सदस्य:Nikhil hari patil/s1
Appearance
जागृत देवस्थान श्री भैरवनाथ देवालय साके
अनाथाचा नाथ भैरवनाथ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं गावातील सर्व ग्रामस्थ व भाविक अबावृध्द या नवसाला पावणाऱ्या भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होतात. निसर्गाने नटलेल्या वनराई ऱ्हाई नावाच्या जंगलात भैरवनाथ देवाचे सुंदर मंदिर आहे. कागलपासून नैऋत्य दिशेस१८ किलोमीटर वर सह्याद्रीच्या उपपर्वत रांगेत डोंगररांगाजवळ वसलेलं निसर्गानं हिरवा शालू नेसवलेलं, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीत सतत अग्रेसर असलेल,माती कसदार कष्टाळू व रांगडी जनता म्हणजेच साके (ता.कागल) हे छोटसं गाव होय.या गावचे ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी व सोमवारी भरते.नवसाला पावणारे हे दैवत असल्यामुळे मोठ्या संख्येने भक्तीमंडळी येथे येतात. गावापासून थोड्या अंतरावर हिरव्या वनराईने नटलेल्या स्वच्छ व निर्मल पाण्याच्या झरा बारमाही वाहणारा निसर्गरम्य डोंगर कपारीजवळ भैरवनाथाचे सुंदर मंदिर आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वनस्पती आढळतात.याठिकाणी आंबा, जांभळ, सागवान,निरगिली,बांभळ, काजू इत्यादी वनस्पती आढळतात. याठिकाणी काही फळे आढळतात. आंबा,जांभूळ,काजू, करवंदी, पेरू अशी काही फळे आढळतात. भैरवनाथाच्या वनराईत अनेक प्रकारच्या विविध पक्षी व प्राणी ही आढळतात. कोकीळा, मोर, सुतारपक्षी असे काही पक्षी आढळतात. या भैरवनाथाच्या वनराईमुळे देवाला निसर्गरम्य ठिकाण प्राप्त झाले आहे. पावसाळ्यात याठिकाणी सर्वत्र हिरवळ,निसर्गाने निर्माण केलेल्या धबधबा याठिकाणी धबधबा बघण्यासाठी आसपास गावातील सर्व पर्यटक येत असतात.रविवार हा देवाचा नैवेद्याचा दिवस यादिवशी यात्रा सुरू लेझीमच्या तालावर,विविध मंडळे,भाविक व गावातील ग्रामस्थ नाचत वाजवत पालखी गावापासून देवाजवळ आणतात. एकच सासनकाठी एकता दाखविण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर १२ बलुतेदार पालखी भोवती गुलालाची उधळण करतात.देवाला नैवेद्य दाखविला जातो.आणि पुन्हा पालखी गावाकडे चावडीत आणली जाते.भैरवनाथ म्हणजे नवनाथापैकी एक अवतार समजला जातो. भैरवनाथ, भाऊ काळभैरी,जोगूबाई, गणपती अशी चार स्वयंभू मूर्ती आहेत. फार वर्षांपूर्वी जंगलातून वाट काढत एक गाय याठिकाणी आली. त्या गाईला आपोआप पान्हा फुटून त्या चार मूर्ती दूध प्राशन करीत असत देवाची मूळ गादी या डोंगराच्यावर एक मोठी शिळा आहे. येथे जिवंत पाण्याचा झरा आहे. तो बारमाही झरा वाहतो.१९७२च्या मोठ्या दुष्काळात हा झरा कायमपणे वाहत होता. मंदिराच्या उजव्या बाजूला गाय मुखाचे दोन कुंड आहेत. आणि समोर देवाच्या प्राचीन भक्त यमाजी बावाची जिवंत समाधी आहे. फार वर्षांपूर्वी समाधी घेताना यमाजी बावाची अंत होताना गावातील उतरंडी पडल्या होत्या. या देवाची भक्ती म्हणून बुवा समाजाला पूजाअर्चा करण्याचा मान आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दोन मोठ्या झाडांना जवताळ महू मधमाशांचे पोळ भरपूर प्रमाणात बसतात. परंतु मंदिरातील एकाही भक्तांना ही मधमाशी चावत नाही. हे येथील वैशिष्ट्ये आहे. अशा प्रकारे मोठ्या भक्तिभावाने भाविक, ग्रामस्थ व तरुण या यात्रेत सामील होतात.