शिवधर्मगाथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवधर्मगाथा[संपादन]

शिवधर्मगाथा


जिजाऊ शिवाचा। आहे जो बछडा।। तोचि रे फाकडा। शिवधर्मी।।१।। शिवधर्म मूळ। शिवबाचे कूळ।। जिजाऊ राऊळ। सिंदखेड।।२।। जात पात नाही। देवपूजा सोडा।। भटाचीना पिडा। औषधाला।।३।। सिंदखेड राजा। शिवधर्म पीठ।। चालू केली वाट। गौतमाची।।४।। आपुला तो आहे। खरा शिवधर्म।। पूर्वजांचे वर्म। कळो येई।।५।।

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरर साहेबांनी जगातील सतरावा धर्म राजामाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी २००५ मध्ये स्थापन केला. सुमारे १४ लाख मराठा बहुजनांनी तेथे शिवधर्मात प्रवेश केला. ज्या धमार्माची प्रेरणा जिजाऊ आहेत. देव, जात, भट या धर्मात चालत नाही. याची संहिता जगप्रसिद्ध विचारवंत डा आ.ह.साळुंखे यांनी लिहिली असून, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे शेकडो लोक असून प्रबोधन व बळीराजा, गौतमबुद्ध, शिवाजी महाराज व फुले शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी सत्यशोधक विचारावर हा धर्म आहे. या परिवतर्न चळवळीचा इतिहास सागंणारी शिवधर्मगाथा दशरथ यादव यांनी लिहीली असून पाच हजार अभंग रचना होणार आहे. शिवश्री यादव हे कवी, पत्रकार असून ख्यातनाम लेखक, व्याख्याते आहेत. संत साहित्यावर त्याचा गाडा अभ्यास आहे..ते माळशिरस ता.पुरंदर येथील असून परिवर्तन चळवळीचे खंदे पुरस्कते आहेत.