सदस्य:शहाजी कांबळे/2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

-: वासुदेव :- (लोककला) यमुना नदी काठी वसलेल्या मथुरेत वसुदेव आणि देवकी नामक दाम्पत्य रहात होते. देवकीला कंस नावाचा भाऊ होता. तो देवकीला खुप जिव लावत असे. एके दिवसी वसुदेव, देवकी, कंस प्रवासाला जात असताना, “देवकीचा आठवापुत्र कंसाचा सर्वनाश करेल” अशी आकाशवाणी झाली. कंस क्रोधित झाला. त्याने ठरवले देवकीलाच मारून टाकायचे. परन्तु वसुदेवाने कंसाला विनंती केली की जन्मलेल्या मुलापासुन तुला धोका आहे, देवाकिपासून नाही. त्यामुळे कंसाने वसुदेव-देवकिला काराग्राहत बंदिवान ठेवले. आणि देवकीपोटी जन्मलेले सात अपत्य मारून टाकले. परंतु देवकिचा आठवा पुत्र जन्मला. तेजोमय प्रकाशात साक्षात चतुर्भुज भगवान श्रीकृष्ण उभे ठाकले. त्यानी वसुदेवाला सांगितले, गोकुळात राजा नंदलाल यांच्या घरी यशोदा मातेला कन्या प्राप्त झाली आहे. यशोदा मातेजवळ मला ठेउन यशोदेची कन्या बंदिवानाता घेउन या. श्रीकृष्णाने सांगितल्यानुसार वसुदेवाने कृति केली. अशा प्रकारे श्रीकृष्ण गोकुळात वाढू लागला. नंदलाल हा गोकुळाचा राजा होता. त्याच्या घरी भरपूर गाई होत्या. श्रीकृष्ण गाई चारायला घेवुन जात असे. गाईला संस्कृत मध्ये वसु म्हणतात. या वसुंची राखण करणाऱ्या श्रीकृष्णाला नंदलाल गवळ्यानी वासुदेव असे नामकरण केले. हाच वासुदेव गाई चारन्यासाठी वनात गेले असता आवडीने डोक्यात मोर पिस घालीत असे. आज गावोगावी रामप्रहरी येणारे वासुदेव हे कृष्णाचे रूप मानले जाते.

	'वासुदेव' या परंपरेची सुरुवात द्वापर  युगापसुन झाली असावी. तद्नंतर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव तुकाराम, संत एकनाथ  यांनी' वासुदेवावर' लिहीलेली अनेक रुपके आजही आढ़ळतात, त्या पैकी एक खलील प्रमाणे.

गातों वासुदेव मी ऐका । चित्त ठायीं ठेवून ऐका । डोळे झांकून रात्र करूं नका । काळ करीत बैसला असे लेखा गा ॥ राम राम स्मरा आधीं ॥ ॥ वासुदेव हरी वासुदेव हरी | सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी | सीता सावली माना दान करी वासुदेवा | श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका | सकाळच्या प्रहरी ग्रामीण भागात, अंगावर बाराबंदी, डोक्यावर मोर पिसांचा टोप, एका हातात टाळ, दुसरया हातात चिपळ्या, कपाळी गोपीचंद बुक्का, गळ्यात तुळशिची व रुद्राक्षाच्या माळ, खांद्याला झोळी, कमरेला शेला बांधून. “हरी नाम बोला तुम्ही हरिनाम बोला. सकाळच्या पारी, दारी वासुदेव आला.”

         असा हरी नामाचा जय घोष करत-करत दिवस उगवायच्या सुमारास  वासुदेवाचे गावात येतो. सकाळी गावात गावगाड्याची कामाची लगबग सुरु आहे. अंधुक धुके पसरले आहे. पक्षांचा किलबिलाट सकाळच्या वातावणात मनमोहित करतो. बाया-बापड्या सडा-सारवन मग्न आहेत. गोठ्यात गाई-गुरांची हालचाल सुरु आहे. त्यांच्या गळ्यातील  घंटी तालमय वाजत आहे. आशा सुंदर वतावरनात वासुदेव आपल्या गोड आवाजात गवळनी, भाव गीते, देवाची नावे घेत. गावात प्रवेश करतो.
        वसुदेवाच्या आवाजाने सकाळच्या सुंदर वातावरणात आणखी भर पड़ते. वासुदेव आपल्या मानाच्या घरी म्हणजेच  कुंभाराच्या किंवा सुताराच्या घरी भिक्षा मागुन दिवसाची सुरुवात करतो. प्रतेक घराच्या अंगणात जाऊन गाणी म्हणायची आणि आणि जे धान्य पैसे मिळतील ते घेउन पुडच्या अंगणात जायच. वासुदेव गाणी म्हणत एका हाताने चिपल्या, एका हाताने टाळ वाजवतो त्यामुळे गाणी आणखीनच मधुर होतात. बाया-बापड्या आनंदाने  धान्य, पीठ, तांदुळ वासुदेवाच्या झोळीत घालतात. मग वसुदेव आपल्या झोळीतील मुठभर धान्य देणारयाच्या पदरता घालतो. त्याना कुंकू लावतो. आशिर्वाद देतो. कोणी पैसे सुद्धा देतात. एकादा भाविक वसुदेवाला थांबवून आणखी एकदोन गाणी म्हणायला लावतो. त्या बदल्यात ते पैसे ही देतात. 
         एकादया ठिकाणी वसुदेवाची पूजा केली जाते. वासुदेवाच्या पायावर पाणी घालून त्याला कुंकू लावून पूजा करतात त्यांना पैसे देतात. मग वसुदेव खुश होउन ज्यानी पैसे दिले त्यांच्या अंगणातच कवण म्हणतो. कवन म्हणजे त्या घरातील मृत व्यक्तींची नावे घेउन त्यांच्या नावाने “दान पावले हे गाण्यातुन सांगतो त्याला कवन म्हणतात.   

