शैलबाला घोषजाया
Appearance
शैलबाला घोषजाया | |
---|---|
जन्म |
२ मार्च १८९४ कॉक्स बाझार(बांगलादेश ) |
या बंगाली लेखिका होत्या. यांचा बांगलादेश मधील कॉक्स बाझार येथे जन्म झाला. कथा व कादंबऱ्यांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांची पहिली कादंबरी शेख आन्दु (१९१५). या कादंबरीच्या आशयाबाबत लेखिकेचे धैर्य व निर्भीडपणा विशेषत्वाने दिसून येतो. मुसलमान नायकाशी हिंदू नायिकेचा झालेला प्रेमविवाह हा या कादंबरीचा विषय. यानंतर शैलबालांनी सु. बावीस कादंबऱ्या, सात-आठ कथासंग्रह आणि एक नाटक लिहिले. वमिता,मिष्टि सरबत (१९२०), जन्म अपराधी (१९२०), मंगलमठ (१९२१), अवाक (१९२४), अभिज्ञप्त साधना (१९२७), बिपत्ति (१९३१), अनंतेर पथे (१९५७) इ. त्यांच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या आहेत. शैलबालांच्या कादंबऱ्यांतून मुसलमान कुटुंबाचे उत्कृष्ट चित्रण आढळते.