शिव निवास पॅलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

शिव निवास पॅलेस हे भारताचे राजस्थान राज्यातील पिचोळ तलावाचे काठावर महाराणा उदयपुर यांचे पूर्व काळातील निवासस्थान आहे.

आथितिग्रह[संपादन]

उदयपुर शहराचे पॅलेस कॉम्प्लेक्स चे दक्षिण बाजूला हे आहे. याचे बांधकामाची सुरुवात सन 1874 ते 1884 मध्ये महाराणा सज्जन शंभू शिंग यांनी केली आणि 20व्या शतकात त्यांचे वारस महाराणा फतेह शिंग यांनी उत्तम प्रतीचे आथिति ग्रह पूर्ण केले.

या काळात येथे अनेक उच्चतम प्रतीची स्नेह सम्मेलणे झाली. अनेक देश्यांचे VIP नी या आथिति ग्रहाला भेट दिली त्यात यूनायटेड किंगडम चे जॉर्ज 5 TH, आणि प्रिन्स ऑफ वेल्स चे एडवर्ड यांनी 1905 साली, भेट दिली.

सन 1955 मध्ये या घराण्याचे वारस भागवत सिंग मेवाड चे गाडीवर विराजमान झाले. या राजघराण्याचे या विविध वास्तु आणि व्यवस्थापन सांभाळणे खर्चाचे दृस्टीने अतिशय कठीण बनले विशेषतः सिटी पॅलेस ! भागवत सिंग या वारसाने लेक पॅलेस चे उत्पन्न मिळविण्याचे उद्देशयाने हॉटेल मध्ये रूपांतर केले.त्याच बरोबर शिव निवास आणि लहान फतेह प्रकाश पॅलेस चे आरामदाई हेरिटेज हॉटेल मध्ये रूपांतर केले. शिव निवास रूपांतराचा 4 वर्षाचा काळ गेल्यानंतर सन 1982 मध्ये हॉटेल सुरू झाले. [१]

हॉटेल[संपादन]

या राजवाड्याचे 3 मजल्यांची अर्धवर्तुळाकारात योजना आखली आणि समोरील मधल्या जागेत संगमरवरी कुंड बनविला.अथीतींच्या मनोरंजनासाठी हॉटेलची बाल्कनी आणि गछी उघडली त्यामुळे त्यांना हॉटेलचे वेगवेगळ्या खोल्यातून दक्षिणेकडील पिलोचा तलाव आणि तेथील बगीचा तसेच पश्चिमेकडील जग मंदीर द्वीप रिसॉर्ट आणि लेक पॅलेस यांचा रमणीय देखावा मनात साठवता येवू लागला. ही इमारत ऐत्याहासिक राजपूत वास्तुशिल्प धाटणीची आहे. हॉटेलचे खोल्यातील आतील देखावे स्वप्नवत आहेत. त्याची विशेषतः म्हणजे त्यात हस्तिदंत, मोतीसद्रष्य जडावकाम, काचेवरील सुशोभित नक्षीकाम आणि ओल्या गिलाव्यातील पेंटिग यांचा समावेश आहे. यातील बहुतांशी करामत खाजा उस्ताध आणि कुंदन लाल यांची आहे. खास करून महाराणा यांनी या दोघांना काचेवरील नक्षीकाम आणि ओल्या गिलाव्यातील पेंटिंग शिकण्यासाठी लंडनला पाठविले होते.

पहीला हा बांधलेला राजवाडा म्हणजे तेथे तळमजल्यावर 9 सूट (खोल्या) होत्या. त्याचे हॉटेल मध्ये रूपांतर केले आणि इमारत विकशीत केली त्यात आणखी खोल्यांची भर पडली. सध्या त्यात 36 अथीती निवास आहेत [२]. त्याचा तापसील म्हणजे 19 डिलक्स रूम्स, 8 टेरेस सुट्स, 6 रोयल सुट्स,3 इम्पिरियल सुट्स असा समावेश आहे. या सर्व रूम्स मध्ये सेफ, दूरध्वनि, दैनिक, रेफ्रीजरेटर,ई.सोई आहेत.

