सदस्य चर्चा:डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५५,६७१ लेख आहे व २७० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १२:०९, ९ जानेवारी २०१८ (IST)

प्रवचन म्हणजे काय?[संपादन]

ज्याचा देह शुध्द,त्याची वाणी पुण्यवंत .कारण त्या वाणीतुन अखंड अच्युताचे चिंतन चालु असते.तुम्ही आम्ही नवविधा भक्तीत त्याची 'कीर्ती'गातो ते झाले कीर्तन.कीर्तनाचे नाम संकीर्तन,गुणसंकीर्तन,भावसंकीर्तन ई.उपप्रकारही आहेत.आपणाला कथा कीर्तन एवढाच एक प्रकार परिचित आहे.कीर्तन हे अंतरिक भावाचे प्रगटीकरण आहे.अंतरीचे स्वभावे बाहेर धावते,हे स्वभाविक आहे.तुकोबा म्हणतात माझी मला वाचा अनावर झाली म्हणजे काय?तर नामाचा छंद लागला हे एक कारण व दुसरे म्हणजे आत्माराम हृदयी प्रगटला.तेजाचं स्वरुपच असं आहे,की ते बाहेर पडल्याशिवाय राहत नाही.सूर्याला झाकुन ठेवता नाही.गुरुकृपेची पहाट झाली की,पूर्वी मुखावाटे जे शब्द बाहेर पडायचे ते 'वचन' होते,पण गुरुमुखातुन जे बाहेर पडले ते *प्रवचन* होय.या वाणीला विशेषत्व आहे.कारण,

 • पवित्र तो देह वाणी पुण्यवंत।जो वदे अच्युत सर्वकाळ॥*

वाणी पुण्यवंत असे का म्हटलेय?तर तुकोबा त्याचे उत्तर देतात, *....।तेथे ओघ नाम त्रिवेणीचा॥* देव,भक्त आणि नाम या त्रिवेणीचा संगम कथेत असावा,सांगणार्‍याची वाणी पुण्यवंत असेल तर अशा साधुपुरुषाचे, *सहज बोलणे हित उपदेश।* असते.यासाठी नाथांची 'संध्या' ही रचना अभ्यासावी लागते.नाथ महाराज म्हणतात,"आत्माराम हृदयी शेजे आला,कारण गुरुकृपारुपी निर्मळ भागीरथी शांती क्षमारुपी यमुना व सरस्वती या त्रिवेणी संगमात स्नान झाले.विकार संपले.कारण त्या सद्गुरुंच्या वचनाने *जन नोहे हा अवघा जनार्दन।...*हा आत्मानुभव आला.श्रीगुरुंच्या वाणीत ही ताकद असते,याला शब्दकृपा असे म्हणतात.तुकोबांना बाबाजी चैतन्यांनी जी कृपा केली ती तीन प्रकारची होती, १. *स्पर्शकृपा-* "लावोनिया हात कुरवाळीला माथा।..".किंवा " ...।मस्तकी तो जाणा ठेविला कर।।" २. *नेत्रकृपा-* उदा.सापडविले वाटे जाता गंगास्नाना।... किंवा, "...।पडीला विसर स्वप्नामाजी।। किंवा, "कृपा कटाक्षे न्याहळीले।आपुले पदी मग बैसविले॥" ३. *शब्दकृपा-* उदा. "आवडीचा मंत्र सांगितला सोपा।जेणे नोहे गुंफा कोठे काही॥" किंवा "......।मंत्र दिला रामकृष्णहरि॥" सद्गुरुंच्या मुखातुन जी अमृतवचने बाहेर पडतात,ती *प्रवचने* होय.ही प्रवचने म्हणजेच 'गुरुवाणी'.सामान्यजनांच्या मुखातुन जी बाहेर पडतात,ती वचने.भक्तीच्या वाटेवरचे कान्होबाराय "वचन एेका कमळापती।" असा भाव व्यक्त करतात,ती भक्तची नम्रता दर्शविते.पण गुरुकृपा झाल्यावर महाराज सद्गुरुंचे वर्णन करताना म्हणतात की,

