-busy-practising-dry-firing-during-lockdown/articleshow/75345579.cms [5] https://www.bhaskar.com/sports/anya-khel/news/esha-singh-winning-gold-in-10m-air-pistol-junior-women-s-events-of-12thasian-airgun-champi-01514963.html [6] https://scroll.in/field/903960/shooting-nationals-teenager-esha-singh-pips-manu-bhaker-to-clinch-triple-crown [7] https://sportstar.thehindu.com/shooting/esha-singh-father-asian-shooting-championships-khelo-india-youth-games/article30471871.ece [8] https://www.bbc.com/marathi/india-55922623 [9]


Right hand box

पूर्ण नाव: ईशा सिंग

नागरिकता: भारतीय

जन्म: 1 जानेवारी 2005 (वय 16 वर्षे)

जन्म स्थान: हैदराबाद, तेलंगणा

क्रीडा प्रकार: महिला हौशी नेमबाजी

स्पर्धा

10 मीटर एयर पिस्टल, 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्टल, 25 मीटर पिस्टल

पदके

प्रतिनिधित्व: भारत

विश्व चॅम्पियनशिप: आयएसएसएफ जुनियर विश्वकप 2019 10 मीटर एयर पिस्टल महिला गटात रौप्यपदक 10 मीटर एयर पिस्टल मिश्र गटात कांस्यपदक

आशियाई एअर गन अजिंक्यपद 2019: 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक

आशियाई अजिंक्‍यपद 2019 कनिष्ठ श्रेणी 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात एकेरी व मिश्र गटात सुवर्णपदके