Jump to content

श्रीधर कृष्ण शनवारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीधर शनवारे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे (जन्म : साहूर-अमरावती जिल्हा, ५ ऑक्टोबर १९३५; - नागपूर, २७ ऑक्टोबर २०१३]] हे महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातले एक मराठी कवी होते. त्यांचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला होता. घरी भरपूर शेतीवाडा, वाडा वगैरे होता. शनवारेंचे वडील बंधू ना.कृ. शनवारे हे नागपूरचया धरमपेठ काॅलेजात मराठीचे प्राध्यापक तर पत्नी - कवितावहिनी -नागपूरच्याच एस.एफ.एस. (St Francis De Sales) काॅलेजात हिंदीच्या प्राध्यापिका होत्या.

त्यांच्या शिक्षणकाळात त्यांना भारत सरकारची १२००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती.

ते एम.ए., पीएच.डी. होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले. १९९६ साली दर्यापूरला झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

प्रा. अजय कृष्णराव चिकाटे यांनी, श्रीधर शनवारे ह्यांच्या ’थांग-अथांग या काव्यसंग्रहाचा चिकित्सक अभ्यास’ हा लघु-शोधनिंबध लिहून एम.फिल. मिळवली आहे.(२००८)

‘कविवर्य श्रीधर शनवारे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर प्राध्यापिका रोहिणी कळमकर यांना नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली आहे.(१९९८)

प्रा. राष्ट्रपाल इस्तारी मेश्राम यांनी ‘झंझावात आणि थांग-अथांग: तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर लघु-शोधप्रबंध सादर करून एम.फिल. मिळविली आहे.(२००४)

प्रा. नरेंद्र बोडके यांनी श्रीधर शनवारे यांचा काव्यावर ‘गहिवरलेला महाशब्द’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे (२००२).

शनवारे यांच्या कवितांची इंग्रजी, गुजराती, उर्दू व हिंदी या भाषांतून कवितांची भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.

शनवारे यांच्या ’आतून बंद बेट’ या कवितासंग्रहाचा नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. (मराठी)च्या अभ्यासक्रमात समावेश (१९८२, १९८३, १९८४)

त्यांना मिळालेली ५०हजार रुपयांच्या पुरस्काराची रक्कम त्यांनी अरुणा साबणे यांच्या ’माहेर' या संस्थेला दिली होती. त्यांच्या औदार्याचे असे बरेच दाखले आहेत.

वैयक्तिक

[संपादन]

प्रा. डॉ. श्रीधर कृष्ण शनवारे यांच्या पत्नीचे नाव डॉ. कविता. त्यांच्या दोन विवाहित मुलींची नावे रचना व सुजला अशी आहेत.


कवी शनवारे यांची ग्रंथरचना

[संपादन]
  • अतूट (नाटक. शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या ’रामेर सुमोती’ या मूळ बंगाली कथेचे मराठी नाट्यरूपांतर). या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेत नागपूर केंद्राचा पहिला पुरस्कार मिळाला होता.
  • अभिनव मराठी व्याकरण, मराठी लेखन (व्याकरणविषयक ग्रंथ)
  • आतून बंद बेट (काव्यसंग्रह)
  • उन्हउतरणी (काव्यसंग्रह)
  • उस यात्रा की खोज में (श्रीधर शनवारे यांच्या कवितांचा कविता शनवारे यांनी केलेला हिंदी अनुवाद)
  • कथाकार वामनराव चोरघडे (समीक्षाग्रंथ)
  • कोलंबसाची इंडिया (प्रवास वर्णन)
  • जातो माघारा (काव्यसंग्रह)
  • तळे संध्याकाळचे (काव्यसंग्रह)
  • तीन ओळीची कविता (काव्यसंग्रह)
  • थांग अथांग तळे (काव्यसंग्रह)
  • थेंब थेंब..(चिंतन)
  • पायावर चक्र (प्रवास वर्णन)
  • प्रेमचंद : निवडक कथा (अनुवाद)
  • राक्षसाचे वाडे (बाल-कुमार कवितासंग्रह)
  • सरवा (काव्यसंग्रह)

