Jump to content

शैलजा रानडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डाॅ. शैलजा मधुकर रानडे(२४ जानेवारी १९५१ - १३ जानेवारी, २०२२) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे यवतमाळला वास्तव्य होते.तेथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या संस्कृतच्या अधिव्याख्यात्या होत्या. त्यांची काही पुस्तके संस्कृत साहित्यावर व व्याकरणावर आहेत.

शैक्षणिक कारकीर्द

[संपादन]

एम.ए. (संस्कृत, राज्यशास्त्र), पीएच.डी. बी.एड. शैलजा रानडे या एम.ए. संस्कृतच्या परीक्षेत अमरावती विद्यापीठतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या त्या यवतमाळ शहरातील संस्कृतच्या पहिल्या पीएच.डी आहेत.

शैलजा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अभिज्ञान शाकुंतलम् पंचम अंक - एक रसग्रहण
  • उपनिषदे सांगती कथा (बालसाहित्य)
  • कथा दानवीरांच्या (बालसाहित्य)
  • कालिदास कथा
  • प्रार्थना
  • भगवान परशुराम
  • मधुसञ्चयः
  • महाराष्ट्रातील प्रासंगिक कथा
  • महाकवी भास विरचितम् स्वप्नवासवदत्तम् (भाषांतर व टीपांसह)
  • रुद्राध्यायाचे अंतरंग
  • संस्कृत निबंध ज्योत्स्ना
  • संस्कृत व्याकरण-सुरभि
  • संस्कृत साहित्यातील तीन नायिका
  • सुभाषित रसस्वाद
  • स्वर-माला (पुष्पमाला व स्वरसंधी-संस्कृत व्याकरणाचा भाग)
  • ॐ हर्षचरितसारः (बाणभट्ट विरचित हर्षचरितसार)

संदर्भ

[संपादन]
  1. विदुषी डॉ. शैलजा रानडे यांचे निधन Archived 2022-01-13 at the Wayback Machine.