Jump to content

श्रीगौरी सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Gauri Sawant (es); গৌরী সাওয়ান্ত (bn); Gauri Sawant (nl); Gauri Sawant (ast); Gauri Sawant (hi); Gauri Sawant (en); ਗੌਰੀ ਸਾਵੰਤ (pa); গৌৰী সাৱন্ত (as); Gauri Sawant (sq); श्रीगौरी सावंत (mr); சிறிகௌரி சாவந்த் (ta) Indian transgender activist (en); तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या (mr); ভাৰতীয় ট্ৰান্সজেণ্ডাৰ অধিকাৰকৰ্মী (as)
श्रीगौरी सावंत 
तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै २, इ.स. १९७९
पुणे, पुणे
नागरिकत्व
व्यवसाय
  • एलजीबीटी हक्क कार्यकर्ता
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

श्रीगौरी सावंत किंवा गौरी सावंत (२ जुलै, १९७९ - हयात)[][] या मुंबई येथे राहणाऱ्या भारतीय ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत.[] सावंत या 'सखी चार चौघी' च्या संचालिका आहेत. ही संस्था ट्रा्सजेंडर लोकांना आणि एचआयव्ही/एड्स ग्रस्त लोकांना मदत करते.[] सावंत यांनी विक्सच्या जाहिरातीत देखील काम केले आहे.[][][] त्यांना म२०१९ साली हाराष्ट्रातील निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते.[]

प्रारंभिक जीवन

[संपादन]

सावंत यांचा जन्म पुण्यात गणेश म्हणून झाला. त्या सात वर्षांची असताना त्यांच्याआई चा मृत्यू झाला, ज्यामुळे त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने (आईच्या आईने) केले. तिचे वडील पोलीस अधिकारी असून, तृतीयपंथी असल्याने १४ - १५व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या अवहेलनेमुळे आपले घर सोडले.[][१०]

चळवळ आणि कार्य

[संपादन]

सावंत यांनी २००० साली 'सखी चार चौघी ट्रस्ट'ची स्थापना केली. ही सामाजिक संस्था सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देते आणि ट्रान्सजेंडर लोकांना समुपदेशन देखील प्रदान करते.[१०] २०१४ मध्ये, गौरी ह्या, ट्रान्सजेंडर लोकांच्या दत्तक हक्कांसाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारी पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती बनली.[११] सावंत ह्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) खटल्यात याचिकाकर्ता होती (राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण वि. युनियन ऑफ इंडिया) ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीय लिंग म्हणून लिंगबदलाला मान्यता दिली होती.[] गायत्रीच्या आईचा एड्समुळे मृत्यू झाल्यानंतर सावंत यांनी २००८ मध्ये गायत्री नावाच्या मुलीला दत्तक घेतले.[११][१२][१०][१३]

वैयक्तिक जीवन आणि कुटुंब

[संपादन]

सावंत यांना गायत्री नावाची एक दत्तक मुलगी आहे. सावंत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, गायात्रीची जन्मदात्री आई, एड्समुळे मरण पावलेली सेक्स वर्कर होती. अवघ्या चार वर्षाच्या गायत्रीला लैंगिक तस्करी उद्योगात विकण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून सावंत यांनी तिला दत्तक घेतले होते.[११][१२]

लोकप्रिय संस्कृतीत

[संपादन]
  • २०१७ मध्ये, विक्स कंपनीच्या "टच ऑफ केअर" मोहिमेचा भाग म्हणून सावंत यांना एका जाहिरातीत दाखवण्यात आले. त्यात सावंत आणि त्यांच्या दत्तक मुलीची कथा दाखवण्यात आली होती.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "कौन हैं गौरी सावंत जो मुंबई की सड़क से कौन बनेगा करोड़पति तक पहुंची". newsdanka.com. २२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "हिजड़ों को पैदा कौन करता है? भाई ने मांगी फांसी, रील से कहीं अधिक दर्दनाक है गौरी सावंत की रियल लाइफ स्‍टोरी". दैनिक जागरण. २२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ a b "Gauri Sawant- How I became a Mother - Mumbai Mirror -". Mumbai Mirror. 2018-04-21 रोजी पाहिले.
  4. ^ "Here Is The Real Life Story Of Transgender Activist Gauri Sawant Of Groundbreaking Vicks Ad". The Indian Feed. 2017-04-01. 2018-04-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-04-21 रोजी पाहिले.
  5. ^ a b "How Activism, Adoption and an Ad Changed a Trans Woman's Life - The Wire". The Wire. 2018-04-21 रोजी पाहिले.
  6. ^ "The story of Gauri Sawant - A transgender mother". www.timesnownews.com.
  7. ^ "If something happens to me, I don't want her to return to the streets: Gauri Sawant". 9 April 2017.
  8. ^ "Maharashtra Transgender Activist Becomes Poll Panel's Goodwill Ambassador". NDTV.com. 2019-03-20. 2019-03-21 रोजी पाहिले.
  9. ^ "वडील पोलिस अधिकारी, मुलगा झाला म्हणून खूष होते, पण नंतर..सोपा नव्हता गणेश ते गौरीचा प्रवास". महाराष्ट्र टाइम्स. २२ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ a b c "Against All Odds: Activist Gauri Sawant Has Been Fighting For Transgender Rights All Her Life". The Logical Indian. 2017-05-30. 2018-04-21 रोजी पाहिले.
  11. ^ a b c "How two mothers came to embrace and accept LGBTQI". The Indian Express. 2017-05-14. 2018-04-21 रोजी पाहिले.
  12. ^ a b "The mother who has won India's heart". Rediff. 2018-04-21 रोजी पाहिले.
  13. ^ "Social activist Gauri Sawant to build a foster home for sex workers' children". Mumbai Live. 2018-04-21 रोजी पाहिले.
  14. ^ "Who is Shreegauri Sawant, the transgender activist portrayed by Sushmita Sen in Taali?". cnbctv18.com. 2022-10-06. 2022-10-07 रोजी पाहिले.