सदस्य:OMMALLINATH

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

OMMALLINATH (चर्चा) १६:२१, १६ मार्च २०१४ (IST)श्री क्षेत्र दक्षिणमुखी जागृत मारूती मंदिर गौडगांव.

हनुमान म्हणजे शक्ती, हनुमान म्हणजे मुक्ती हनुमान म्हणजे आलेल्या संकटाला धीरोदत्त म्हणून प्रतिकार करणे. हनुमान म्हणजे आदर्श, हनुमान म्हणजे उच्च कोटीची संस्कृती, हनुमान म्हणजे आधार आणि आदरतेचे प्रतिक. म्हणून हनुमानाला मानवी जीवनाला मार्ग देणारी देवता म्हटले जाते. कीर्तन, प्रवचन, धार्मिक पारायणे इत्यादीतही हनुमानाला स्थान आहे.

समर्थ रामदास बलप्रतिष्ठा अधिक महत्त्वाची मानत महाराष्ट्रात 11 मारुतीमंदीरे स्थापिली. शहापूर, मसूर, उंब्रज, माजगाव, बाहे, मनपाडळे, पारगाव, शिराळे आणि चाफळ इ. ठिकाणी मारुतींची प्रतिष्ठापना करुन अवघ्या विवालाच हनुमानाचे महत्त्व दाखवून दिले. याच 11 मंदिरांच्या धर्तीवर अनेक मारुती मंदिरे निर्माण झाली. तत्कालीनच निर्माण झालेले अलिकडेच प्रसिध्दीस पावलेले, भक्तांच्या गळयातील तार्इत बनलेले एक मंदिर म्हणजे अक्कलकोट स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील गौडगांव येथील जागृत मारुती मंदिर होय.

संपूर्ण भारतात काहींच म्हणजे बोटावर मोजण्या इतकीच मारुतींची दक्षिणमुखी मंदिरे आहेत. त्यातलेच एक गौडगांव बु।। येथील जागृत दक्षिणमुखी मारुती मंदिर होय.

जय हनुमान ज्ञान गुण सागर,

जय कपीस तिहू¡ लोक उजागर ।

रामदूत अतुलित बलधामा,

अंजनि-पुत्र पवनसूत नामा ।।

श्री क्षेत्र गौडगांव बु।। येथील जागृत मारुती मंदिर भक्तांसाठी पर्वणीच बनत आहे. येथील हनुमान एक इच्छादेवता आहे असे अनेकांच्या मुखातून ऐकण्यात येते. अनेक श्रध्दास्थानांपैकी श्रीक्षैत्र गौडगांव बु।। देखील एक महत्त्वाचे श्रध्दास्थान बनत आहे. एक महत्त्वाचे स्थान समजले जात आहे. मंदिरात येणारया भाविकांची गर्दी पाहता जागृत देवतेची यथायोग्य प्रचिती मिळून जाते.

श्री क्षे़त्र गौडगांव बुII येथील मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य प्रवेशव्दारासमोर असलेल्या सोन्यामारुतीचे दर्शन घ्यावेच लागते. ऐकीवात आहे की बर्याच वर्षापूर्वी अनेक वानरे येथे आली होतीत्र मंदिराच्या पाठीमागे असणार्या डाव्या बाजूकडील विस्तृत चिंचेच्या झाडात वस्ती करुन होते. त्या वानरापैकी एक ज्येष्ठ वानर सोन्या मारुतीचे स्थान आहे. तो तेथेच वारला. गावातील लोकांनी विधीपूर्वक अंत्ययात्रा काढुन त्याला दफन केले. तेथेच वारला. गावातील लोकांनी विधीपूर्वक अंत्ययात्रा काढुन त्याला दफन केले. तेथेच आज त्या सोन्या मारुतीचे समाधी दिसून येते. कै. श्री आप्पाराव सिद्राम वाघमोडे यांच्या स्मरणात महादेव वाघमोउे यांनी दि. 1 एप्रिल,2007 ला तेथे स्मारक बांधले आहे. सोन्या मारुतीच्या पाठीमागे जागृत मारुती मंदिराचे आकर्षक असे प्रवेशव्दार मानवी मनाला आकर्षून घेते. प्रवेशव्दार व सभोवतालची भिंत पूर्णत: दक्षिणमुखी, दक्षिणभारतीय, हेमाडपंथी स्वरुपाची आहे. काळया घडीव, कोरीव दगडातून बांधकाम केले असून चुना व वाळु यातच बांधकाम झाल्याचे दिसून येते. सिमेंटचा कोठेही वापर दिसून येत नाही. मंदिराच्या दर्शनी महाव्दाराचा आकार लहान असून मंदिरात वाकूनच प्रवेश करावा लागतो. अलीकडे मंदिराला रंगरंगोटी सुंदररित्या करण्यात आली आहे.

