संजीवा रणतुंगा (२५ एप्रिल, १९६९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाकडून १९९४ ते १९९७ दरम्यान ९ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.
याचे तीन भाऊ सुद्धा व्यावसायिक क्रिकेट खेळत असत.