सत्यनारायण जतिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सत्यनारायण जतिया
जन्म फेब्रुवारी ४, इ.स. १९४६
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय

सत्यनारायण जतिया ( फेब्रुवारी ४, इ.स. १९४६) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९९ ते इ.स. २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये कामगारमंत्री होते. तसेच ते इ.स. १९८०, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.