संयुजा
Appearance
संयुजा[१] (इंग्लिश: Valence / Valency, व्हॅलन्स/ व्हॅलन्सी ;) म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूशी संयोग पावण्याची क्षमता मोजण्याचे मान असते. एखादा अणू अन्य एखाद्या अणूशी किंवा अन्य अनेक अणूंशी किती संयुजाबंध बनवू शकतो, तितकी त्याची संयुजा असते. उदाहरणार्थ, जो अणू एका हायड्रोजन अणूशी बांधला जाऊ शकतो, तो एकसंयुजी असतो; तर जो अणू दोन हायड्रोजन अणूंशी बांधला जाऊ शकतो, तो द्विसंयुजी असतो. जो अणू दुसऱ्या कोणत्याच अणूशी जोडला जाऊ शकत नाही, तो अणू शून्य संयुजी असतो.
अणुची बाह्यतम कक्षा ही संयुजा कक्षा व त्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या ही संयुजा इलेक्ट्रॉन म्हणून ओळखली जाते. जसे, सोडियमचा अणुअंक 11 असून त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण(2,8,1) असे आहे.
म्हणजेच सोडियमच्या संयुजा कक्षेत फक्त 1 इलेक्ट्रॉन असून हीच त्याची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या होय.
संयुजा इलेक्ट्रॉन संख्या जेवढी कमी म्हणजेच बाह्यतम कक्षेत जेवढे कमी इलेक्ट्रॉन तेवढेच केंद्रकातील धनप्रभार व संयुजा इलेक्टॉन यांच्यातील आकर्षण कमी असते. यामुळे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते. मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती जेवढी जास्त म्हणजेच संयुजा इलेक्टॉनची संख्या जेवढी कमी तेवढीच त्याची अभिक्रियाशीलता जास्त असते.
संदर्भ
[संपादन]- ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. ३१०.
बाह्य दुवे
[संपादन]- "एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ज्ञानकोशातील माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)