शुकदास महाराज
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
स्वामी शुकदास महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या गावाला विवेकानंदनगर म्हणून विकसित करणारे एक ब्रह्मचारी कर्मयोगी होते.[ संदर्भ हवा ] महाराजांनी १९६५ मध्ये विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. व तेव्हापासून विनामूल्य आरोग्यसेवा ग्रामीण भागात सुरू केली महाराज स्वतः रोगनिदान कार्यात व अचूक अलोपथिक medicineचा उपचार करण्यात निष्णात होते व कोट्यवधी रुग्णांना व्याधीमुक्त केले..[ संदर्भ हवा ]
त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचा वारसा घेऊन आपल्या विचारांना कृतीची जोड देऊन एका हिवरा आश्रम येथे एका शिक्षणनगरीची निर्मिती केली. आजरोजी विज्ञान महाविद्यालय, कृषी व कृषी व्यवस्थापन महाविद्यालय, आदिवासीं आश्रम शाळा , वृद्धाश्रम ई कार्यरत आहेत. तसेच आरोग्य सेवा सुद्धा सुरू आहे.अंधश्रद्धा निर्मूलन, गोसेवा, व विज्ञाननिष्ठ कार्यक्रम यावर विशेष भर आहे.[ संदर्भ हवा ]
येथील संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक काढून विविध प्रकल्प पूर्ण केले. त्याबरोबरच स्वामी विवेकानंद पुरस्कृत विज्ञाननिष्ठ धार्मिक सामाजिक वारसा जपण्याचा व तो पुढील पिढीला सोपवण्याचा एक वसा स्वामी शुकदासांनी घेतला. आपल्या कृतीने त्यांनी तो पूर्णत्वासही नेला. हजारो विद्यार्थी हा वसा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव उज्ज्वल करताना दिसत आहेत. हा स्वामीजींच्या एकूण कार्याचाच परिपाक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराजांनी रचना केलेला "अनुभूती" हा ग्रंथ त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रबोधनपर साहित्यिक ठेवा आहे .स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त हिवरा आश्रम या गावाला महाप्रसाद यात्रेनिमित्त जनसागर उसळलेला असतो.[ संदर्भ हवा ]