प्रवेशव्दारावर डाव्या - उजव्या बाजूला दिमाखदार घोडे आहेत. दोन्ही घोडयांच्या मध्ये खालील भागात गणपतीचे सुंदर मूर्ती आहे. गणेश मूर्तीच्या वर लाल रंगात ॐ लिहलेले आहे. घोडयाच्या डोक्यावर मुख्यप्रवेशव्दाराच्या डाव्या व उजव्या कोपर्यात दोन ढाली दिसतात. यावरुन प्रथमदर्शनी हे मंदिर शिवकालीन आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. मुख्य प्रवेशव्दारावर पानाचे तोरण असून समोरच्या बाजूस 16 पाने, डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी 10 पान कोरलेली आहेत. मुख्यप्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूस कलशामध्ये पाने व त्यात नारळ ठेवल्याचे सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे असे कलश समोरुन पाच व दोन्ही बाजूस प्रत्येकी एक - एक असे कोरण्यात आले आहे. विशेष म्हणजे पानाचे तोरण व त्यावरील कलशाचे नक्षीकाम केवळ 3 - 3 दगडात सुंदररित्या केलेले दिसते. मुख्यप्रवेशव्दारावर एकदम वरच्या बाजूस चौकोनी कÍयावर हनुमानाची 7 फुटाची सुंदर मूर्ती उभारण्यात आली असून त्याच्या खांद्यावर श्री राम व लक्ष्मण आहेत. पाहताक्षणी सुंदर मूर्ती नयनसुख देवून जाते. मुख्य प्रवेशव्दारालगतच गाभार्याच्या चारही बाजूला विस्तृत संरक्षक भिंत असून ते 4 फुटी रुंदीची, 12 फुट उंचीची आहे. भिंतीच्या वरच्या बाजूला सुध्दा नक्षीकाम केल्याचे स्पष्ट दिसते तेथे चारही बाजूला भरीव कमानी आहेत.

अशा सुंदर मुख्य प्रवेश व्दारातून वाकुन प्रवेश केल्यानंतर समोर जागृत मारुतीचा सुंदर गाभारा आहे व पाठीमागे वळुन बघितल्यास मुख्य प्रवेशव्दाराला चिटकुनच वरच्या बाजूस कमानीवर काळया दगडातून बनवलेले दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ असा आहे की, तो पाहण्याचा मोह आवरतच नाही. दीपस्तंभावर चढण्यासाठी मुख्यप्रवेशव्दाराच्या आतील भिंतीला आपल्या डाव्या बाजूस 14 दगडी पायर्या कोरलेल्या आहेत. दीपस्तंभाच्या खालील बाजूस चौकोनी दगडावर चारही बाजूला सोलापूर येथील सिध्दरामेश्वर मंदिराच्या होमकÍयासारखेस नक्षीकाम आढळुन येते यावरुन ते बांधकाम 12 व्या शतकातील तर नाही ना! असे वाटल्यावाचून राहणार नाही. दीपस्तंभ व मुख्यप्रवेशव्दाराच्या छतावर पावसाचे पाणी वाहुन जाणेकरीता उतारु दगडांचा वापर केलेला आहे. दीपस्तंभ ज्या छतावर आहे. त्या छताला दक्षिणभारतीय नक्षीकाम केलेले चार स्तंभ आहेत. स्तंभावर छताला लागून नारळासारखे आकार असणारे 18 नक्षीदार दगड कोरलेले आहेत.

