संन्याशांचे चार प्रकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


हिंदू धर्मशास्त्रामध्ये कुटीकच, बहूदक, हंस आणि परमहंस असे संन्याशांचे चार प्रकार सांगितलेले आहेत. हे विविदिषा आणि विद्वत्संन्याशांचे उपप्रकार आहेत. विविदिषा संन्याशाला दंड व भगवी वस्त्रे आवश्यक नसतात, परंतु विद्वत्संन्याशांमध्ये भगवी वस्त्रे व दंडधारण असते.

  1. शिखा व यज्ञोपवीत ठेवून, भगवी वस्त्रे व त्रिदंड धारण करून, घराबाहेर पर्णकुटीत वा स्वगृही राहून, बांधवांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी भोजन करणारा तो "कुटीकच" संन्यासी होय.
  2. पुत्रादिकांचा परित्याग करून सात घरी भिक्षा मागणारा, भगवी वस्त्रे धारण करुन त्रिदंड, शिखा, यज्ञोपवीत धारण करणारा "बहूदक" संन्यासी होय.
  3. वरील दोन्ही प्रकाराप्रमाणेच वेषभूषा करून शिवाय एक दंड धारण करणारा "हंस" संन्यासी होय.
  4. शिखायज्ञोपवीतरहित राहून भगवी वस्त्रे व एकदंड धारण करणारा तो "परमहंस" संन्यासी होय.

कोणतीही व्यक्ती कुठल्याही आश्रमात किंवा मठात जाऊन एखाद्या गुरूकडून संन्याशाची दीक्षा घेऊ शकत असली, तरी आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी एखाद्या मठातून घेतलेली दीक्षा ही भारतभर मानली जाते. ते चार मठ आणि त्या मठातून दीक्षा घेतलेल्या संन्याशाचे जोडनाव :

  1. शृंगेरी मठ : हा मठ दक्षिण भारतात रामेश्वरम येथे आहे. येथे दीक्षा घेतलेल्या संन्याशाच्या नावानंतर सरस्वती, भारती किंवा पुरी ह्यांपैकी एक उपनाम येते.
  2. गोवर्धन मठ : हा मठ ओरिसा राज्यात जगन्नाथपुरी येथ आहे. येथून दीक्षा घेतलेल्या संन्याशाचा नावाला आरण्य हा शब्द जोडला जातो.
  3. शारदा मठ : शारदा (कालिका) मठ गुजरातमध्ये द्वारका गावात आहे. या मठात दीक्षा घेतलेल्या संन्याशाच्या नावाला तीर्थ किंवा आश्रम हे उपनाव लागते.
  4. ज्योतिर्मठ : ज्योतिर्मठ हा उत्तराखंड राज्यात बद्रिकेदार येथे आहे. या आश्रमाकडून दीक्षा घेणाऱ्या संन्याशाला गिरी, पर्वत किंवा और सागर हे संप्रदायाचे उपनाव मिळते.