सदस्य चर्चा:गौतम रा. कांबळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत गौतम रा. कांबळे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन गौतम रा. कांबळे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१६६ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १९:१५, २७ फेब्रुवारी २०१८ (IST) करंजवडेचा मोहरम करंजवडे, वाळवा तालुक्यातील मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील येलुर पासून पश्चिमेला साधारण दहा कि. मी. अंतरावर वसलेले एक छोटेसे खेडेगाव. गावात सर्व जाती धर्माची माणसं गुण्यागोविंदानं राहतात. जाती धर्मावरुन या गावात संघर्ष झालेला कधी ऐकिवात नाही. अपवादानं असं घडलच तर गावातील ज्येष्ठ लोक समजूत काढून वाद शक्यतो गावातच मिटवतात.[reply]

         गावात  परंपरेनुसार सर्व सण साजरे केले जातात. त्यापैकी दसरा, हनुमान आणि लक्ष्मी या दोन यात्रा व मोहरम हे सण  पूर्वीपासून सर्व जाती धर्माचे लोक सार्वजनिक पद्धतीने साजरे करत आले आहेत. मोहरम सण इस्लामधर्मीयांचा असला तरी त्या मध्ये पुढाकार मात्र हिंदूंचाच असतो. हा सण गावात उत्साहाने साजरा होतो.
          गावाला सुमारे पाचशे वर्षांची  मोहरमची परंपरा आहे असे ७२ वर्षाचे नुरुद्दीन महम्मद मुल्ला ऊर्फ खानसाहेब सांगतात. मुलाणी मस्जिदमध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या  पंजाच्या नालावर पाचशे वर्षापूर्वीच्या तारखांची नोंद आहे.
          गावात वेगवेगळ्या तीन ठिकाणी मुस्लीम समाज राहतो. त्या ठिकाणी पूर्वीपासूनच तीन मस्जिदी आहेत. तांबोळी, मुलाणी आणि फकीर तथा पिरजादे. तांबोळ्यांचं एकच कुटुंब आहे. तरीसुद्धा तांबोळ्यांची मस्जिद गावात आहे.
                इस्लामच्या मोहरमचा महिना चंद्रदर्शनाने सुरु होतो. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते ती पहिली तारीख मानली जाते. तिथून दहा दिवसांचा मोहरम सण सुरु होतो. पाहिल्या  दिवशी कुदळ मारण्याचा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी  सात फुट व्यासाचा व चार फुट खोलीचा गोलाकार खड्डा काढला जातो त्याला आलावा म्हणतात. हा आलावा पाचव्या दिवशी खोदला जातो. ती  प्रतीकात्मक गोर असते. नवव्या दिवशी म्हणजे कत्तलच्या  रात्री आलावा पेटवला जातो व दहाव्या रात्री तो मुजवला जातो.
                दोन ते चार तारखेपर्यंत काही कार्यक्रम असत नाही. पाचव्या दिवशी मस्जीदमध्ये पंजे बसवले जातात. साधारण पाच फुट उंचीच्या काठीला रंगीबेरंगी कपड्यांनी सजवले  जाते. वरच्या टोकाला पंजा किंवा नाल बसवलेला असतो. त्याच दिवशी ताबुतही  बनवायला घेतात. ताबुताला डोला असेही म्हणतात.  चौकोनी आकाराचा सहा ते सात फुट उंचीचा ताबूत असतो. पाचव्या दिवसापासून रोज संध्याकाळी ताशा आणि ढोल एका विशिष्ट लयीत वाजवला जातो. 