मुख्यप्रवेशव्दारातून आत प्रवेश करताच आपल्या डाव्या व उजव्या बाजूला एकुण नऊ देव्हारे दिसतात. नऊ देव्हार्यांची निर्मिती खरे तर नवग्रहांची स्थापना करण्यासाठी निर्माण करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ते देव्हारे नवग्रहांच्या स्थापनेविना राहिले. आता नव्या विश्वस्त समितीने डाव्या हाताच्या पहिल्या देव्हार्यात विद्यादेवता गणेशाची मूर्ती स्थापना केली आहे. त्यानंतर श्री महादेव, श्री दत्त, श्री सिध्दरामेश्वर, श्री सार्इबाबा, श्री विठ्ठल, श्री राम, श्री रामदास स्वामी व शेवटच्या देव्हार्यात श्री विरभद्रेश्वर या नऊ देवतांच्या मूर्ती स्थापलेल्या आहेत

अक्कलकोट येथील खेडगी कॉलेजच्या अध्यक्ष शिवशरण खेडगी यांनी 2006 - 2007 मध्ये गाभार्याच्या समोर व मुख्यप्रवेशव्दाराला लागून चारही बाजूस सिमेंट कॉंक्रिटचे मजबूत छत बनवून दिले आहे. त्या छताच्या मधोमध आवार आहे. त्या आवारात गाभार्याच्या समोर यज्ञकुंड आहे. यज्ञ कुंडाच्या सभोवताली व छताखाली एक दानशूर भक्ताने मार्बल घालून दिल्याने परिसर एकदम सुंदर दिसतो.

यज्ञकुंडाच्या व गाभार्याच्या मध्ये आपल्या डाव्या हाताला गजलक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. लक्ष्मीच्या दोन्ही बाजूस दोन हत्ती असून ते लक्ष्मीला हार घालत आहेत अशा प्रसंगातील ती विलोभनीय मूर्ती आहे. पूर्वीच्या काळी गावात व परिसरात एखाद्या गरोदर स्त्रीला प्रसुती वेदना सुरु झाल्या की त्या घरातील िस्त्राया ही मूर्ती पालथी टाकत व घरी जात. त्या घरी जार्इपर्यंत बाळंतीण सुखरुप होत आणि त्या घरुन पुन्हा येऊन ती मूर्ती व्यवस्थित ठेवून पूजा केली जात असे. गजलक्ष्मीची मूर्ती पूर्वमूखी आहे. त्या देवीला लगमव्वा असेही म्हणतात. दर तीन वर्षाला लक्ष्मीची जत्रा भरते.

छताखाली गाभार्यासह सात बंदिस्त कमानी आहेत. मधोमध असणारे कमानीलाच गाभार्याचे प्रवेशव्दार आहे. चारही बाजूच्या छताला सुंदर नक्षीकाम असून त्यातून अनेकविध बोध होतात. छताला आधारदेणारे खांबही आकर्षकरीत्या रंगवलेले आहेत. छताखालील भिंतीला लागून डाव्या हाताला तीन सुंदर चित्रे दिसतात. पहिले चित्र पंचमुखी हनुमानाचे आहे. त्यानंतर शंकराचे तीन मुख असणारे विलोभनीय चित्र असून तीन मुख व चार डोळे असणार्या त्या चित्रात पहिला चेहरा श्री हनुमान, मधला चेहरा श्री शंकर व पुढचा चेहरा श्री रामाचा आहे.