 • आली मुखावाटे अमृतवचने।..."*

ही अमृतवाणी अधिकार्‍याचीच असते.गुरु व सद्गुरु यांत फरक आहे.गुरुमुखातुन वचने बाहेर पडू शकतात पण सद्गुरुंची वाणी स्त्रवते तेव्हा ती प्रवचने असतात.त्या वाणीला विशेषत्व का असते?तर सद्गुरुंच्या मुखातुन,

 • धार अखंडीत।ओघ चालियेला नित्य॥*

किंवा

 • अमृत हे मुखे स्त्रवतसे।*

कारण त्यांच्या वाणी विठोबाच्या गोड नामात अखंड भिजलेली असते.म्हणुन त्या वाणीला विशेष धार किंवा वजन असते.पूर्वी साधूंचे शाप ,उःशाप या कथा आपण वाचतो.त्यांच्या वाणीत एवढी ताकद असायची की, "वाल्मिकाने प्रथम रामायण वदले,नंतर रामराया म्हणतो, "बोलिला वाल्मिक तैसेचि वर्तेन।" ही वाणीची ताकद म्हणजे प्रवचन होय. ज्ञानदेवांनी विधवेला आशीर्वाद दिला, "सौभाग्यवती भव!" शेवटी सच्चिदानंद बाबांना जिवंत व्हावे लागले.कारण ते केवळ वचन नव्हते,तर *प्रवचन* होते. डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे (चर्चा) १२:३९, ९ जानेवारी २०१८ (IST)

समयोपदेश[संपादन]

🍁🌿🌾🍁🌿🌾🍁🌿🌾

      _*🔱समयोपदेश🔱*_
 • मनाला वय नाही व त्यामुळे देह कोणत्याही वयाचा असो त्यात मन हे आपल्या पध्दतीनेच कार्य करीत असते. १.बालीश २.पामर ३.विषयी ४.जिज्ञासू आणि ५.मुक्त अशा पाच मनाच्या आवस्था आहेत, असे गुलाब महाराज सांगतात. मोठ्या वयाच्या व्यक्तीला बोलत असताना त्याने काही बोलले तर असे कसे लहान मुला सारखे बोलता, असे म्हणतात. ही ती बालीश अवस्था. क्षुद्र वृत्तीचा व नियमित उलट्या बोंबा मारणारा हा पामर मग तो कोणत्याही वयाचा असो. फक्त विषयात रममाण होणारा विषयी अवस्था. जिवनाला व स्वरूपाला समजून घेण्याची इच्छा झालेली जिज्ञासू अवस्था आणि स्वरूप जाणून सर्व विषयापासून पूर्ण विभक्त व लौकिक अर्थाने जवळ ठेवणारी अवस्था ही मुक्त. यात बालीश अवस्था ऐकत नाही. त्याकडे कोणी लक्ष देत नाही. जसे आईला बाळ उलटे बोलले तरी त्याला उध्दट समजत नाही. म्हणून ऐकत नाही. पामर मन पामरच मग ऐकणार कसे. विषया शिवाय काहीच सुचत असल्याने ते मन इतरत्र जात नसल्याने तेही ऐकत नाही. मुक्त अवस्थेला सांगण्याची गरज नाही. कारण त्या मनाने आत्मस्वरूपात रममाण आहे व त्याला ते प्राप्त आहे. फक्त जिज्ञासू मन मात्र इच्छा घेऊन शास्त्र, कर्म व चिंतन यातून आत्मस्वरूप स्थितीचा विचार करून प्राप्तीसाठी धडपडत असते व यश देखील येते. त्यामुळे मनाला आकार देऊन त्याला जिज्ञासू अवस्थेत आणून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे, हे आपल्या प्रयत्न साधनेत आहे.*_
Dumbre Sunset otur
    बंडोपंत कुलकर्णी सोलापूर 
 • ॐ गुरूदेव कहे एक !*
 • सिर्फ आत्माही मालिक !!*

🍁🌿🌾🍁🌿🌾🍁🌿🌾 बी.डी.कुलकर्णी डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे (चर्चा) १५:११, ९ जानेवारी २०१८ (IST)

