संजय सूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संजय भाऊराव सूरकर[१] ( १९५९ - २७ सप्टेंबर, इ.स. २०१२) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक व पटकथाकार होते. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका, तसेच हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. ’तू तिथं मी’च्या दिग्दर्शनासाठी संजय नूरकर यांना १९९८चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

बालपण[संपादन]

यांचे बालपण नागपूर येथे गेले. नागपूरच्या जी. एस. कॉलेजमधून त्यांनी बी.कॉम. ही पदवी घेतली. पण नाटकाची आवड असल्यामुळे नागपूर विद्यापीठातील ललित कला विभागात प्रवेश घेऊन मास्टर्सची डिग्री मिळवली. नागपुरामध्ये सुरुवातीच्या काळात एकांकिका व नाटके केली.

कारकीर्द[संपादन]

कारकिर्दीच्या सुरुवातीला ते गिरीश ओक यांच्या बरोबरीने मुंबईत आले. टीव्हीवरील मालिकांमध्ये संजय यांनो ' गावाकडच्या गोष्टी ' आणि तत्सम मालिकांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. कलाकार म्हणून त्याचवेळी ते ’सुयोग ' संस्थेच्या 'भ्रमाचा भोपळा' या व्यावसायिक नाटकातही काम करीत होते. 'वंश' हे नाटक त्यांनी व मंगेश कदमच्या यांनी मिळून राज्य नाट्य स्पर्धेसाठी, तर 'चाफा बोलेना' आणि 'प्रीतिसंगम' ही दोन नाटके व्यावसायिक रंगभूमीसाठी दिग्दर्शित केली. व्यावसायिक नाटके अपयशी ठरल्यानंतर संजय सूरकर चित्रपट आणि टीव्ही मालिकांकडे वळले. स्मिता तळवलकर यांच्या 'कळत नकळत' आणि 'सवत माझी लाडकी' या दोन चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. त्यांना चित्रपट दिग्दर्शनाची पहिली संधी स्मिता तळवलकरांनीच दिली.

वैयक्तिक जीवन[संपादन]

संजय सूरकर अविवाहित होते. त्यांच्या मागे तीन भाऊ आहेत.

नाटक[संपादन]

वर्ष (इ.स.) नाटकाचे नाव भाषा सहभाग
तू फक्त हो म्हण मराठी अभिनय
भ्रमाचा भोपळा मराठी अभिनय
वंश मराठी दिग्दर्शन
चाफा बोलेना मराठी दिग्दर्शन
प्रीतिसंगम मराठी दिग्दर्शन

चित्रपट[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपटाचे नाव भाषा सहभाग
कळत नकळत मराठी साहाय्यक दिग्दर्शन
सवत माझी लाडकी मराठी साहाय्यक दिग्दर्शन
इ.स. १९९८ तू तिथं मी मराठी दिग्दर्शन
इ.स. १९९३ आपली माणसं मराठी दिग्दर्शन
इ.स.१९९४ यज्ञ मराठी दिग्दर्शन
इ.स. १९९१ चौकट राजा मराठी दिग्दर्शन
इ.स. १९९६ रावसाहेब मराठी दिग्दर्शन
घराबाहेर मराठी दिग्दर्शन
इ.स. २००४ सातच्या आत घरात मराठी दिग्दर्शन
इ.स. २००६ आईशप्पथ..! मराठी दिग्दर्शन,
पटकथा
इ.स. २००६ आनंदाचे झाड मराठी दिग्दर्शन
रानभूल मराठी दिग्दर्शन
सुखान्त मराठी दिग्दर्शन
इ.स. २००७ सखी मराठी दिग्दर्शन
इ.स. २००७ आव्हान मराठी दिग्दर्शन
इ.स. २००८ एक डाव संसाराचा मराठी दिग्दर्शन
इ.स. २००९ मास्तर एके मास्तर मराठी दिग्दर्शन
इ.स. २०११ स्टँडबाय हिंदी दिग्दर्शन
इ.स. २००८ तांदळा मराठी दिग्दर्शन

दूरचित्रवाहिनी मालिका[संपादन]

वर्ष (इ.स.) मालिकेचे नाव भाषा सहभाग
राऊ मराठी दिग्दर्शन
घरकुल मराठी दिग्दर्शन
इ.स. १९९८ अवंतिका मराठी दिग्दर्शन
इ.स. १९९८ ऊन-पाऊस मराठी दिग्दर्शन
इ.स. १९९८ सुकन्या मराठी दिग्दर्शन
आपकी अंतरा हिंदी दिग्दर्शन
ढूँढ लेगी मंजिल हमें हिंदी दिग्दर्शन

मृत्यू[संपादन]

सूरकरांच्या लाठी या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात चालू असताना २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी, चित्रपटातील दृश्यासंदर्भात अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी चर्चा सुरू असताना सूरकर यांना अस्वस्थ वाटू लागले आणि लगेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.[२]. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचे निधन झाले [३] .

पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र सरकारचा १९९०सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार : चौकट राजा(चित्रपट)
  • महाराष्ट्र सरकारचा १९९५सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार : रावसाहेब(चित्रपट)
  • महाराष्ट्र सरकारचा १९९१सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा द्वितीय पुरस्कार : आपली माणसं(चित्रपट)
  • फिल्मफेर पुरस्कार-१९९८ (उत्कृष्ट दिग्दर्शन) : तू तिथं मी(चित्रपट)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "संजय सूरकर".
  2. ^ "दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ "संजय सूरकर यांचे निधन". २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]