            सातवा दिवस पंजा भेटीचा असतो. संध्याकाळी सहा वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होतो. ढोल ताशाचा आवाज सुरु झाला की गावातील लोक आपापल्या परिसरातील मास्जीदसमोर  जमायला सुरुवात करतात. पंजा नाचवणारे लोक ठरलेले असतात. त्यांचा पंजा ठरलेला असतो. त्याना सवारीही म्हणतात. मानानुसार सवारीचा आकार असतो. तांबोळी मस्जीदिची मानाची सवारी पूर्वी मराठा समाजाच्या चंद्राप्पा वाकुर्डे यांच्याकडे होती. आता ती विलास बाळा पाटील यांच्याकडे आहे. मुलाणी मस्जीदिची मानाची सवारी लिंगायत समाजाचे पण नाथपंथी असणा-या भाऊसाहेब महाराजांकडून त्यांचा नातू बाळासाहेब यांच्याकडे आली आहे. तर पिरजादे मस्जीदिच्या सवारीचा मान मेहबूब पिरजादे महाराजांच्या वारसांचा आहे. जसा ढोल ताशाचा आवाज वाढेल तसे या पंजा नाचवणा-या लोकांच्या अंगात वारे भरायला सुरु होते. त्याला अंगात येणे म्हणतात. काही वेळ पंजे नाचवल्यानंतर सर्वजण ढोल ताशाच्या तालात नाचत बाहेर पडतात. तांबोळी व पिरजादे मस्जीदीचे लोक मुलाणी मस्जिदमध्ये येतात.  तिथून गावाच्या उत्तरेला असणा-या राजेभास्कर पिराला नैवेद्य दाखवतात. ईशान्य दिशेच्या बावापीरला   आणि नैऋत्य दिशेच्या जंगलीसाहेब पिराला वाटमार्गे नैवेद्य दाखवतात. शेवटी गावाच्या मध्यभागी असणा-या ऐतिहासिक वतनादार पाटलांच्या वाड्यात फतिहा होऊन त्या दिवसाचा कार्यक्रम संपतो. सद्या मृणाल पाटील त्या वाड्यात वास्तव्याला आहेत. 
             नवव्या दिवशी कत्तलरात्र असते. या दिवशी महम्मद पैगंबर यांच्या मुलीची मुले  इमाम ए हसन व हुसेन यांची करबल येथे यहुदी लोकांकडून विश्वासघाताने  हत्या झाली आहे असे अजीज मुल्ला यांनी सांगितले. यहुदीनी या लोकांचे खूप हाल केले. पाणीही दिले नाही. पाण्यावर पहारा ठेवला होता. या आठवणीसाठी दिवसभर गावातून झेंडा फिरवला जातो. घरोघरी नैवेद्य व सरबत वाटला जातो. लोकांकडून नवसाच्या खिचडीचे वाटप होते. सायंकाळी गावातील लोक मस्जिदमध्ये जाऊन हातात व गळ्यात सैली अठ्ठीचे बंधन बांधतात. याला फकीर होणे म्हणतात. नैवेद्य दाखवला जातो व मलिदा तयार केला जातो.  या दिवशी गावातील सुमारे ९० टक्के लोक उपवास धरतात. त्याच दिवशी ताबूत बाहेर काढला जातो. रात्री नऊ साडेनऊला ताबुतांची मिरवणूक सुरु होते. ती रात्रभर सुरु असते. तिन्ही  ताबूत मिरवणुकीने पहाटे  सुतारमेटावर  येतात. त्यांची भेट होते. त्याच वेळी सगळ्या पंजांचे नाल कापडाने झाकले जातात. व तिथून ते परत आपापल्या ठिकाणी जातात. तेंव्हा दहावा दिवस सुरु झालेला असतो. 
             दहाव्या दिवशी दुपारी चारलाच ताबुतांची मिरवणूक सुरु होते. नेहमीच्याच मार्गाने मिरवणूक जाते. त्यावेळी नवव्या दिवशी  सैली अठ्ठीचे बंधन बांधून फकीर झालेले हिंदू  लोक सैली अठ्ठी काढून ताबुतात टाकतात.  आणि रात्री नऊ वाजता पाटलांच्या विहिरीत ताबुतांचे विसर्जन होते. 
             सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षक व वारकरी बी. एस. पाटील सांगतात, "ही आमच्या गावची परंपरा आहे. मोहरमचे सगळे कार्यक्रम संध्याकाळचे असतात. पण दिवसा सोंगे काढली जायची तीही एक मजा असायची. गावातील हौशी लोक शाळकरी मुलाना घेऊन अस्वलाचा खेळ, माकडाचा खेळ असली  सोंगे खेळली जायची. आलाव्यासाठी माहेरवाशीण मुली यायच्या." या सणाचे स्वरूप अतिभव्य असायचे असे खानसाहेब सांगतात.
           हल्ली त्यात खूपच बदल झाला आहे. सोंगे होत नाहीत. लोकांची श्रद्धा कमी झाली आहे. एक मात्र जमेची बाजू आहे; ती म्हणजे, तांबोळी यांचा एकही  वारस नसला तरी मुलाणीच्या मदतीने मराठा समाजातील गायकवाड आणि नाभिक समाजाचे ताटे तांबोळी मस्जिदीचा मोहरम थाटात साजरा करतात.

