शुभदा कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शुभदा कुलकर्णी
जन्म महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रभाव शशिकला शिरगोपीकर, पं. विजय सरदेशमुख

शुभदा कुलकर्णी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

बालपण[संपादन]

शुभदा कुलकर्णी यांचे शाळेपासूनचे संगीताचे शिक्षण पुणे शहरातील गोपाल गायन समाजात सुरू झाले. सुरुवातीला गोविंदराव देसाई यांच्याकडे, आणि नंतर इ.स. १९८९ ते ९५ पर्यंत शशिकला शिरगोपीकर यांच्याकडे त्या संगीत शिकल्या. मात्र, ख्याल गायकीच्या संगीताचे समग्र शिक्षण कुमार गंधर्वांचे शिष्य, विजय सरदेशमुख यांच्याकडे झाले. प्राणिशास्त्रातली आणि कायद्यामधली पदवी घेतल्यानंतर एच.डी.एफ.सी. या गृहकर्ज देणाऱ्या कंपनीमध्ये जबाबदारीच्या पदावर शुभदा नोकरीला लागल्या. इ.स. १९९९ नंतर संशोधनासाठी आवश्यक म्हणून त्यांनी जेव्हा संगीतात एम.ए. केले, तेव्हा त्यांना सुवर्णपदक मिळाले.

कारकीर्द[संपादन]

गायनाबरोबर लेखनाची आवड असलेल्या शुभदा कुलकर्णी यांनी ‘संगीताचा मानसिक आरोग्यावर परिणाम’ यावर संशोधन चालू केले. अशा प्रकारच्या खास प्रयोग करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन निरीक्षण-अभ्यास आणि त्यामागचे विचार जाणून डोकेदुखी, रक्तदाब, नैराश्य अशा आजारांवर काही प्रमाणात, पण नियमित उपचार करून त्याच्या नोंदी घेतल्या.

पीएच्‌.डी.साठी शुभदा कुलकर्णी यांनी गायिकांनी शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताला काय दिले हा विषय घेतला होता. त्या संदर्भात त्यांनी गोवा, नागपूर, कोलकता, दिल्ली, इंदूर, भोपाळ या ठिकाणी भटकंती केली. वाचनालये आणि ध्वनिमुद्रणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही अशा भटकंतीचा उपयोग झाला.

‘स्वररंग’ या नियतकालिकात शुभदा कुलकर्णी यांनी लेखन केले आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • महाराष्ट्राची संगीत परंपरा (इ.स. २०१०)
  • संगीत (इ.स. २०११)
  • गायिका अन् गायकी : ठुमरी व ख्याल (इ.स. २०११)

पुरस्कार व गौरव[संपादन]

  • गानहिरा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.