श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पंढरपूरजवळची शैक्षणिक संस्था आहे.

इतिहास[संपादन]

शहरापासून ४ किमी अंतरावर असणाऱ्या एका ओसाड माळरानावर गोपाळपूर या गावी १९९८ मध्ये हे कॉलेज स्थापन करण्यात आले. सुरुवातीस वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ अभियंते एकत्र आले व त्यांनी हे कॉलेज चालू केले, त्यावेळी कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संख्या १६० व ५ शिक्षक होते. आज २०१५ साली कॉलेजात ४००० विद्यार्थी संख्या आणि २५० शिक्षक आहेत. या कॉलेजला वसतीगृह आहे. या वसतीगृहात १००० विद्यार्थिनी व १२०० विद्यार्थी राहतात. [१]या कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे हे कॉलेज विद्ध्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी सोलापूर जिल्ह्यात प्रथम आहे. याचे कारण एकच आहे ते म्हणजे, या कॉलेजमधील विद्ध्यार्थ्यांची गुणवत्ता. २०१२ साली टाटा कंसलटन्सी सर्विसेस या कंपनीने १०९ विद्ध्यार्थ्यांची निवड केली होती. तसेच प्रत्येक वर्षी ही कंपनी या कॉलेजमधून विद्ध्यार्थ्यांची निवड करते. त्याचबरोबर दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते याची धुरा प्राध्यापक एस. एल. उत्पात सांभाळतात. तसेच प्रत्येक वर्षी 'बीट्स' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याची धुरा प्राध्यापक ए. जी. कोरके हे सांभाळतात.

या कॉलेजमध्ये खालील शाखा आहेत.

शाखा[संपादन]

 1. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी
 2. स्थापत्य अभियांत्रिकी
 3. यंत्र अभियांत्रिकी
 4. विद्युत आणि संचारण अभियांत्रिकी

संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी[संपादन]

 • पदवी

या शाखेची विद्यार्थीक्षमता १२० आहे.

 • पदविका
 • पीएचडी

स्थापत्य अभियांत्रिकी[संपादन]

 • पदवी

या शाखेची विद्यार्थीक्षमता ६० आहे.

 • पदविका

यंत्र अभियांत्रिकी[संपादन]

 • पदवी

या शाखेची विद्यार्थीक्षमता १२० आहे.

 • पदविका
 • पीएचडी

विद्युत आणि संचारण अभियांत्रिकी[संपादन]

 • पदवी

या शाखेची विद्यार्थीक्षमता १२० आहे.

 • पदविका

संदर्भ[संपादन]