तुकोबारायांंची पत्नी जिजाबाई:अलौकत्व[संपादन]

 • तुकोबाची कांता सांगे लोकापाशी।पती माझा जातो पंढरपुराशी॥१॥फुटकाची वीणा त्याला दोन तारा।घाली येरझारा पंढरीशी॥२॥*

तुकोबारायांची धर्मपत्नी आईसाहेब जिजाऊंचे आत्मप्रगटीकरण तुकोबांनी या अभंगातुन केले आहे.महाराजांच्या चरित्रात अशी अनेक स्थळे दिसतात की, जिजाबाई साक्षात पांडूरंगालाही शिव्या देतात.या काळ्याने माझा नवरा बिघडवला म्हणुन सतत पांडुरंगाला शिव्या देणारी जिजाबाई दिसते.भंडार्‍यावर भाकरी घेऊन जाताना पायात काटा रुतल्यानंतर साक्षात पांडुरंगाने गुराख्याचे रुप घेऊन जिजाऊंचा काटा काढला.ज्याच्या पायाचे दर्शन होण्यासाठी आम्ही योग,याग,तपे अमुप करुन आमच्या स्वप्नातही जे परब्रम्ह येत नाही,त्या परब्रम्हाने साक्षात जिजाबाईंचा पाय हातात घेऊन काटा काढावा?केवढं हे सद्भाग्य? जिजाबाई पांडूरंगाला शिव्या देताना दिसतात,पण ते रागाचं दर्शन नाही तर अनुरागाचं दर्शन आहे.जनाबाईही त्याला *तुझी रांड रंडकी झाली।दासी जनी हेल घाली॥* अशी लाखोली वाहतेच ना? यापाठीमागील अनुराग लक्षात घ्यावा.काम ,क्रोध ,लोभ रुपी काटा भक्ताच्या पायात रुततो.तो काढण्याचं काम पांडूरंग करतो.जिजाबाईंचा क्रोधाचा काटा पांडूरंगानेच काढला की!

  लौकीक संसारातही तुकोबांच्या सक्षम साथ कुणाची असेल तर जिजाबाईंची होती.कारण जिजाबाई होत्या म्हणुन तुकोबा म्हणतात," *धन्य पुण्य रुप कैसा झाला संसार।...*"
महाराष्ट्रात दोन जिजामाता जन्मल्या म्हणुन आज महाराष्ट्रात आम्ही जिवंत आहोत.

१.तुकोबांची पत्नी - जिजाबाई २.छत्रपतींची माता- जिजाऊँ या दोन्ही जिजाऊँच्या माथी संसाराची जबाबदारी पडली.विशेष म्हणजे दोघींचेही माहेर श्रीमंत!लाडात वाढलेल्या.पण शहाजीराजांना स्वराज्याचे वेड लागले तर तुकोबांना "बुडते हे जन न देखवे डोळा।..."म्हणुन कळवळा.एकाला रयत बुडताना पहावत नव्हती तर दुसर्‍याला जनकवळवळा! उद्देश सारखाच.पण वाटा भिन्न.या दोघांनाही *रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग।* या दिव्यातुन जावे लागत होते.हे दोघेही यशस्वी झाले कारण त्यांचे गृहमंत्रालय सांभाळणारे तेवढे दक्ष होते.पतीविषयीचे अत्यंतिक प्रेम तुकोबांची पत्नी व्यक्त करते, "तुकोबाची कांता सांगे लोकापाशी।पती माझा जातो पंढरपुराशी॥१॥"