गौतम कांबळे, शामरावनगर, सांगली ९४२१२२२८३४

नमस्कार... आपण लिहिलेले समिक्षण आवडले. धन्यवाद..![संपादन]

... ...


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! सचिन वसंत पाटील (चर्चा) २३:१०, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

गौतम रामराव कांबळे[संपादन]

गौतम रा. कांबळे महसूल कॉलनी शामरावनगर, सांगली. ९४२१२२२८३४ एम ए (इति), एम.ए (स. शास्त्र), एम एड., डी. एस. एम., बी. जे.(प्रिंट मीडिया) प्राथ. शिक्षक. लोकगीते लेखन व गायन (आकाशवाणी रत्नागिरी) काव्यलेखन (विविध पुरस्कार) कथालेखन (दैनिकातून प्रसिद्धी) आकाशवाणी व दूरदर्शनवर कार्यक्रम. विविध साप्ताहिके व मासिकामधून सामाजिक लेख. गौतम रा. कांबळे (चर्चा) १०:०३, २८ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

ग्रहणावरची कविता[संपादन]

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मग ते चंद्रग्रहण असो वा सूर्यग्रहण. भारतीय समाजात मात्र ग्रहणाविषयी अनेक समज गैरसमज आहेत. ग्रहण स्थिती, त्याचा कालावधी या विषयी ज्योतिषतज्ञ विविध भाकिते करत असतात. ग्रामीण भागात ग्रहण काळात ग्रहण पाळले जाते. गर्भवती महिलाना कोणत्याही प्रकारचे अगदी हलकेसुद्धा काम करू दिले जात नाही. याला श्रद्धा म्हणायचे की अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा विषय आहे.

     या मानसिकतेवर टिप्पण करावे म्हणून 'ग्रहण आणि आम्ही' ही एक छोटीशी कविता लिहिली आहे. कमी व हलक्याफुलक्या शब्दात केलेली ही मिश्किली आहे. 

🌑ग्रहण आणि आम्ही🌑 भेटीची ओढ धरेला अनावर जेंव्हा होते सावली बनून अवनी चंद्राला कवेत घेते

    नजराणा असतो भारी 
    साक्षीला सूर्य असतो 
    अपशकुन शकुनाच्या 
    गप्पा आम्हीच करतो
खगोलीय मिलन पाहण्या 

निसर्गही आतुर असतो कुणास ठावे कशाला आम्ही झुरत बसतो

         मिलनाची सुटता मिठी 
         कसा श्वास मोकळा होतो 
        आम्ही अत्यानंदाने 
        सुटले ग्रहण म्हणतो 

🖋गौतम कांबळे, सांगली.

    ९४२१२२२८३४ गौतम रा. कांबळे (चर्चा) ०६:४१, १ मार्च २०१८ (IST)[reply]