सदस्य:Siddhi Jadhav 1408

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर. वैशाली एक भारतीय बुद्धिबळपटू आणि एक भारतीय महिला ग्रँड मास्टर आहे. तिने भारतीय राष्ट्रीय चॅम्पियनशिप तसंच 14 वर्षांखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदके पटकावली आहेत. ती भारताचा हुशार ग्रँड मास्टर आर. प्रज्ञानंद याची मोठी बहीण आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

वैशालीचा जन्म २१ जून २००१ रोजी चेन्नई येथे झाला.  ती साधारण सहा वर्षांची असताना तिच्या पालकांनी तिला टीव्ही पाहण्यापासून परावृत्त करण्यासाठी चित्रकला आणि बुद्धिबळमध्ये गुंतविण्याचा प्रयत्न केला. [१] ही युक्ती यशस्वी ठरली आणि वैशालीने फक्त बुद्धिबळ खेळण्यात रसच नाही दाखवला तर त्यात विशेष चुणूकही दाखवली. सराव करण्यासाठी घरातच एक उत्स्फूर्त धाकटा भाऊ असल्याने तिचे कौशल्य वाढू लागले. २०१२ मध्ये अंडर-११ मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले, ज्यामुळे तिची जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवड झाली.


तिच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच बुद्धिबळ एक महाग खेळ असल्याचे वाटायचे. ती सांगते की सुरुवातीला तिच्याकडे बुद्धिबळ खेळण्यास कुठलेही सॉफ्टवेअर किंवा लॅपटॉप नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ती आपला खेळ सुधारण्यासाठी बुद्धिबळविषयीच्या साहित्यावर अवलंबून होती. या व्यतिरिक्त, प्रशिक्षणासाठी तसंच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी वाहतुकीचा खर्च करणे कुटुंबासाठी हा एक संघर्ष होता.[२]

त्या आव्हानांचा सामना करत तिने २०१२ मध्ये स्लोव्हेनिया येथे अंडर -२२ गर्ल्स वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. या यशामुळे तिने अनेक दरवाजे उघडले आणि त्यानंतर तिने भारतीय महिला भव्य मास्टर टायटल जिंकले. आतापर्यंत  यशस्वी प्रवास केल्याबद्दल वैशाली तिच्या आईवडिलांना व तिच्या भावाला श्रेय देते.[३]

व्यावसायिक यश[संपादन]

वैशालीने २०१२ मध्ये अंडर-११ राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आणि १३ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली. त्याच वर्षी मुलींच्या अंडर-१२ जागतिक स्पर्धेतही तिने सुवर्ण पदक जिंकले. २०१४ मध्ये १५ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. [४]२०१५ आणि २०१६ मध्येही तिचा प्रगतीचा आलेख चढताच राहिला. तिने मुलींच्या राष्ट्रीय कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत सलग दोन वर्षे सुवर्ण पदके जिंकली. या कामगिरीमुळे तिला नंतरच्या काही वर्षांमध्ये आशियाई बुद्धिबळ स्पर्धांमध्ये आणि जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. [५]

२०१५  मध्ये ग्रीसमधील अंडर -१४ गर्ल्स वर्ल्ड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. वैशालीने जून २०२० मध्ये फिडे चेस.कॉमच्या वुमेन्स स्पीड चेस चॅम्पियनशिप या ऑनलाइन स्पर्धेत वैशालीने माजी जगज्जेत्या अंताओनेता स्टिफानोवा हिला पराभूत करून मोठी खळबळ उडविली.[६]

वैशालीने २०१७ मध्ये आशियाई वैयक्तिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. मग २०१८मध्ये ती भारतीय महिला ग्रँड मास्टर [डब्ल्यूजीएम] बनली. २०२० फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये रशियासमवेत संयुक्त सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाची ती सदस्य होती. [७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Makar, A. B.; McMartin, K. E.; Palese, M.; Tephly, T. R. (1975-06). "Formate assay in body fluids: application in methanol poisoning". Biochemical Medicine. 13 (2): 117–126. doi:10.1016/0006-2944(75)90147-7. ISSN 0006-2944. PMID 1. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ Bose, K. S.; Sarma, R. H. (1975-10-27). "Delineation of the intimate details of the backbone conformation of pyridine nucleotide coenzymes in aqueous solution". Biochemical and Biophysical Research Communications. 66 (4): 1173–1179. doi:10.1016/0006-291x(75)90482-9. ISSN 1090-2104. PMID 2.
  3. ^ Makar, A. B.; McMartin, K. E.; Palese, M.; Tephly, T. R. (1975-06). "Formate assay in body fluids: application in methanol poisoning". Biochemical Medicine. 13 (2): 117–126. doi:10.1016/0006-2944(75)90147-7. ISSN 0006-2944. PMID 1. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Bose, K. S.; Sarma, R. H. (1975-10-27). "Delineation of the intimate details of the backbone conformation of pyridine nucleotide coenzymes in aqueous solution". Biochemical and Biophysical Research Communications. 66 (4): 1173–1179. doi:10.1016/0006-291x(75)90482-9. ISSN 1090-2104. PMID 2.
  5. ^ Bose, K. S.; Sarma, R. H. (1975-10-27). "Delineation of the intimate details of the backbone conformation of pyridine nucleotide coenzymes in aqueous solution". Biochemical and Biophysical Research Communications. 66 (4): 1173–1179. doi:10.1016/0006-291x(75)90482-9. ISSN 1090-2104. PMID 2.
  6. ^ Smith, R. J.; Bryant, R. G. (1975-10-27). "Metal substitutions incarbonic anhydrase: a halide ion probe study". Biochemical and Biophysical Research Communications. 66 (4): 1281–1286. doi:10.1016/0006-291x(75)90498-2. ISSN 0006-291X. PMID 3.
  7. ^ Bose, K. S.; Sarma, R. H. (1975-10-27). "Delineation of the intimate details of the backbone conformation of pyridine nucleotide coenzymes in aqueous solution". Biochemical and Biophysical Research Communications. 66 (4): 1173–1179. doi:10.1016/0006-291x(75)90482-9. ISSN 1090-2104. PMID 2.

पुरस्कार[संपादन]

२०१२ मध्ये अंडर ११ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक

२०१२ मध्ये अंडर १३ मुली राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक

२०१७ मध्ये आशियाई वैयक्तिक ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक

२०१४मध्ये अंडर १५ मुली राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक

नॅशनल ज्युनियर गर्ल्स बुद्धिबळ स्पर्धेत २०१५,२०१६  मध्ये सुवर्णपदक

Siddhi Jadhav 1408
वैयक्तिक माहिती
Full name आर. वैशाली
Nationality भारत
जन्म 21 जून 2001
चेन्नई, भारत
Sport
खेळ बुद्धिबळ