सदस्य:Mahitgar/मराठी आणि विकिपीडिया एक निबंध
मराठी भाषा आणि तंत्रज्ञान
सर्व विकसित देशातील भाषांचे विकिपीडिया तबाल २ते ५ लाख लेखांनी मराठी विकिपीडियाच्या पुढे आहेत.याचे कारण विकिपीडियाचे ज्ञान भाषा म्हणून प्रयोजनास तेथील नागरीक प्राधान्य देतात.सामाजिक,अर्थिक व राजकीय अशा विवीध कारणांनी भाषे बाबत सामान्य मराठी माणूस,भाषाविद किंवा शासन सार्यांचीच भूमिका धर सोडीची राहीली आहे.मराठी थोडी थोडकी नव्हे तब्बल ९ कोटी भाषकांची भाषा आहे.जगातील १५ सर्वात अधिक बोलल्या जाणार्या भाषांपैकी एक भाषा आहे.२००९च्या दहावी परीक्षेस बसलेल्या मुलांपैकी सुमारे साडेबारा लाख अदमासे ९० टक्के मुले मराठी माध्यमाची असावीत इंग्रजीला प्रथम भाषा म्हणून लिहीणार्या जवळपास दिडलाख मुलेही मुळची मराठी भाषिक असावित[१].या सर्वांनाच इंग्रजीतून शीक्षण दिकलेतरी अर्थशास्त्राच्या नेमक्या कोणत्या नियमानुसार प्रत्येकाची ईंग्रजीमुळे भरभराट होणार आहे? शिक्षणक्षेत्रातील नेमक्या कोणत्या क्रांतीने तब्बल ९ कोटी लोक इंग्रजीतून शिक्षण घ्यायला लागतील? मराठीतच अंतरराष्ट्रीय पातळीचे अद्ययावत द्न्यान देण्यातील अडचण नेमकी कोणती?
आज तंत्रद्न्यानाच्या आम्ही अशा उंबरठ्यावर उभे आहोत की आणखी थोडासाच जोर लावला तर इंग्रजीतले सारे द्न्यान तत्क्षणी मराठीत भाषांतरीत करता येईल.पण मराठी माणूसच जर मनाने हरला असेल तर तंत्रद्न्यांनी नेमक्या कोणत्या प्रोत्साहनाने स्वतःचा वेळ तुमच्या भाषेवर खर्च करावा ?
खालील उपलब्ध सुविधांबद्दल जर विचारपूर्वक विचार केला तर लक्षात येईल कि मराठी स्वयंचलीत भाषांतर प्रणालींच्या किती जवळ उभी आहे.मनोगत संकेतस्थळाचा आणि नंतर गमभनने उपलब्ध केलेला शुद्धी चिकित्सक काय सांगतो? अजून (थोडी) मेहनत घेतली तर इंग्रजी/हिन्दीची वाक्ये मराठीत भाषांतरीत होऊन मीळू शकणार नाहीत? गूगलने स्वयंचलित इंग्रजी ते हिन्दी भाषांतरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे मग इंग्रजीते मराठी हिन्दीते मराठी का शक्य नाही ? मनाचा जरा हिय्या केलाकी मराठीच आख्ख व्याकरण प्रत्येक वाक्य ते वाक्य इंग्रजीते मराठी भाषांतरे संगणक प्रणालींना उपलब्ध करून देता येणार नाहीत?
आज संगणक तंत्रद्न्यान हाताशी आहे पण तंत्रद्न्यान नसलेल्या काळात पण जपानी,चिनी जर्मन कोणत्या भाषेने द्न्यान भाषेचा दर्जा गमावला ? रक्ताच्या आणाभाका देऊन मराठी राज्य आकारास आणणार्या माणसाने मात्र भाषांतरांबद्दल घेतलेली मेहनत पुरेशी होती का ? जगाला संगणक प्रणाली उपल्ब्ध करणार्या भारतीयांचे स्वकीय भाषेतील संगणक प्रणाली एवढी मागे का? शासनाला मीठात आयोडीन सक्तीचे करण्याचा कायदा करता येतो, संगणक आणि प्रणाली विक्रेत्यांना भारतीय भाषांचे फाँट आणि कळफलक सक्तीचे का करता येत नाहीत ? कुठे चार संगणक प्रणाली कंपन्यांमुळे आणि प्रदेशात गेलेल्या अभियंत्यांच्या बळावर इंडिया शाईन आणि जय हो ची चित्रे आम्ही रंगवत आहोत.इंडिया शाईन आणि जय हो चे चित्र रथ एवढे सुंदर रंगतात की स्वप्न रंगवणार्या प्रत्येक भारतीया ला स्वतःच त्या इंडिया शाईन आणि जय हो च्या गाडीत झोपल्याची सुखस्वप्ने पहात त्या चित्र रथात जागा न मिळालेले एक अब्ज लोक स्वतःची भाषा सांस्कृती आणि आर्थिक प्रगतीवर पाणी सोडत असतात ?
वर लिहिलेली टिका करताना ज्यांनी तंत्रज्द्नान भारतीय भाषात आणण्याचे कष्ट केले त्यांना कमी पणा आणण्याचा उद्देश नाही, आज थोडे फार स्व भाषे बद्दल काही होत आहे तर ते आपल्या स्वयंसेवी अनसंग हिरों मुळेच. सांगण्याचा उद्देश एव्हढाच आहे की दोनच गोष्टी हव्यात पहील मराठी जगणार मराठी मन आणि तंत्र्द्न्यानाच्या यशाकरिता द्यावयाचा अजून एक धक्का.
दिशा
[संपादन]- संगणकांवर देवनागरी फॉंट व इन्स्क्रीप्ट किबोर्ड कसा वापरावा याकरिता तांत्रीक सहाय्य उपलब्ध करणे
- नवीन संगणकांवर देवनागरी फॉंट असणे सक्तीचे करणे
- Font conversion utilities ANSI to Unicode and vice versa
- Advance Transliteration utilities to convert nouns
- Translation utilities
- प्रगत स्वरूपात संपूर्ण मराठी व्याकरण आणि मराठी भाषेचे संशोधन आंतरजालावर तेही यूनिकोड फॉर्मॅट मध्ये उपलब्ध करणे
- मराठीच्या सर्व बोली भाषेतील शब्द विक्शनरीत/आंतरजालावर घेणे
- आंतरजालावर सर्व भाषांच्या व्यूत्पत्ती उपलब्ध करणे
- एखादा शब्द सर्व उपसर्ग आणि प्रत्यय आणि विभक्ती सोबत बघता येणे आणि त्याची सर्व सामान्य रूपे बनवून दाखवणे
- वाक्यांची वाक्य ते वाक्य भाषांतरे उपलब्ध करणे
- उपलब्ध भाषांतरातून वाक्य ते वाक्य जोडणे
- call centres/SMS ग्रूप्सच्या माध्यमातून भाषांतरांची देवाण घेवाण
- भाषांतरातून उत्पन्नाला प्रोत्साहन सोबत शहरी सुशिक्षीत रोजगार हमी योजने सारखा कार्यक्रमात भाषांतराचे/अनुवाद कार्यक्रमाचे नियोजन