शिवराम जानबा कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिवराम जानबा कांबळे (इ.स. १८७५:पुणे, महाराष्ट्र - ??) हे अस्पृश्यता निवारणाचे आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक होते.[१]

व्यक्तिगत जीवन[संपादन]

शिवराम कांबळे यांचे वडील जानबा कांबळे पुण्यातील भांबुर्डे गावचे वतनदार महार होते. जानबा कांबळेंनी आपला गावकीचा व्यवसाय सोडून पुण्यात युरोपियन लोकांकडे नोकरी धरली. त्यांनी त्यांचा मुलगा शिवराम यास त्याच्या इच्छेप्रमाणे शिकू दिले. शिवराम यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतले.[१]

कारकीर्द[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चळवळीतील सहभाग[संपादन]

शिवराम कांबळे यांनी सासवड येथे इ.स. १९०३ मध्ये महार समाजाच्या ५१ गावांतील लोकांची सभा बोलावली. या सभेत समाजातील लोकांना शिक्षण मिळावे आणि महार बटालियनचे पुनर्गठन[ दुजोरा हवा] करून लष्करात तसेच पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात यांसाठी सरकारदरबारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. शिवराम कांबळे यांनी इ.स.१९०८-१९१० या काळात सोमवंशीय मित्र [२]) नावाचे मासिक चालवले.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. a b c http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4702230009673326454 शिवराम जानबा कांबळे - पुणे पर्वती सत्याग्रहाचा संक्षिप्त इतिहास: लेखक : हरिश्चंद्र नारायण नवलकर], सुगावा प्रकाशन, एकूण पाने १९४ ISBN10: 8184182274 ग्रंथ दुवा बुकगंगा डॉट कॉम संस्थळावर दिनांक ९ नोव्हेंबर २०१५ रोजी जसा मिळवला.
  2. ^ डॉ. आंबेडकर पूर्व समाजसुधारक : शिवराम जानबा कांबळे; लेखक प्रा. सी. एच. निकुंभे पायल पब्लिकेशन एकूण पृष्ठे ४८