सदस्य चर्चा:क्रमश
अलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखन
[संपादन]- आदरणीय महोदय/या,
- आपण अलीकडे मराठी विकिपीडियातील चर्चापानावर केलेले लेखन विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप/ असभ्य अथवा असंसदीय भाषा या गटात मोडते असे मांडले गेले आणि वगळले गेले आहे अथवा कोणत्याही क्षणी वगळले जाऊ शकते. विशिष्ट विचार अथवा कृती बद्दल आपली मतांतरे अगदी टीकाही ऐकून घेण्यास मराठी विकिपीडिया समुदाय नेहमीच उत्सुक असतो आणि असेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीची, समूहाची कृती अथवा विचार आपल्याला पटणारे असतीलच असे नाही, "महात्मा गांधी" म्हणतात त्याप्रमाणे आपली टीका त्या विशिष्ट कृती अथवा विचाराबद्दल आपले अभ्यासपूर्ण मुद्देसूद मतांतर व्यक्त करण्यापर्यंतच मर्यादित ठेवावी, आपण करत असलेल्या टिकेचे चारित्र्यहननात, व्यक्ती अथवा समूहद्वेषात रुपांतरण होणार नाही याची दक्षता घेणे जरूरी आहे. एखादा विचार मुद्दा/कृती पटत नसेल तर काय करावे ? याची माहिती खाली दिली आहे ती पुढे दिली आहे ती वाचावी.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहिक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक स्वरूपांचे आरोप करू नयेत.
विकिपीडियाच्या परिघाला मर्यादा आहेत. विकिपीडियावरील निर्णय प्रक्रीया सहसा सहमतीने होते पण विकिपीडिया लोकशाही सुद्धा नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत असला तरी तो सर्व समावेशक ज्ञानकोश आहे अमुक्तस्रोताबद्दल अथवा आपणास न पटणार्या दृष्टीकोनांचीही येथे मांडणी असू शकते. आपल्या सर्व आकांक्षाना इच्छा आणि विनंत्या मराठी विकिपीडियन समुदाय कदाचित स्विकारू शकणार नाही असेही होऊ शकेल, तरी सुद्धा येथे जे काही काम होते यात बराच मोठा भाग हा सामान्य मराठी जनांना उपयोगी पडणारा सकारात्मक आहे.त्यामुळे उत्साही रहा आग्रहही धरा पण त्याच वेळी आग्रहाचे टोक गाठण्याचे अथवा आपल्या आग्रहा खातर इतर कुणाही व्यक्तीस अथवा समुहास व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाचे भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक वांशिक लक्ष्य करण्याचे टाळा.आपल्याकडे आधीच पुरेशा संपादकांची वानवा असताना आहे त्या संपादकांचे श्रम इतरत्र घालवून खच्ची करण्यात अवघ्या मराठी समाजाचे नुकसान होते हे आपण लक्षात घेऊन सहकार्य करावे. त्यामुळे काही गोष्टी रूचल्या नसल्या तरी सुद्धा सकारात्मकतेने आपण सहाकार्य करू शकाल असा विश्वास आहे.
सर्वच मराठी बांधवांनी आजपर्यंत मराठी विकिपीडिया प्रकल्पाची सर्वसामान्य जनतेस उपयूक्त ठरणारी रचनात्मक ध्येये लक्षात घेऊन मराठी विकिपीडियन संपादकांना त्रस्त करण्याचे टाळले आहे आणि आपणही टाळाल याचा आम्हाला सार्थ अभिमान असेल.येथील संकेतांचा परिचय अभ्यास होण्यास तसेच मतांतरात शांतता प्रस्थापित काण्याच्या दृष्टीने आपल्या संपादनास काही अपवादात्मक परिस्थितीत बंधने घातली गेल्यास त्या बद्दल गैर समज करून घेऊ नये. सर्वांच्या सदसद विवेकबुद्धीवर श्रद्धा ठेवण्यावर विकिपीडियाचा पारंपारिक विश्वास आहे तसा तो तुमच्यावरही आहे.. आम्हाला तुमच्या विरोधात काही सिद्ध करावयाचे आहे,चढा ओढ आहे आकस आहे असेही नाही.मराठी भाषा व्यक्तिगत मत मतांतरापेक्षा खूप मोठी आहे तेव्हा काही वेळा व्यकिगत मतांना मराठी भाषेच्या संदर्भाने अधीक मोठ्या ध्येयाकडे पाहून वेळ प्रसंगी थोडी मुरड घालावी, जेव्हा परत याल तेव्हा नव्या उत्साहाने मराठी विकिपीडियात समरसून सकारात्मक लेखन योगदान कराल असा विश्वास आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ http://www.esakal.com/esakal/20120609/5481722354753731175.htm [मृत दुवा]
- ^ "मराठी शब्द हवे आहेत - १४ | मनोगत". www.manogat.com. 11 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "मराठी शब्द हवे आहेत - १४ | मनोगत". www.manogat.com. 11 March 2018 रोजी पाहिले.
- ^ Lindsay, Nicole. "How to Take Constructive Criticism Like a Champ". Lifehacker. 11 March 2018 रोजी पाहिले.