सन्मान

[संपादन]
  • अमेरिकेत न्यू जर्सी येथील प्लेन्स्बरो टाऊनशिप हॉलमध्ये ‘मराठी विश्व’तर्फे आयोजित मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते, २२ जून १९९६
  • आकांक्षा मासिकाने ‘कवी श्रीधर शनवारे विशेषांक’, काढला मे,२००२
  • 'उन्हउतरणी' या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्कार (१९७६)
  • १९७३मध्ये दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रकाशित ‘मराठी काव्यसंग्रहा’त त्यांची एक कविता समाविष्ट झाली होती.
  • ‘कविता: विसाव्या शतकाची’, उत्कृष्ट प्रकाशन, पुणे मध्ये कविता समाविष्ट (२०००)
  • दिल्लीच्या साहित्य अकादमीतर्फे प्रकाशित ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता: १९६१ ते १९८०’ मध्ये कविता समाविष्ट (१९९४)
  • नरेंद्र बोडके यांचा श्रीधर शनवारे यांचा काव्यावरचा समीक्षाग्रंथ- ‘गहिवरलेला महाशब्द’, २००२.
  • पणजीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे आयोजित ’गोवा साहित्य मेळावा’ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेपद.
  • प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल सूर्योदय काव्य पुरस्कार प्राप्त, जळगाव, २००८
  • मार्गदर्शक- गोमंतक मराठी अकादमी तर्फे आयोजित कविता-शिबीर (१९ एप्रिल १९९७)
  • मुंबई येथील साहित्य प्रसार केंद्राने प्रकाशित केलेल्या, ‘मराठीचि बोलू कवतिके’मध्ये कविता समाविष्ट (१९९९)
  • २६ जानेवारी १९७९ला (प्रजासत्ताक दिनानिमित्त) दिल्लीत झालेल्या सर्वभाषा कविसंमेलनात मराठी भाषेचा प्रातिनिधिक कवी म्हणून निमंत्रित आणि सहभाग.
  • श्रीधर शनवारे हे नागपूरमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे १९९४साली आयोजित झालेल्या कविता कार्यशाळेचे संचालक व मार्गदर्शक होते.
  • कवी शनवारे यांची माहिती साप्ताहिक विवेकने हिंदुस्तान प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित केलेल्या ‘साहित्य (आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, खंड २’ या ग्रंथात समाविष्ट केली. (२००९, मुंबई)
  • विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (दर्यापूर १९९६)

पुरस्कार

[संपादन]
  • उन्हउतरणी या कवितासंग्रहाला कविवर्य केशवसुत पुरस्कार
  • कृषी विकास प्रतिष्ठानचा ‘विदर्भ गौरव पुरस्कार’ २०१२.
  • ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’
  • ’तळे संध्याकाळचे’ला विदर्भ साहित्य संघाचे ‘वसंतराव वऱ्हाडपांडे स्मृती पारितोषिक’ आणि नाशिकच्या युगांतर प्रतिष्ठानचा ‘बंधू माधव पुरस्कार’
  • ’तीन ओळींची कविता’ला स्मिता पाटील उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार (शिरपूर -धुळे जिल्हा)
  • ’तीन ओळींची कविता’ला ’बापूसाहेब ठाकरे अकादमी सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार’ (दानापूर -अमरावती जिल्हा)
  • ’थांग अथांग’ला कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे वितरित ’कविवर्य कुसुमाग्रज पारितोषिक’, आणि उ.रा. गिरी पारितोषिक समिती पुरस्कृत ‘कवी उ.रा. गिरी पारितोषिक’
  • प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ (जळगाव, २००८).
  • ’राक्षसांचे वाडे’ या बाल-कुमार कवितासंग्रहाला सेलू येथील अंबेकर ग्रंथालयाचा सुमन बाळासाहेब देशपांडे बालसाहित्य पुरस्कार
  • ’सरवा’ या कवितासंग्रहाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा सन २०११मधील विशेष लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार
  • ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला आहे (२०१३).