माझ्या नवर्‍याला वेड लागलंय!तो फुटका वीणा घेतो व पंढरीला येरझारा घालतो.यातील वरवरचा भाव सोडा.लक्षणेतुन अभ्यासु जाता,हे रागाचे नव्हे तर अनुरागाचे दर्शन आहे.आपणही जेव्हा एखाद्या कामात गर्क होतो,तेव्हा आपली गृहलक्ष्मीही असाच त्रागा करते.त्यात राग नसतो,ते अनुरागाचे लक्षण आहे.कारण ती अर्धांगिणी असते.
  मदन महाराज गोसावी नावाचे माझे मित्र आहेत.त्यांच्या बाबतीत असेच घडले.मदन महाराज म्हणजे साक्षात अनुग्रहीत निष्ठावान वारकरी.न्यायाधिश असुन ते मंत्रालयात सचिव म्हणुन कार्यरत.त्यांच्या जिवाला कधीही धोका होऊ शकतो,म्हणुन शासनाने त्यांना २४ तास पोलिस संरक्षण दिलेले आहे.एकदा रात्री ते मुंबईतुन नगरला कीर्तनासाठी निघाले.रात्र खुप झाली म्हणुन ओझरला मुक्काम केला.सकाळी उठुन कीर्तनाला धावतपळत पोहचले.कीर्तन खुपच रंगले,त्यात अधिकचा वेळ गेला.कीर्तनात मोबाईल बंद ठेवला तो कीर्तन संपल्यावर बर्‍याच तासांनी सुरु केला.मधल्या वीसएक तासांत गृहलक्ष्मीला यांचा साधा फोनही नाही.सकाळी त्या माऊलीने फोन केला पण हे महाराज काल्यात दंग! हो ना करता दुपारनंतर वहिनींचा फोन आला,तेव्हा महाराजांना घरची आठवण आली.समोरुन चाललेला धाड धाड तोफांचा मारा हा माझा मित्र हसत हसत छातीवर झेलत होता.गृहखात्याचं बंबार्डींग संपल्यावर मदन महाराज मला म्हटले,"खरं सांगु का सर! माझी दोन्ही मुलं आज जी यशस्वी झालीत ते माझ्या बायकोचं श्रेय आहे.माझी नेहमी बदलीची नोकरी.त्यात जोखमीची.सतत कीर्तनांना बाहेरगावी प्रवास! पण याही काळात माझ्या आवलीने प्रसंगी स्वतःची पोस्टाची नोकरी सोडली पण माझ्या मुलांकडे लक्ष दिले,माझा संसार केला.म्हणुन माझा संसार यशस्वी झाला,नाही तर मी एक तर कामात व्यस्त असतो नाही तर कीर्तनात.पण खरं श्रेय तिचंच आहे!"
  हे सांगत असताना मदन महाराजांच्या डोळ्यांतुन जो कृतज्ञता भाव पाझरत होता,त्याची सर कुठेच येणार नाही.संसार रथाची दोन चाकं असली तरी, कुरकुरणार्‍या चाकावर जास्त भार पडतोय हे दुसर्‍या चाकाला कळतं पण सांगता येत नाही.
 हेच तुकोबांच्या बाबतीतही पहायला मिळते.म्हणुन तर ते म्हणतात,
 • तुका म्हणे जिजे ऐसे न बोलावे।....*
हा समंजसपणा ही तिच्या त्या सहनशक्तीला दिलेली पावती असते.
library

प्रा.डाॅ.द.प्र.डुंबरे ७५८८५९४५७९ डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे (चर्चा) १५:३३, ९ जानेवारी २०१८ (IST)

रंंगदास स्वामी पुण्यतिथी सोहळा.आणे,ता.जुन्नर जि.पुणे[संपादन]

