श्याम माळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संपूर्ण नाव : श्याम राघोजी माळी

जन्मतारीख : २८ एप्रिल १९८०

शिक्षण : एम.ए.बी.एड.

श्याम माळी हे आगरी समाजातील कवी, गीतकार आहेत. प्रमाणभाषेपेक्षा त्यांच्या आगरी बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात झाला. व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असलेले श्याम माळी बदलापूर,ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक वर्तमानपत्र, मासिक, दिवाळी अंक यामध्ये काव्यलेखन केले आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

१) थाांबला तो संपला – कवितासंग्रह (प्रथम आवृत्ती ऑक्टोबर २०१४) (द्वितीय आवृत्ती एप्रिल २०१६)

२) खाऊची शाळा – बालकवितासंग्रह (एप्रिल २०१६)

३) आमचा आगरी दादूस – आगरी कवितासंग्रह (मार्च २०१९)

४) आगरवाट -आगरी कवितासंग्रह (२६ जानेवारी २०२३)

साहित्यिक कार्य[संपादन]

         अनेक वर्तमानपत्र, मासिक, दिवाळी अंक यामध्ये काव्यलेखन.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अंबरनाथ तालुका अध्यक्ष (सन २०१६ ते २०२०)

कविसंमेलने, कवितालेखन कार्यशाळा, काव्यलेखन स्पर्धा, साहित्य मेळावा इत्यादीचे आयोजन.

पुरस्कार व सन्मानचिन्ह :[संपादन]

• साप्ताहिक उल्हास प्रभात आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा २०१४ (तृतीय क्रमांक)

• अंतदृष्टी प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी आयोजित जागतिक अपंग दिनानिमित्त काव्यस्पर्धेचे परीक्षण (सन्मानचिन्ह)

• शिंपल्याबाहेरील मोती प्रातिनिधिक कवितासंग्रह २०१५ - शिवानी पब्लिकेशन मुंबई (प्रथम क्रमांक)

• व्यास क्रिएशन्स आयोजित राज्यस्तरीय बालसाहित्य लेखन स्पर्धा  प्रमाणपत्र, मे २०१५

• मराठी वाड्.मय परिषद, बडोदे. अखिल भारतीय मराठी साहित्य स्पर्धा  प्रमाणपत्र, एप्रिल २०१५

• कायद्याने वागा लोकचळवळ आणि स्मार्ट फाउंडेशन आयोजित झिम्माड काव्यस्पर्धा प्रमाणपत्र

• प्रीतगंध फाउंडेशन मुंबई आयोजित राज्यस्तरीय कवीसंमेलन  प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

• साहित्य जागर मंच मुंबई आयोजित काव्यवाचन स्पर्धा - द्वितीय क्रमांक

• वि इक्वल फाउंडेशन मुंबई आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा  प्रमाणपत्र

• साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर पुणे आयोजित राज्यस्तरीय कवितालेखन स्पर्धा सहभाग  आणि प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह 

• एक छत्र स्वामी समर्थ सेवा संस्था, मुंबई आयोजित विविध पुस्तक स्पर्धेत काव्य या प्रकारात ‘थांबला तो संपला’ या कवितासंग्रहाला प्रथम पुरस्कार. (डिसेंबर २०१५)

• को.म.सा.प. शाखा कर्जत रायगड जिल्हास्तरीय कविसंमेलन - एप्रिल २०१६

राज्यस्तरीय चिमाजी आप्पा साहित्य संमेलन वसई सहभाग (ऑक्टोबर २०१६)

राष्ट्रीय कविसंमेलन काव्यहोत्र गोवा येथे काव्यवाचन सहभाग. (जुलै २०१६)

राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या आगरी काव्य मैफिल मध्ये काव्यवाचन. (जुलै २०१६)

पहिले तरंगते आगरी कवीसंमेलन रेतीबंदर मुंब्रा ठाणे येथे सहभाग. (ऑक्टोबर २०१६)

अखिल भारतीय नक्षत्रांचे देणे महाकाव्यसंमेलन २०१६ मध्ये काव्यवाचन सहभाग. (नोव्हें.२०१६)  

• शिवानी साहित्यिक मंच - काव्यजल्लोष ( एप्रिल २०१७ )

• अ.भा.म.सा.प. आणि तेजस्विनी संस्था पुणे आयोजित पर्यावरण साहित्य संमेलन सप्टेंबर २०१७   

९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डोंबिवली येथे बोलीभाषा काव्यकट्ट्यावर कविता सादरीकरण

• राज्यस्तरीय पाहिले शिक्षक साहित्य संमेलन- पिंपरी चिंचवड ( जून २०१८ )

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदा येथे आगरी बोलीतील कविता सादरीकरण

• साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर पुणे - राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार २०१८

९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डोंबिवली येथे झालेल्या ऐतिहासिक बोलीभाषा कट्टा यावर नियोजन आणि निवड समितीवर काम.  

आगरी युथ फोरम आयोजित ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर नामांकन

मोरहेल्प फाउंडेशन, खार मुंबई आयोजित आगरी कोळी महोत्सवात समाज गौरव पुरस्कार ( जानेवारी २०१९ )

आगरी युथ फोरम आयोजित १९ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव २०२३ मध्ये "स्व. नकुल पाटील स्मृती - आगरी साहित्य पुरस्कार"

शैक्षणिक[संपादन]

     १) जीवन शिक्षण मासिक मध्ये 'शिक्षणाची वारी' आणि 'गाणे मुळाक्षरांचे' या कविता प्रकाशित

     २) जीवन शिक्षण या मासिकात मे २०१९ मध्ये ‘बोलीभाषेची जोड आणि अभ्यास झाला गोड’ हा लेख प्रसिद्ध

     ३) तालुकास्तरीय, केंद्रस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये सहभाग आणि प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त.

     ४) स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघटनेच्या अंबरनाथ तालुका सरचिटणीस पदी काम.

     ५) प्रीतगंध फाउंडेशन मुंबई यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (सन २०१६)

     ६) महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघ यांच्याकडून सन २०१८-१९चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  


आगरी महोत्सव सहभाग[संपादन]

  आपला आगरी महोत्सव बाळकुम,ठाणे

  आगरी क्रांती सामाजिक प्रतिष्ठान,शहापूर आगरी महोत्सव

  उत्साही मित्र मंडळ,करावे आगरी महोत्सव

  चुनाभट्टी आगरी महोत्सव

  बदलापूर आगरी महोत्सव

  आगरी कोळी खाद्य महोत्सव,खारदांडा मुंबई

  आगरी युथ फोरम, आगरी महोत्सव डोंबिवली  

छायाचित्र[संपादन]