Jump to content

श्रीराम खंडेराव मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदरणीय प.पु. गुरुमाऊली श्री. श्रीराम खंडेराव मोरे यांचा जन्म (शके १८७७) फाल्गुन कृष्ण एकादशी, श्रवण नक्षत्र, शिव योगावर, चंद्र मकर राशीत रविवार, दि.२० मार्च, १९५५ साली दंडकारण्य (सद्यनाव दिंडोरी) ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील मोरे वंश (घराण्यामध्ये) झाला.

दिंडोरीबद्दल थोडेसे ....

[संपादन]

दिंडोरी पुण्यभूमिला दिंडोरी वन असे नाव होते.त्याचे कारण म्हणजे दिंडोरवन हे दंडकारण्याचे प्रवेशद्वार होते.नंतर दिंडोरवनाचे दिंडोरी हे नाव प्रचलित झाले.हि भूमी त्रिवेणी संगमातून बनली आहे.धारतीर्थ,देवतीर्थ,संततीर्थ यांचा संगम याच भूमीत झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज युक्ती प्रयुक्तीने मावळ्यांच्या मदतीने हिंदू पदपादशाही निर्माण करीत होते.शिवरायांनी सुरतची संपत्ती काबीज केल्यानंतर परतीच्या वेळी नाशिकला येताना दिंडोरी गावाजवळ मोगलांनी त्यांना अडविले. या ठिकाणी आणीबाणीची वेळ आली होती.तेव्हा शिवरायांनी प्रथमच तलवार उपसून समोरासमोर लढाई केली.मोगलांचा पराभव करून त्यांनी मार्ग बदलला.सरळ नाशिकला न जाता आडमार्गाने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला गेले.त्यावेळी शिवरायांनी त्र्यंबकेश्वरला नव रत्नजडीत सोन्याचा मुकुट अर्पण केला.हा मुकुट बहुमोल किंमतीचा असून त्याची नोंद तेथे केली आहे . मोगलांशी झालेल्या लढाईचे रणमैदान दिंडोरीच्या दक्षिण बाजूला जवळच आहे .आज त्या ठिकाणी तळे आहे. रणतळे नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे.


प.पू.गुरुमाऊलींचे कार्य

[संपादन]

प.पु.गुरुमाऊली (श्री. अण्णासाहेब मोरे) यांनी सामान्य जनतेला भावभक्तीचा उदात्तता, उच्च विचारांचे अधिष्ठान, मानवतेचा प्राण दिला आहे. त्यांनी समाजमनाच्या विवेकाची बांधणी करण्याचे कार्य विविध सेवांच्या माध्यमातून अविरत सुरू ठेवले आहे. “अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म" समजावून सांगणाऱ्या प.पु.गुरुमाऊलींनी देवी – देवतांची खरी ओळख सामान्य जनमानसाला समजेल अशा सोप्या भाषेत करून दिली आहे. त्यांनी संतांच्या जनोद्धाराचा मार्ग सोपा, प्रशस्त व निष्कंटक केला आहे.” सद्गुरू प.पु.मोरे दादा व प.पु.गुरुमाऊलींनी भक्तीचा कार्यकारणभाव विशद केला आहे. तसेच सेवा कार्य राष्ट्र कल्याणाशी जोडले आहे. “प्रवचनांपेक्षा लोक जागृती करणारे, ज्ञान देणारे ग्राम अभियानासारखे समाज सुधारक उपक्रम राबविणारे प.पु.गुरुमाऊली आज सर्व संप्रदायाचे मार्गदर्शक व वंदनीय आहेत.” सद्गुरू प.पु.दादासाहेबांचा प.पु.गुरुमाऊलींचा शेती व्यवसाय, कृषी आस्था, कृषी विषयक तळमळ श्री विष्णू रूपाने, विष्णू भावाने चाललेली विश्वसेवा आहे. त्यांनी सुरू केलेला दिंडोरीचा श्री स्वामी समर्थ मार्ग राष्ट्र कल्याणास, राष्ट्रोत्कर्षास अध्यात्माशी एकरूप करणारा मार्ग आजही चालू आहे. कृषी प्रधान भारतातील शेती, शेतकरी उत्तम असतील तरच राष्ट्र संपन्न राहणार आहे. या क्रांतीदर्शी भावनेने सद्गुरू प.पु.मोरे दादांनी व प.पु.गुरुमाऊलींनी शेतीला अध्यात्माशी जोडले आहे.

प.पू.गुरुमाऊलींच्या कुळातील आध्यात्मिक,सामाजिक वारसा

[संपादन]

सद्गुरू प.पु.दादासाहेबांचे वडील म्हणजेच प.पु. गुरुमाऊलीचे आजोबा श्री अप्पाजी मोरे – पाटील हे शेतीनिष्ठ, शूर, धाडसी, मेहनती, बुद्धिमान, सचोटी व प्रामाणिकतेवर निष्ठा असलेले परोपकारी व्यक्ती होते, दिंडोरी गावांत त्यांना सन्मान व आदर होता. गोरगरीब निराधारांचे ते कनवाळू होते.[] ज्या घराण्यात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे प.पु. सद्गुरू मोरे दादा व प.पु. गुरुमाऊलींच्या रूपाने अवतरतात, त्या वंशाची गौरवपूर्वक ओळख श्रीमद् भगवद् गीतेत अशा प्रकारे करून दिली आहे: श्लोक

प्राप्त पुण्यकृतां लोकानुषित्वा शास्वती: समर: II

शुचीना श्रीमतां गेहे योगपुरुषोS भिजायते II अथवा योगिनामेव कुले भवति धीमाताम् II एताद्धी दुर्लभतरं लोके जन्म यादिद्रराम II

अर्थ -
मागच्या जन्मी योगसाधना पूर्णत्वास न गेलेला योगी स्वर्गादि पुण्यवान लोकांत राहून नंतर कार्य पूर्ण करण्यासाठी श्रीमान पुरुषांच्या घरी जन्म घेतो किंवा विरक्त पुण्यवान पुरुष स्वर्गादि लोकांत न जाता ज्ञानी, योगियांच्या कुलात जन्म घेतो. अशा प्रकारचा जन्म होणे, जगात अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ, अशी झाली मठाची स्थापना". महाराष्ट्र टाइम्स. १ मे २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.