सत्यनारायण गोयंका
सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका (जन्म : ३० जानेवारी १९२४; - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[१] एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल इ.स. २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.
कार्य
[संपादन]सत्यनारायण गोयंका इ.स. १९६९ सालच्या जून महिन्यात विपश्यनेच्या आचार्य पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी मुंबईत पहिले विपश्यना शिबिर ३ ते १४ जुलै इ.स. १९६९ या दिवसांत एका धर्मशाळेत भरविले.[२] त्यांनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे इ.स. १९७६ साली "विपश्यना विश्व विद्यापीठाची" स्थापना केली. इ.स. १९८५ साली त्यांनी इगतपुरीतच विपश्यना संशोधन केंद्राचीही स्थापना केली.[३][४]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ परंपरेतील विपश्यना ध्यानपद्धतीचा
- ^ "विपश्यना म्हणजे काय?". ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "विपश्यना गुरु एसएन गोयंका नो मोअर" (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ^ "विपश्यना पायोनियर एसएन गोयंका इज डेड" (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्रजी भाषेत). ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.