Jump to content

सदस्य:शहाजी कांबळे/4

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिंगळा (लोककला) महाराष्ट्र ही संतांची व पुरोगामी विचारांची भूमी आहे. या भूमीत विविध जाती धर्माचे लोक राहतात. विविध जाती धर्मातील काही लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध लोककला आजही सादर करत आहेत. या मधील एक लोककला म्हणजे पिंगळा होय.

स्वातंत्र्योत्तर काळात गेल्या काही वर्षात कामधंद्याच्या निमित्ताने गावगाड्यातील ग्राम व्यवस्थेत. या भटक्या विमुक्त जाती जमातींचा समावेश नव्हता. परंतु गाव गड्याबाहेर राहूनही. विविध लोक कलेच्या माध्यमातून उपजीविका करीत असे. हे लोक एकचा गावत दीर्घ काळ रहात नसत. तर काही वेळेला मुदतिपेक्ष्य जास्त दिवस एकाच गावत राहू दिले जात नसे. त्यामुळे त्यांना मजल दरमजल करत भटकंती करावी लागत असे. या भटक्या जाती जमातीतील एक जमात म्हणजे कुडमुडे जोशी यांना पिंगळा किंवा पांगुळ असे ही म्हणतात. पिंगळा किंवा पांगुळ या लोककलेची माहिती घेण्यासाठी आम्ही सोलापूर जिल्हा माळशिरस तालूक्यातील वेळापूरच्या दक्षिण गावशिवरात वसलेल्या चव्हाणवाडी येथील. ‘भटके-विमुक्त विकासमंच’ या संस्थेच्या माध्यमातून तत्कालीन गृहमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेळापूर गावाच्या माळरानावरचा काही भाग राहण्यासाठी भटक्या जोशी समाजाला दिला. त्या ठिकाणी २५-३० भटक्या सामाज्याची कुटुंब स्थिर झाली. या चव्हाणवाडीत अर्जुन चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले “ पिंगळा यांचा पेहराव म्हणजे नेहरू शर्ट, धोतर , काळा कोट , खांद्यावर घोंगडी, हातात घुंगराची काठी, काखेला झोळी, डोक्यावर रुबाबदार फेटा व त्याला चंदेरी विविध नक्षीकाम केलेले पट्टी बांधली जाते व कपाळी शंकर महादेवाचे विभूती लावली जाते. त्यासोबत डाव्या हातात कंदील व उजव्या हातात कुडमुडे असते.

पिंगळा लोक कलाकार

पिंगळा किंवा पांगुळ ही एक भटक्या भिक्षेकऱ्यांची जात आहे. सूर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. म्हणूनच ते सूर्योदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करून दान मागतात. कधीकधी हे पांगुळ पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर बसलेले दिसतात. तेथूनच ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडून दान मागतात.

पहाटेच्या वेळी पिंगळ्याचे गावात आगमन होताच हातातील कुडमुडे वाजवत, विविध देवदेवतांचे नाम घेत दारोदार फिरतो. पहाटेच्या शांत वातावरणात ज्या पक्षाचा आवाज येईल त्या पक्षाची भाषा अमुक-अमुक आहे असे सांगतात. प्रसंगी टिटवीचा आवाज आला तर मोठा अपशकून होणार असल्याचे सांगतात. घुबडाचे ओरडणे ऐकू आले तर मोठे संकट येणार असल्याचे सांगून सावधानतेचा इशारा देतात. कोंबड्याच्या आरवण्याने आवाज आला गाईचे हंबरणे चा आवाज झाला तर शुभ संकेत असल्याचे सांगतात .

पहाटेच्या वेळी घरातून दान वाढण्यासाठी दारात आलेल्या सासुरवाशिणीच्या चेहऱ्याचे निरीक्षण करून चेहरा नाराज दिसल्यास बाई ग तू फार दुःखी दिसतेस रात्री पासून तुझ्या घरात भांडण चालू हाय, तू वेळेवर खात नाही, वेळेवर पीत नाही घरात कुठल्या कामावर लक्ष नाही त्यामुळे वेळेवर झोप नाय, पण काळजी करू नकोस पोरी इथून पुढे तुला चांगले दिवस येणार आहेत या शब्दात मानसिक आधार देत त्या गृहिणीला धीर देऊन त्या गृहिणी कडून हक्काने मागून धान्य अथवा पैसे पदरात पाडून घेतात दान देण्यात आलेल्या व्यक्तीचा चेहऱ्याचे निरीक्षण करून , चेहरा वाचून चेहऱ्यावरील हावभावाप्रमाणे सुख समाधानाच्या गोष्टी त्या व्यक्तीला सांगतो त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लोकांना पटतात व समांतर वाटतात . त्यामुळे पिंगळ्याला भविष्य कळते, त्याच्या जीभेवर म्हणे काळा तीळ असतो असा लोकांचा समज निर्माण झाला. त्यामुळे वैफल्यग्रस्त लोक पिंगळ्यांकडून भविष्य जाणून घेऊ लागले. पुढेपुढे याचाच फायदा घेऊन पोटार्थी पिंगळे यांनी भविष्य बघण्यावर जास्तीत जास्त भर दिला. यातूनच त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे समोरील व्यक्तीचे मन जिंकून पिंगळा आपला हेतू साध्य करून जास्तीत जास्त धान्य किंवा पैसे पदरात पाडून घेऊ लागला. भविष्य सांगण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे आजचे पिंगळे भविष्य बघणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून वावरत आहेत.