गाभार्यात जाण्यासाठी 3.5 x 2 फुटाचे लहान, कमी उंचीचे परंतु सुंदर प्रवेशव्दार आहे. ते प्रवेशव्दार संपूर्ण पितळाचे असून त्यावर पाच टप्प्यात नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशव्दारावर सूर्य, श्री, ॐ, स्वस्तिक, चंद्र इत्यादी धार्मिक प्रतिके आहेत. त्यांच्या वरच्या बाजूस मधोमध श्री राम असे सुंदर लिहले असून त्याच्या दोन्ही बाजूला गदा आहेत. एकदम वरच्या बाजूस कमानीमध्ये जयश्रीराम असे नांव पितळातून बनवून लावले आहे. प्रवेशव्दाराच्या एका बाजूस श्री व दुसर्या बाजूस  लिहलेले आहे. गाभारा पूर्णत: चौकोनी असून भिंत 8 x 8 फुटाची आहे. भिंत 3 फुट रुंदीची असून प्रवेशव्दार खूपच लहान असल्याने गाभार्यात वाकूनच जावे लागते. अलिकडेच आतील भागातील भिंतीनासुध्दा मार्बल लावलेले आहे. गाभारादेखील पूर्णत: कोरीव दगडातूनच बनवलेला आहे. गाभार्याच्या आतील भागातील भिंतीवर सुध्दा विविधप्रकारचे नक्षीकाम मन आकर्षून घेते. गाभार्याचे छत कोरीव दगडातून केले आहे. छताच्या मध्यभागी फुलाची नक्षी असून त्याला लहान मोठे 16 पाकळया आहेत. गाभार्याच्या चारही बाजूला कोरीव दगडातून उभारलेले स्तंभ भिंतीमध्ये अर्धवट मुरल्याचे दिसते. समोर दिसते जागृत मारुतीची सुंदर, विलोभनीय, आकर्षक, मनमोहक अशी शेंदरी रंगाची मूर्ती. हनुमानाच्या मूर्तीच्या पाठीमागे पितळाचे सिंहासन असून ते मूर्तीच्या खालपासून डोक्याच्या वरपर्यंत आहे. मारुतीच्या डोक्यावर मध्यभागी सिंहाच्या रुद्रावतारातील पितळी पÍयावर कोरीव मूर्ती आहे. पितळाचे आसन तीन टप्प्यात आहे. त्याच्या खालील भागात आकर्षक दक्षिण भारतीय दोन स्तंभ आहेत. गाभार्याच्यावर कळसापर्यंत 13 चौरसाकृती पायर्या असून कळसाचे दगड पूर्ण काळा कुळकुळीत गोलाकार आहे. अलिकडे त्याला रंग दिलेला आहे. गाभार्याजवळ 20 भरीव कमानी आहेत.

गाभार्याचे एकूण क्षेत्रफळ 8 x 8 फुट एवढे आहे. गाभार्यातील जागृत मारुतीची सुंदर मूर्ती इतर मारुतीच्या मूर्तीसारखी नसून ती एकमुखी आहे. एकांक्षी आहे., उजव्या हातात उचलेली गदा आहे. विशेष म्हणजे हा शेंडीधारी हनुमान आहे. शेंडधारी मारुती सहसा आढळुन येत नाही. मारुतीची मूर्ती बाल्यावस्थेतील आहे. असेही म्हटले जाते. मारुतीच्या डाव्या पायाखाली दुष्ट शक्तीचे प्रतिक असलेले निळया रंगाचे दगड आहेत. या जागृत मारुतीच्या संपूर्ण शरीराभोवती शेपटी आहे. मारुतीच्या वारंवार दर्शन घेतल्याने भक्ताभोवती शेपटीसारखे एक अदृश्य संरक्षक कवच तयार होते. मारुतीच्या या विलोभनीय मूर्तीच्या उजवीकडे शिवलिंग अथवा शंकराची पिंड आहे. मारुती म्हणजे शंकराचाच अवतार आहे असे म्हणतात. याची प्रचिती या मंदिरात दिसून येते. वास्तविक पाहता सदर मंदिर महादेवाचे होते असेही ऐकीवात आहे. शिवलिंगाला सरकवुन जागृत मारुतीची मूर्ती स्थापना कधी काळी करण्यात आल्याचे समजते. सध्या विश्वस्तानी शिवलिंगालाही पितळी आच्छाअन घातले आहे. अशा या गदाधारी हनुमानाच्या नाममात्र दर्शनाने भक्तांच्या चेहर्यावर समाधान उमटते. भक्ताचे संकट, समस्या, वास्तुदोष नाहीसे करणार्या या मारुतीस संकटमोचन मारुती असेही म्हणतात. मंदिराचे पूर्ण क्षेत्रफळ 60 x 100 फुट ऐवढे आहे. मंदिर पाहता क्षणीच मन भरते. भारतीय स्थापत्य कलेतील एक उत्तम नमुना म्हणून सदर मंदिराचे नाव घेण्यास काही हरकत नाही.

