भारतीय प्रमाणवेळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५ च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.
ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि इंग्लंडमधील रॉयल ऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे.
१५ एप्रिल २००६ पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे.