शेंगा चटणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शेंगा चटणी हे सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. शेंगदाणे, लाल मिरचीचे तिखट आणि मीठ यांचा एकत्रित वापर करून शेंगा चटणी तयार केली जाते. विशेष म्हणजे ही चटणी उखळात कुटून तयार केली जाते, त्यामुळे या चटणीची चव न्यारी असते. सोलापूर येथे नसलेची तसेच कोंडीची शेंगा चटणी खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर येथे आलेली व्यक्ती शेंगा चटणीची चव घेतल्याशिवाय आणि शेंगा चटणी विकत घेतल्याशिवाय जात नाही.शेंगा चटणी आणि कडक भाकरी सोबत असल्यास एक आठवडा प्रवासाला गेलो आणि खाण्यासाठी इतर काही मिळाले नाही तरी, शेंगा चटणी आणि कडक भाकरी आपली गरज भागवू शकते. सोलापूरची शेंगा चटणी महाराष्ट्रात ,देशभर आणि परदेशात विकली जाते. सोलापुरी चटणीस संपूर्ण महाराष्ट्रात मोठी मागणी आहे.