सदस्य:Varsha kumbhar/धूळपाटी 2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री रामनाथ दामोदर मंदिर.

श्री रामनाथ दामोदर मंदिर हे पिंपळकट्टा मडगांव गोवा येथे उपस्थित आहे. जास्तित जास्त अशा लोकांना ह्या मंदिराबद्दल माहित नाही फक्त मडगांवच्या रहिवासांना माहित आहे. इतर लोकांना फारसे माहित नाही. मंदिरामध्ये पूजाअर्चा केली जाते तसेच तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रमे होतात जसे की नाटक,नृत्य,संगीत अशा प्रकारच्या कला सादर केल्या जातात.तसेच तिथे शिगमोस्तव साजरा केला जातो. त्या मंदिरात गणपतीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच तिथे काही जानांना फुगडी घालायला बोलवतात त्याच प्रमाणे ढोल वाजवण्यासाठी काही जानांना बोलावले जाते. देवाच्या भेटीला येणारी माणसे देवासाठी फुलांचे हार, अगरबत्तींचे पुढे, नारळ इत्यादी घेऊन जातात.या देवावर लोकांची भरपूर श्रध्दा आहे. हे मंदिर फारसे मोठे नाही एकदम छोटे आहे. पण लोकांची गर्दी मात्र या मंदिरात भरपूर असते.