सदस्य:Ashutoshrapatwar1
Appearance
जयंती नदी अंबाजोगाई मधून प्राचीन काळापासून वाहणारी ही एक नदी आहे. मराठवाड्यातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे हे शहर परळी वैजनाथपासून अवघ्या ३५ कि. मी. अंतरावर आहे. अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या मंदिराची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीची आहे. जवळच जयंती नदी डोंगराच्या कड्यावरून खाली दरीत कोसळते. या दरीस अश्वदरी असे म्हणतात. ही छोटी नदी असून या नदी ला ऐतिहासिक महत्त्व आहे .