संदीप वासलेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदीप वासलेकर (३ एप्रिल, १९५९ - ) हे मराठी तत्त्वज्ञ आहेत. हे संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात. हे एक 'स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप' नावाच्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शांततामय सामाजिक परिवर्तनासाठीच्या त्यांच्या कल्पनांवर युरोपातील लोकसभांमध्ये, इंग्लंडच्या दोन्ही सभागृहांमध्ये, युनोच्या सुरक्षा परिषदेत आणि डेव्हाॅस येथे भरणाऱ्या जागतिक अर्थशास्त्रज्ञांच्या संमेलनांत चर्चा झाल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

बालपण आणि शिक्षण[संपादन]

वासलेकरांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण डोंबिवलीत गेले. मुंबई विद्यापीठाचे एम.काॅम. आहेत. ज्यावेळी त्यांचे वय फक्त २० वर्षाचे होते, आणि त्यांची बी.काॅमची परीक्षा १२ दिवसांवर होती, त्यावेळी त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर वर्तमानपत्रात एक लेख लिहिला आणि त्या क्षणापासून ते आंतरराष्ट्रीय अर्थक्षेत्रात ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांना जगातील अनेक वित्तसंस्थांकडून आणि अगदी ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून भाषणांची निमंत्रणे येऊ लागली. त्या विद्यापीठातील त्यांचे शिक्षण जेव्हा पूर्ण झाले तेव्हा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून ते भारतात आले.

भारतात आल्यावर[संपादन]

२०११ साली संदीप वासलेकरांना भारताच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट. ही पदवी प्रदान झाली. २०१४ साली त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या हॅरिस मॅँचेस्टर काॅलेजातील Centre for the Resolution of Intractable Conflicts या विभागात रिसर्च फेलो म्हणून घेतले.

लेखन[संपादन]

संदीप वासलेकरांनी भारतातील आणि जगातील ५०हून अधिक वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून जागतिक शांतता या विषयावर लेख लिहिले आहेत. दैनिक सकाळमध्ये ते २०१२पासून सातत्याने लिखाण करीत आहेत.

निवडक पुस्तके[संपादन]

  • An Inclusive World in which the West, Islam, and the Rest Have a Stake (इंग्रजी)
  • एका दिशेचा शोध
  • Cost of Conflict in the Middle East (इंग्रजी)
  • Dharma Rajya : Path-breaking Reforms for India's Governance (इंग्रजी)
  • नव्या युगाचा आरंभ (सहलेखिका : इल्मास फतेहअली)
  • The Final Settlement: Restructuring India-Pakistan Relations (इंग्रजी)
  • The Blue Peace – Rethinking Middle East Water (इंग्रजी)
  • Reshaping the Agenda in Kashmir (इंग्रजी, सहलेखिका : इल्मास फतेहअली)
  • Shifting Sands : Instability in Undefined Asia (इंग्रजी)
  • South Asian Drama: Travails of Misgovernance (इंग्रजी)
  • A handbook for conflict resolution in South Asia (इंग्रजी)

संदीप वासलेकरांचे काही मराठी लेख[संपादन]

  • आपलं दुभंगणारं जग (दैनिक सकाळ, २८ जुले २०१९)
  • एक होता फ्लेचर ...(दैनिक सकाळ, ३ डिसेंबर २०१७)
  • उरलेलं अर्धं उत्तर (सकाळ, ९ सप्टेंबर २०१८)
  • निवडणुका अनेक; शोध एक (सकाळ, १३ जानेवारी २०१९)
  • पाणी कधी उकळतं (सकाळ, १६ डिसेंबर २०१८)
  • पोळी, पिझ्झा आणि प्रगती (In Search of freedom या संदीप वासलेकर यांच्या ब्लाॅगवर)
  • मी कोण आहे? (दैनिक सकाळ, १९ मे २०१९)
  • यश नको; आनंद मिळवा (दैनिक सकाळ, १ जुलै २०१८)
  • या क्षणी (दैनिक सकाळ, १५ जुलै २०१८)
  • युवकांसाठी दिशादर्शक उपक्रम (सकाळ, ११ ऑगस्ट २०१९)
  • युवकांसाठीचा मंत्र (दैनिक सकाळ, १० मार्च २०१९)
  • राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं (सकाळ, २ जून २०१९)
  • राजाच्या दाताला कीड लागली तर! (सकाळ, १० फेब्रुवारी २०१९)
  • शतकानुशतकं टिकणारे उद्योग (सकाळ, २५ ऑगस्ट २०१९)
  • शिक्षणातून शांततेकडं (दैनिक सकाळ, १६ जून २०१९)
  • स्पर्धापरीक्षांच्या पलीकडे... (दैनिक सकाळ, १० सप्टेंबर २०१७)
  • वगैरे