सत्यनारायण गोयंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सत्यनारायन गोयंका या पानावरून पुनर्निर्देशित)

सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका (३० जानेवारी १९२४ - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तिचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.[१] एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल इ.स. २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.

कार्य[संपादन]

सत्यनारायण गोयंका इ.स. १९६९ सालच्या जून महिन्यात विपश्यनेच्या आचार्य पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी मुंबईत पहिले विपश्यना शिबिर ३ ते १४ जुलै इ.स. १९६९ या दिवसांत एका धर्मशाळेत भरविले.[२] त्यांनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे इ.स. १९७६ साली "विपश्यना विश्व विद्यापीठाची" स्थापना केली. इ.स. १९८५ साली त्यांनी इगतपुरीतच विपश्यना संशोधन केंद्राचीही स्थापना केली.[३][४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. परंपरेतील विपश्यना ध्यानपद्धतीचा
  2. "विपश्यना म्हणजे काय?" (मराठी मजकूर). दिव्यमराठी. ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 
  3. "विपश्यना गुरु एसएन गोयंका नो मोअर" (इंग्रजी मजकूर). डीएनए इंडिया. ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 
  4. "विपश्यना पायोनियर एसएन गोयंका इज डेड" (इंग्रजी मजकूर). झीन्यूजइंडिया डॉट कॉम. ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]