सत्य साईबाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सत्य साईबाबा

सत्य साईबाबा, जन्मनाव सत्यनारायण राजू, (तेलुगू: సత్య సాయిబాబా ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १९२६ - २४ एप्रिल, इ.स. २०११) हे अर्वाचीन भारतातील आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचे जगभरात पसरलेले भक्त त्यांना ईश्वरी व्यक्तिमत्त्व आणि शिर्डीच्या साईबाबांचा अवतार मानतात. भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मोफत किंवा अल्पखर्चात शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देत असलेल्या संस्था त्यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे.