शाहीद परवेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शाहीद परवेज खान
Shahid Parvez Khan performing at 33rd Fajr International Music Festival 04.jpg
शाहिद परवेज़ कार्यक्रमात सादरीकरण करताना
जन्म १४ ऑक्टोबर, १९५८ (1958-10-14) (वय: ६३)
राष्ट्रीयत्व भारतीय
संगीत प्रकार भारतीय पारंपरिक संगीत
वाद्ये सतार,सूरबहार
वडील अजीज खान
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार
संकेतस्थळ शाहीद परवेज खान

शाहीद परवेज खान (१४ ॲाक्टोबर, १९५८) हे हिंदुस्थानी शास्त्रीय सतार वादनातील इटावा घराण्याचे सतारवादक आहेत.[१]

परंपरा[संपादन]

शाहीद परवेज हे इटावा घराण्यातील सातव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे काका,उ.विलायत खान यांनी प्रचलित आणि विकसित केलेल्या गायकी अंगाने होणाऱ्या वादनशैलीचा समृद्ध वारसा उ.शाहीद परवेज यांनी पुढे नेला आहे. गायकी अंगाबरोबर तंत्रकारी अंगाचा मिलाफ करून निर्माण केलेल्या त्यांच्या स्वतंत्र वादनशैलीसाठी शाहीद परवेज ओळखले जातात.[२]

सांगीतिक परिचय[संपादन]

उ.शाहीद परवेज यांचे सतारीचे शिक्षण त्यांचे वडील उ.अजीज खान यांच्याकडे झाले. उ.अजीज खान हे सतार आणि सूरबहार वादक उ.वाहीद खान यांचे सुपुत्र. घराण्याच्या परंपरेनुसार उ.अजीज खान यांनी शाहीद परवेज यांना सतारीच्या शिक्षणाआधी गाण्याचे आणि तबल्याचे रीतसर शिक्षण दिले. शाहीद परवेज यांचे काका उ.हाफीज खान (गायक,सतार व सूरबहार वादक) यांनी त्यांना गायनाचे धडे दिले. तसेच दिल्ली घराण्याचे मुन्नु खान यांच्याकडे १० वर्षे तबल्याचे शिक्षण झाले. त्यांच्या घराण्याने इमदाद खान(त्यांचे पणजोबा), इनायत खान, वाहीद खान(त्यांचे आजोबा),आणि विलायत खान(त्यांचे काका) असे वादक निर्माण केले आहेत.[३]

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

उ.शाहिद परवेज खान यांनी देश-विदेशातील अनेक संगीत महोत्सवातून आपले वादन सादर केले आहे. भारतातील सर्व प्रमुख महोत्सव, अमेरिका, युरोप, कॅनडा, आफ्रिका, ॲास्ट्रेलिया, रशिया,अशा देशातून त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. शाहीद परवेज आपल्या स्वतंत्र वादनशैलीसाठी ओळखले जातात. गायकी अंगाबरोबर तंत्रकारी अंगाचा मिलाफ असलेल्या त्यांच्या वादनशैलीत,गायकी अंगासोबत लयीचे विविध प्रकार पहायला मिळतात.[ संदर्भ हवा ]

विद्यार्थी वृंद[संपादन]

त्यांनी स्थापन केलेल्या एस पी के अकादमी (SPK Academy) येथून तसेच त्यांच्याकडे शिकलेले अनेक शिष्य आज इटावा घराण्याची परंपरा पुढे नेत आहेत. शाकीर खान, समीप कुलकर्णी, सीमा गुलाटी, रवी चारी, अझीम अहमद अल्वी, सुब्रनील सरकार, जवाद नूर, नौमन खान, मनीष पिंगळे, कै.योगीराज नाईक हे त्यांचे शिष्य आहेत.[ संदर्भ हवा ]

सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार- २००६
  • पद्मश्रीने सन्मानित - २०१२
  • कलाज्योती जीवनगौरव पुरस्कार- २०२०
  • सूर-सिंगार पुरस्कार
  • कुमार गंधर्व सन्मान
  • म.ल.कोसर पुरस्कार
  • आकाशवाणी केंद्राचे A दर्जाचे मान्यताप्राप्त कलाकार[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Shahid Parvez Khan". Shahid Parvez Khan (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  2. ^ Dasgupta, Amrita (2010-07-01). "Seven strings to the rainbow" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  3. ^ Service, Tribune News. "Ustad Shahid Parvez Khan mesmerises audience". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.