लोकसंस्कृतीचा महान ठेवा,रंगदास स्वामी पुण्यतिथी महोत्सव,आणे.ता.जुन्नर.जि.पुणे

पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर आणे ता.जुन्नर जि.पुणे येथे सव्वाशे वर्षांपुर्वी रंगदास स्वामी नावाचे एक साधुपुरुष होऊन गेले.हरिभजने हे जग धवळण्याची प्रतिज्ञा केलेले स्वामी आण्याच्या डोंगररांगांत साधना करीत असत.येणार्‍या भाविकांना भक्तीमार्ग दाखवायचे.पांथस्थाला आमटी भाकरी खाऊ घालायचे.परीसरातील प्राणी,पक्ष्यांना खाऊ घालायचे.चराचरात ईश्वर पाहणारा हा महात्मा अखंड समाधीत रमायचा.देहावर आल्यावर गावकर्‍यांना सन्मार्गपर अमृतवाणीचे शिंपण करायचा.जवळच अकलापूर नावाचे नगर जिल्ह्यात गाव आहे,तेथील दत्तमंदीर व मुर्ती अत्यंत देखणी आहे.स्वामींचे अकलापुरला नेहमी जाणे येणे असायचे.दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदाय यांत सांस्कृतिक एेक्य निर्माण करुन समाजात भक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे काम स्वामींनी केले.शंभरएक वर्षाँपूर्वी स्वामींनी आणे गावात संजीवन समाधी घेतली.शेजारीच त्यांच्या सद्गुरुंचीपण समाधी आहे.गावकर्‍यांनी स्वामींचे भव्य मंदीर बांधले आहे. पौष शु.प्रतिपदेला स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त 'आमटी भाकरी'चा महाप्रसाद असतो.या दोन दिवस चालणार्‍या महाप्रसादासाठी लाखो लोक येतात.दोन लाख लोक या महाप्रसादाचा आस्वाद घेतात.गावातील लोक घरी बाजरीच्या भाकरी बनवुन खटारगाडीने मंदीरात आणुन देतात.ट्रस्टच्या वतीने फक्त आमटी बनविली जाते.हा आमटी बनविण्याचा खर्च काही लाखांत असतो. ट्रस्टच्या वतीने भाविकाला ताट वाटी दिली जाते.भाकरी चुरुन त्यावर आमटी घ्यायची व मनसोक्त ओरपुन खायची.तिची चव इतकी अप्रतिम असते की,फाईव्ह स्टार हाॅटेलमध्येही अशी डिश मिळणार नाही.

 जागतिकीकरणाच्या रेट्यात जुंदरी लोकसंस्कृतीतील अनेक प्रथा परंपरा लोप पावल्या मात्र आणेकरांनी स्वामींच्या श्रध्देपोटी ही आमटी भाकरीची प्रथा अव्याहत सुरु ठेवलीय.लाखो लोकांना दोन दिवस भाकरी पुरवायच्या सोपे काम नाही.पण आणेकर मोठ्या श्रध्देने ही सेवा करतात.स्वामींच्या कृपेने हा प्रसाद वर्षानुवर्षे सुरु राहिल,यात शंका नाही.पण लोकसंस्कृतीचा एक खुप मोठा ठेवा या गावाने जपुन ठेवलाय,त्याबद्दल आणेकरांना सलाम!

प्रा.डाॅ.द.प्र.डुंबरे विवेकानंद महा.औरंगाबाद. ७५८८५९४५७९ डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे (चर्चा) २०:२२, ९ जानेवारी २०१८ (IST)

संंत जनार्दन स्वामी[संपादन]

 • एका जनार्दनी*

नाथांचे श्रीगुरु संत जनार्दन स्वामी यांची आज पुण्यतिथी.मार्गशीर्ष व.११ला जनार्दन स्वामींची पुण्यतिथी निमित्त वार्षिक वारी देवगिरी किल्ल्यावर संपन्न होते.जनार्दन स्वामींची समाधी देवगिरीवर ज्या गुहेत आहे,त्या गुहेतच दत्तगुरुंच्या पादुका आहेत.जनार्दन स्वामींना दत्तगुरुंनी आजच्या दिवशी दर्शन दिले व ते विदेही झाले,अशी आख्यायिका आहे. जनार्दन स्वामींचे तीन प्रमुख शिष्य, १.एका जनार्दन २.रामा जनार्दन ३.जनी जनार्दन या तीन शिष्यांनी दत्तसंप्रदाय व वारकरी संप्रदाय यांत सांस्कृतिक ऐक्य निर्माण करुन भक्तीचळवळ जनमानसात रुजविली.आजच्या पुण्यतिथी निमित्त जनार्दन स्वामींच्या चरणी वंदन!

 • भानुदास एकनाथ...भानुदास एकनाथ!*

🙏🏼👍🏻🙏🏼🙏🏼💐💐💐💐 डाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे (चर्चा) १५:१७, १० जानेवारी २०१८ (IST)