सदस्य चर्चा:Kalechinmay
नमस्कार
[संपादन]नमस्कार चिन्मय, ग्राझ वर आपण स्वतंत्र लेख वा इथली माहिती कॉपीपेस्ट करू शकता. Dakutaa ११:४८, २३ जानेवारी २००९ (UTC)
ग्राझ
[संपादन]ग्राझ हे ऑस्ट्रीया देशाच्या पूर्वे-दक्षिण भागात 'मुर' या नदीवर वसलेले शहर आहे. ग्राझ हे ऑस्ट्रीयामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर असून त्याची लोकसंख्या २९०००० (सन २००८) इतकी असून ती स्टायरमार्क या राज्याची राजधानी आहे.
ग्राझमध्ये असलेला विविध प्रकारच्या ६ विद्यापिठांमुळे येथे जवळपास ४४००० विद्यार्थी राहतात आणि म्हणून ग्राझला 'शैक्षणिक शहर' सुद्धा म्हणले जाते.
शहराचा मध्यवर्ती भाग खूप जूना असून तो अत्यंत्य चांगल्या प्रकारे जपलेला आहे. त्याचमुळे ग्राझ ला जागतिक महासंघाने 'आंतरराष्ट्रीय वारसा' असलेले शहर म्हणून घोषित केले आहे. सन २००३ मध्ये ग्राझला युरोपची 'सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.
इतिहास
[संपादन]ताम्रयुगापासून ग्राझमधे मनुष्यवस्ती असल्याच्हे ऊल्लेख आढळतात. परंतु 'मध्ययुगा'पर्यंत सलग ऐतिहासिक नोंदी आढळत नाहीत.
आत्ताच्या स्लोवेनिया देशातल्या 'स्वाविक' लोकांनी ग्राझ शहराच्या मध्यात असलेल्या टेकडीवर एक कील्ला बांधला. त्याला त्यांच्या स्थानिक भाषेत 'ग्राडेच्' संबोधले जायचे. जर्मन भाषेतल्या 'ग्राझ या नावाचा वापर सर्वप्रथम ११२८ मध्ये करण्यात आला. नंतर १२८१ मध्ये राजा 'रूडॉल्फ - १' च्ह्या राज्यात ग्राझला एका महत्वाच्या बाजारपेठेचे रूप आले. १४ व्या शतकात 'इनर ऑस्ट्रीया' राज्याच्या राजघराण्याचे इथे (श्लॉसबर्ग राजवाडा) वास्तव्य होते. हे राजघराणे तेव्हा स्टायरमार्क, कॅरन्थिना (दोन्ही ऑस्ट्रीया), स्लोवेनिया आणि ईटली याभागात राज्य करत असे. त्यांनी इथे मध्ययुगीनकाली इटलीमध्ये वापरल्या जात असलेल्या वास्तूरचनेप्रमाणे विविध इमराती बांधल्या.
१६ व्या शतकात जगप्रशिद्ध खगोलशास्त्रज्ञ योहानेस केप्लर ग्रा।अमधे रहात होता. त्याकाळी तो ग्राझमध्ये गणित हा विषय शिकवत असे.
१५८५ मध्ये चार्ल्स-२ याने 'कार्ल फ्रान्झेन्स उनवर्सिटेट' (ग्राझ विद्यापिठ) च्ही स्थापना केली.