जागृत मारुती श्री क्षेत्र गौडगांव बुII येथे शारिरिक, मानसिक पीडा देर व्हावी, आर्थिक संकट दूर व्हावे, नोकरी मिळावी, संतती प्राप्त व्हावी, व्यापार भरभराटीस यावा, वार्इट शक्तीपासून संरक्षण व्हावे या व अशा अनेक मनोकामना घेवून येणार्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनुभव घेतलेल्यांची संख्याही भरपूर आहे. 11 शनिवार, 11 मंगळवार येथील मारुतीचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मत अनेक भक्तांनी मांडले आहे. शनिपिडा असलेल्यांनी मारुतीला शनिवारी पहाटे दोन थेंब तरी तेल ओतावे म्हणजे शनिची सावली दूर होते, तसेच ओल्या अंगाने पहाटे दर्शन घेण्याची अशी प्रथाही येथे आहे. मंगळवारी मारुतीचा जन्मवार असल्याने त्यादिवशी केलेल्या मनोकामना फलश्रृती होतात. तसे अनुभव अनेक भक्तगणांनी सांगितले आहेत. शनिवार वार असल्याने मारुतीचे दर्शन घेताना थोडासा तिरपा उभारुन घ्यावे म्हणजे शनिची सावली पडणार नाही. मारुतीचे दर्शन उभारुनच घेण्यात येते. मूर्तीपुढे कपाळ न टेकवण्याचीही प्रथा आहे. हिंदूच नाही तर इतर धर्मीय भक्तही जागृत मारुती मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचे विश्वस्त मंडळी सांगतात.

फल प्राप्तीमुळे भाविक आनंदाने, स्वखुशीने जागृत मारुती मंदिरास रोख, अन्नधान्य, वस्तुरुपात यथाशक्ती देगणी देत आहेत. सध्या या देणग्यातून विश्वस्त समिती मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम करीत असून अक्कलकोटचे मा. आमदार सिध्दराम म्हेत्रे यांच्या 6 लाख आमदार निधीतून भक्तिनिवास व अन्नछत्राचे 3 मजली बांधकाम चालू आहे. सध्या शनिवार व मंगळवार अन्नदान, प्रसाद वाटप मोठया प्रमाणात केले जाते. सोलापूर व अक्कलकोट येथून मारुती मंदिरास येण्यासाठी खाजगी वाहने व सार्वजनकि वाहनांची सोय आहे. जवळच अक्कलकोट स्वामी समार्थांचे मंदिर असल्याने समर्थ दर्शन घेणारे गौडगांव बुII येथे मोठया प्रमाणात येत आहे. अशा या जागृत देवतेचे दर्शन घेणे म्हणजे आपल्यासाठी भाग्यचे क्षण आहेत असे म्हणावे लागेल.

मी OMMALLINATH, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

  • भाषा-
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
  • वय-
  • शिक्षण-
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय-
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय-
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
  • ऑपरेटींग सिस्टीम
  • ब्राऊजर
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
{{{ommallinath}}}