१ . कवन सरगा मंधीहो.., रामा दादाला..., सुख लगाव.., तिन्ही काळहो...

त्याच्या बाळाला.., बरकत येऊदे.., वाढा भरुदे... गाई गुरानी...

शेता मंदी र..,

रास भरुदे..

धान पिकुदे .., खाई खंड्यानं..,

त्या रासमंदी.., सुप भरुदे... सुपान दान.., द्याव वासुदेवाला...

दान पाऊदे.., अज्या पंज्याला... सुखी राहुदे.., वस्ती वाडीला..


२. भूपाळी घन शाम सुंदरा अरुणोदय जाहला. उठी लवकरी वनमाळी, जळी मित्र आला. ३. अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा, कांसे पितांबर

आवडे निरंतर तेची रूप मकरकुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत.

३. काकड गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं ।

सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥

४. गवळण राधे तुला बोलावितो वनमाळी || धृ || वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ || साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ || एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||

अशी विविध कवन, भूपाळी , काकड आरती , अभंग , गवळणी , टाळ चिपळी च्या ताला-सुरत गाऊन वासुदेव लोकांची मने तृप्त करतो . गावा-गावात भक्ती-भाव वाढवतो. बाराशे वर्षापूर्वी सुरु झालेली ही वासुदेवाची लोककला महाराष्ट्रात आजही टिकून आहे. एक काळ असा होता पाउस चांगला पडायचा .महाराष्ट्रातील प्रमुख नद्या बारमाही वाहत होत्या. त्यामुळे शेतात पीक हि चांगलं यायचं . एकादा भिक्षुक दारात आला तर बाया-बापड्या भर-भरून धान्य झोळीत वाढत होत्या . पण हळू हळू पाऊस कमी झाला . उत्त्पन्न कमी झालं . दान देण्याचं प्रमाण कमी झालं. लोककलाकारांचे उत्पन्न ही कमी झाले. त्यामुळे लोककलाकारांची उपासमार होऊ लागली. पूर्वी वासुदेव गावात आला की आनंद व्ह्याचा. लहान मुलांचा गलका व्हायचा . वासुदेवाच कौतिक व्हायचं . लोकांचं मनोरंजन व्हायचं , प्रबोधन व्हायचं, भक्ती भाव वाढायचा . पण आता सगळं बदलून गेलं. दान देणाऱ्याची पिढी बदलली . नव्या पिढीचे नवे संस्कार आले . आता वासुदेव आला तर कोणाला आनंद होत नाही. बाया-बापड्याची चिमुठभर धान्य वाढायची मानसिकता राहिली नाही. वासुदेवाचं गाणं कोण मन लावून ऐकत नाही. कोणी, हे गाणं म्हणा ते गाणं म्हणा अशी इच्छा, आवड कोण दाखवत नाही. चांगलं गाणं गाई गाईलं म्हणून कोण बक्षीस देत नाही. वासुदेवाची झोळी रिकामी राहू लागली. पूर्वी मनोरंजनाची साधने नव्हती. लोककला हाच लोकांच्या मनोरंजनचा भाग होत . आता प्रत्येकाच्या घरात टीव्ही आली. हातात मोबाईल आला. मनोरंजनाची अनेक साधने सहजा सहजी उपलब्ध झाली. बसल्या जागी लोकांचं मनोरंच होऊ लागलं. त्यामुळे आज लोककलाकार हा मनोरंजनाचा नसून मस्करीचा विषय झाला आहे. लोककलेविषयी लोकांच्या मानत आस्मिता राहिला नाही. टीव्ही मधील खोट्या वासुद्वाचे लोक कौतुक करतील पण दारात आलेल्या वसुदेवाला ते वळून पाहणार नाहीत. आजच्या वासुदेवला दान नाही तर भिक दया म्हणायची वेळ आली आहे. ऐके काळी लोककलाकाराला राजदरबारात बहुमान होता, राजे महाराजे लोककलाकाराला सोने, चांदी, मोहरा व जमीनी इनाम म्हणून बक्षिस देत होते. आजच्या काळात महिन्याकाठी शासकीय मानधन दोन हजार मिळते. ते ही कुणाला मिळते कुणाला नाही . तेवढ्यावर संसार चालत नाही आणि गावात भिक्षा मागायला गेलं तर भिक्षा मिळत नाही. जरी पोटापुरत दान मिळल पण वाढत्या महागाईच्या काळात इतर गोष्टीचा खर्च भागात नाही. मुलाबाळांची कपडे, आजार, ,त्यांचं शिक्षण, लग्नकार्य, राहण्याची सोय, अशा अनेक गोष्टींचा खर्च कसा भागवायचा ? मग तो इतर काहीतरी व्यवसाय, मजुरी करतो . लोककलाकरचे हाल-हाल होत असेलतर लोक कलाकाराची येणारी पिढी लोककलेची परंपरा जपण्याचं धाडस करणार नाही. लोककलोककलाकाराची नवी पिढी जगण्याचा वेग वेगळा मार्ग शोधू लागली. व्यवसाय , मोल-मजुरी, करून कसे बसे पोट भरू लागली. तर काहीजणांना पात्रतेनुसार शासकीय नोकऱ्या मिळाल्या. [१]

  1. ^ https://www.wikiwand.com/mr/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3). |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)