सदस्य चर्चा:Krushnarjun
पुष्कळ दिवस मनात होते. अखेरीस चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर २ मार्च २०२२ ला विकिपीडियात संपादन व नवे लेख लिहिणे सुरू केले आहे म्हणून आनंदात आहे. Krushnarjun (चर्चा) १८:५८, ३ एप्रिल २०२२ (IST)
ग्रंथ परिचयाची चौकट
[संपादन]उत्क्रांती एक महानाट्य या लेखाद्वारे मराठी विकिपीडियात ग्रंथांचा परिचय करून देणारा लेख कसा लिहावा यासाठीची एक चौकट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. Krushnarjun (चर्चा) १७:००, १८ एप्रिल २०२३ (IST) मराठीतील ग्रंथांसंबंधीच्या विकिपीडियातील लेखांची रूपरेषा: १. एक किंवा अनेक लेखक, ग्रंथाचे स्वरूप - कादंबरी, लघुकथांचा संग्रह, खंडकाव्य, कवितासंग्रह, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, धर्मग्रंथ, पौराणिक कथा, प्रवास वर्णन, चित्रकला, नृत्यकला, नाट्यकला, इतिहास- भूगोल- गणित- विज्ञान- वैद्यक- यांत्रिकी- राजकारण-अर्थकारण- धर्म- समाजव्यवस्था- शासनव्यवस्था इत्यादी विषयांचे विवेचन, इतर वैचारिक लेखन. २. ग्रंथाची तोंड ओळख ३. ग्रंथ लेखनाची पार्श्वभूमी - केव्हा लिहिला, त्यामागच्या प्रेरणा, कोणी, केव्हा, प्रकाशित केला ४. ग्रंथातील प्रतिपादन/ साहित्य सामुग्री - कशाचा समावेश आहे याचा तपशील ५ ग्रंथाला मिळालेला प्रतिसाद, प्रशस्ती इत्यादी
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.