श्रीधर विष्णु परांजपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीधर विष्णू परांजपे ऊर्फ रामदासानुदास हे वर्ध्याचे राहणारे एक मराठी आणि हिंदी लेखक होते. त्यांनी रामदासांचा दासबोध आणि लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य अनुवाद करून हिंदीत आणले. याशिवाय त्यांनी मोरोपंतांच्या १५ स्फुट काव्यांचे संपादन करून ती पुस्तक रूपात प्रकाशित केली.

श्रीधर विष्णू परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • गीतारहस्य (हिंदी; अनुवादित; मूळ मराठी लेखक - लोकमान्य टिळक)
  • दासबोध (हिंदी; अनुवादित; मूळ मराठी लेखक - रामदास)
  • मोरोपंतांची केकावली : मूळ प्रस्तावना, विवरण, टीपा, संदर्भ, गुरूशरणागतिटीका यांसह.(संपादित २ भाग)