जरी शिव निवास राजवाड्याचे हॉटेल मध्ये रूपांतर झाले असले तरी येथील यजमानांचे कडून या ठिकाणी क्वीन एलिझाबेथ II, नेपाळचे राजे, इराणचे शाह, जॅकलिन केनेडी यांचा पाहुणचार परंपार पद्दतीने झालेला आहे.

सध्याचे महाराणा की जे HRH ग्रुप ऑफ हॉटेलचे मालक आहेत तेच या ग्रुप मार्फत हे हॉटेल चालवितात. अक्टोपसी या जेम्स बॉन्ड यांच्या मुव्हीशी या शिव निवास राजवाड्याचे स्वरूप होते.[३]

ठिकाण[संपादन]

हे हॉटेलची इमारत सिटी पॅलेस कॉम्प्लेक्स मध्ये उंच आहे .याचे पासून पाचोळा तलाव 600 मीटर, फतेह सागर तलाव 4 की.मी.जग मंदिर 1की.मी. मान्सून पॅलेस 8 की.मी. जगदीश मंदीर 600मी. सहिलीयोंकी बारी 4 की.मी., सिटी पॅलेस श्यासकीय संग्रहालय 100मी. आणि गुलाब बाग व प्राणिसंग्रहालय 1की.मी. आहे.

तसेच खालील प्रवाशी वाहतूक ठिकाणे साधारण निर्देशित अंतरावर आहेत.

महाराणा प्रताप विमानतळ 28की.मी.

राना प्रताप नगर रेल्वे स्टेशन 7 की.मी.

सिटी रेल्वे स्टेशन 2 की.मी.

राज्य परिवहन बस स्थानक 3 की.मी.

सुविधा[संपादन]

या हॉटेलची विशेषतः म्हणजे येथे चकित करणार्‍या भरपूर सुविधा आहेत. येथील सेवेत उपहारग्रह, फिटनेस केंद्र,मनोरंजन सुविधा, सभाग्रह आहे. पणत्या हे निवडक विविध सजावटीने शुशोभीत केलेले आणि मूळ पेंटिंग तसेच ठेवलेले उपहारग्रह, सोनेरी जाळिकाम, पुरातन झुंबर, यांच्या सहावासात राष्ट्रीय, मुघलाई,राजधानी आहाराची मेजवानी देतात. अतिथि कॅडल लाइट मध्ये पाण्याच्या कुंडाचे कांठावर मंद शीतल वार्‍याच्या झूळुकेत, सुमधुर हळुवार गायलेल्या, कानांना रुजविणार्‍या वाध्य संगीताच्या व गोड गाण्याच्या लईत बसून डिनर स्वाद घेता येतो.

फणेरा बार अस्सल भव्य जाळीचे तावदानाने व आरश्याने सजविलेले सुशोभित आहेच पण तेथील सेवेत अत्युत्तम अल्पोपअहार आणि अस्सल पेयांचाही समावेश आहे.फालकी खाना हा यूरोपियन प्रकार आहे यात मुक्तपणे अगदी आरामशीर स्वछंदी पनाने स्वादीष्ट चमचमीत आहार मिळतो.मनोरंजनासाठी स्पा,स्टीम ,पोहण्याचा तलाव,स्काश,यांची मुद्दाम सुविधा दिलेली आहे. येथील सभाग्रह अतिशय आकर्षक आहे. विश्रांतीसाठी येथे आलेले कंपनी मालक तसेच इतर उच्चत्तम घटना परिसंवादात ठेऊन मनातील शैल्य सुखर करणे आणि उपजत ज्ञानाचे आदान प्रदान करणे या ठिकाणी होतात.

मुलांचा पोहोण्याचा तलाव,बुटी सलून, पोहण्याचा तलाव, 24 तास स्वागत कक्ष, मोफत वाहन तळ, हमाल, पाळणा घर, धोबी, रूम सेवा, करन्सी बदलणे, ड्राय क्लिनिंग, 24 तास रक्षक ह्या अधिकतम सुविधा आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "शिव निवास पॅलेस ,उदयपुर हिस्टरी" (इंग्लिश भाषेत). १४-०१-१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "शिव निवास पॅलेस रूम्स" (इंग्लिश भाषेत). १४-०१-१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "शिव निवास पॅलेस ,उदयपुर" (इंग्लिश भाषेत). १४-०१-१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)