Jump to content

शिवाजी महाराजांचा जीवनक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-

  • शोध - सव॔प्रथम भारतीय नौदलाचा शोध.
  • १९ फेब्रुवारी १६३० - शिवाजी महाराज यांचा जन्म.
  • १९ मार्च १६३७ - जिजाऊंनी शिवाजींना पुणे येथे आणले.
  • १६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह.
  • २७ एप्रिल १६४५ - किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ.
  • २८ जानेवारी १६४५ - स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या गुजर पाटलाला कडक शासन.
  • ७ मार्च १६४७ - कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण उभारले.
  • इ.स. १६४७ - कोंढाण्यावर विजय.मुरुंबदेवाचा डोंगर जिंकुन त्याचे नाव राजगड ठेवले.
  • इ.स. १६४८ - पुरंदर किल्ला जिंकला.
  • इ.स. १६४९ - जिंजी येथून शहाजी रावांची व कान्होजी जेधेंची सुटका
  • इ.स. १६५६ - त्यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागुन निधन.
  • ३० एप्रिल १६५७ - जुन्नर या ठाण्यावर छापा.पुष्कळ मालमत्ता हस्तगत.
  • १४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.
  • २४ ऑक्टोबर १६५७ - दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी. अपार द्रव्यसाठा सापडला.पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती.
  • ५ मार्च १६५९ - ३०० होनात पोर्तुगालची तलवार विकत घेतली.
  • ५ सप्टेंबर १६५९ - पत्नी सईबाईंचे निधन
  • १० नोव्हेंबर १६५९ - अफजलखान वध.
  • २ मार्च १६६० - सिद्धीचा पन्हाळगडास वेढा
  • ५ एपिल १६६३ - पुण्याच्या लालमहालावर छापा.
  • २३ जानेवारी १६६४ - शहाजी महाराजांचे कर्नाटकात होदीगरे येथे निधन.
  • १४ एप्रिल १६६५ - पुरंदरची लढाई
  • १३ जून १६६५ - पुरंदरचा तह
  • ४ फेब्रुवारी १६७० - गड आला पण सिंह गेला
  • ६ मार्च १६७३ - कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा फत्ते केला.
  • २४ फेब्रुवारी १६७० -सोयराबाईच्या पोटी राजाराम यांचा जन्म
  • ६ जून १६७४ - शिवरायांचा राज्याभिषेक
  • १७ जून १६७४ - जिजाऊंचे निधन वयाचे ७७व्या वर्षी
  • २४ सप्टेंबर १६७४ - शाक्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक
  • ३ एप्रिल १६८० - शिवरायांचे निधन