शिंगी शिखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिंगी शिखर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सर्वोच्च शिखर आहे. शिंगी शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची १२७१ मीटर एवढी आहे. खेड तालुक्यातील मावळ पट्ट्यातील (पश्चिमेकडील) ५ गावांच्या सीमेवर मध्येच हा शिंगीचा डोंगर आहे. अस म्हटलं जात कि ५ गावांची सीमा या ठिकाणी येऊन मिळते.या प्रत्येक गावातून शिंगी शिखरावर जायला पायवाट आहे. 5 गावांची नावे पुढील प्रमाणे

१) औदर

२) आडगाव

३) कुडे बुद्रुक

४) कुडे खुर्द

५) सुपे

भौगोलिक स्थान:[संपादन]

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिमेकडे आडगाव गावाच्या उत्तरेला हे शिखर आहे. खेड उर्फ राजगुरुनगर पासून ३० किमी. अंतरावर आहे. पुणे नाशिक हायवे (NH - ६०) वर पुण्यावरून नाशिक कडे जाताना राजगुरुनगर शहराच्या अलीकडे शिरोली फाटा म्हणून एक ठिकाण आहे तिथून पुढे २८ किमी. आडगाव आहे. पुणे शहरापासून उत्तरेला ८० किमी. अंतरावर शिंगी शिखर आहे.

इतिहास:[संपादन]

शिंगी शिखराचा इतिहास जास्त काही माहिती उपलब्ध नाही, परंतु शिखरावर असलेलं महादेवाचं मंदिर ४०० ते ५०० वर्षांपूर्वीच असावं. मंदिर दगडामध्ये बांधलेलं आहे. मंदिर अगदी छोटेखानी आहे. मंदिरात मध्यम आकाराची एक पिंड आहे. दरवर्षी पौष नवमीला येथे देवाचा भंडारा ठेवला जातो त्या वेळी ५ गाव मिळून तो कार्यक्रम साजरा केला जातो.

जाण्याच्या वाटा:[संपादन]

१)आडगावातून जाणारी वाट:[संपादन]

आडगाव गावातून प्राचीन कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साहाय्याने वर जाता येते. १ ते २ तासात वॉर जात येते. वर जाताना मध्येच कातळाचा टप्पा लागतो तू पार करण्यासाठी ह्या पायऱ्या जुन्या काळात बांधल्या गेल्या असाव्या. ह्या वाटेचा वापर मध्य युगात व्यापारासाठी होत असे. आज देखील आडगावचे लोक या वाटेने औदर या गावाला जाण्यासाठी करतात.

२)सुपे गावातून जाणारी वाट:[संपादन]

सुपे गावातून जाणारी पायवाट थोडीशी सोपी आहे, परंतु पावसाळ्यात ही वाट निसरडी आहे. १ ते १.३० तासात वर जात येते.

३)कुडे बुर्द्रुक आणि कुडे खुर्द गावातून जाणारी वाट:[संपादन]

या दोन्ही गावातून पायवाटा शिखरावर जातात.

४)औदर गावातून जाणारी वाट:[संपादन]

या गावातून देखील पायवाटेने १ ते १. ३० तासात शिखरावर पोचता येते.

५)पवन चक्कीची वाट:[संपादन]

शिंगी डोंगराच्या पश्चिम बाजूला पवनचक्क्याची रांग आहे. तेथे चार चाकी गाडी येण्यासाठी घाट रस्ता बनवला आहे. या मार्गाने अगदी २० मिनिटातच शिखरावर जाता येते.

माहिती : - सुशांत तांबे

छायाचित्रे:[संपादन]

शिंगी शिखर पायथ्यापासून
शिंगी शिखर
शिंगी मंदिर
शिंगी पिंड
शिंगी विहीर