शिवणकाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवणकाम (इंग्लिश: Sewing) दोन कापडाचे तुकडे सुई व दोऱ्याच्या साहाय्याने एकमेकांना जोडणे ही शिवणकामाची ढोबळ व्याख्या आहे. शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीस शिंपी म्हणतात.

शिवणकाम हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने करता येते. हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर करून केलेले शिवणकाम हे कमी वेळात व अधिक सफाईदार होते म्हणून शिवणयंत्राचाच वापर केला जातो. मात्र लहान-सहान शिवणकामासाठी आजही हाताने केलेल्या शिवणकामावर भर दिला जातो. हाताने केलेल्या शिवणकामास हातशिलाई असे म्हटले जाते. हातशिलाईमधे धावदोरा हा प्रमुख टाका म्हणून वापरला जातो. शिवणकामाचे रीतसर शिक्षण घेताना सरावासाठी आधी हातशिलाई शिकवली जाते व अशा शिक्षित व्यक्तीस शिलाईयंत्राचा सराव करण्यास दिला जातो.

केवळ कपडे शिवण्याकरता नव्हे, तर चामड्याचे दोन तुकडे शिवण्याकरता देखील शिवणकाम करतात.

मापे घेणे[संपादन]

एखाद्या व्यक्तीचे कपडे शिवण्यापूर्वी,त्या व्यक्तीची मापे घेतल्या जातात.त्यात उंची,घेर,बाही लांबी आदींचा समावेश असतो.ती मापे नोंदविल्या जातात.नंतर त्यानुसार कापड बेतल्या जाते.

कापड बेतणे[संपादन]

एका मोठ्या टेबलावर किंवा सपाट जागी कापड अंथरल्या जाते.त्यावर उंची,घेर आदी मापे उतरवून व शिलाई माया(मार्जिन) आदी गोष्टी जोडुन ते कापड मग कापल्या जाते.कापडाचे बेतण्यावर व कापण्यावरच कपड्याचा आकार ठरतो. एकदा कापलेले कापड मग जोडता येत नाही.म्हणून कापद वेतणे हा शिलाईचा महत्वाचा टप्पा आहे.कापतांना कापडाची घडी असल्यास ते सरकु नये म्हणून त्यास टाचण्या लावण्याची पद्धत आहे.

शिवणकाम[संपादन]

शिलाई यंत्रावर शिवण करणे हे जिकरीचे व कौशल्याचे काम आहे. ते सरावानेच जमते.शिलाई सुरु करण्यापूर्वी जे कापड शिवायचे आहे त्याचे अनुरुप धाग्याची निवड(मॅचिंग) करुन घेणे जरुरी आहे. कापड शिवल्यानंतर शिवण दिसायला नको अशी समजूत असते.शिलाई दरम्यान शिवणयंत्राने घालण्यात येणार्‍या टाक्यास 'टीप' असे म्हणतात.ती टीपही कापडास बघून योग्य हवी.जास्त लांब टीप उसवण्याची भिती असते तर खूप आखूड टीपने त्या ठिकाणुन कापड (सुईने जवळजवळ छिद्रे पडल्याने) लवकर फाटण्याची शक्यता असते

लागणारी साधने[संपादन]

शिवणकामास लागणारी साधने

  • १) खडू (चॉक)
  • २) कापड बेतण्यासाठी टेबल
  • ३) मोठी स्केल [एल (L) या अक्षराच्या आकाराची]
  • ४) टाचण्या
  • ५) कापडाचे अनुरुप दोरा
  • ६) लांब पात्याची कैची
  • ७) शिलाईयंत्र
  • ८) कापडाची जाडी बघून त्यानूसार मशीनची सुई